काकाने मेहुणीच्या मुलीचा अंघोळ करताना व्हिडिओ काढला, व्हायरल करतो म्हणत अत्याचार केला, सदम्यात गेलेल्या मुलीने आत्महत्या केली,
सार्वभौम (संगमनेर) : -
संगमनेर तालुक्यात हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 11 वीचे शिक्षण घेणारी मुलगी राहता तालुक्यात मावशीकडे दिवाळीच्या सुट्टीत गेली होती. घरातील सर्व लोक बाहेर गेले असता तिचा अंघोळ करताना काकानेच व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केले. तिच्यावर राहत्या घरी बळजबरीने वेळोवेळी जबरी संभोग केला. मात्र, या नराधम काकाची राक्षसी भुक येथेच थांबली नाही. त्याने 11 वीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीला शाळेत जाऊन पुन्हा ब्लॅकमेल करण्यात सुरवात केली. तुझे व्हिडीओ व फोटो तुझ्या मैत्रिणींना दाखविल, तुझ्या इज्जतीचे धिंडवडे उडवीन अशी धमकी देऊ लागल्याने पिडीत मुलीने टोकाचे पाऊल उचलले. तिने ही सर्व घटना आपल्या आईला सांगुन रात्री सर्वजण झोपेत असताना विषारी औषध घेतले. तिला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, तोपर्यंत पिडीत मुलीने अखेरचा श्वास घेतला होता. ही सर्व धक्कादायक घटना शनिवार दि. 30 में 2026 रोजी पिंपारणे परिसरात घडली. या घटनेनंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी वासनांध काकाला पाठीशी न घालता त्याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तत्काळ पथक तयार करून आरोपी पकडण्यासाठी रवाना केले. त्यानंतर या आरोपीच्या कालरात्री उशिरा मुसक्या अवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला आज न्यायालयापुढे हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पिंपारने परिसरात एक कुटुंब राहत होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगी ही 11 वीचे शिक्षण घेत होती. तर मुलगा देखील शिक्षण घेत होता. पिडीत मुलगी ही 11 वीचे शिक्षण घेत असताना शाळेला दिवाळीच्या सुट्टी लागतात. त्यावेळी सुट्टीत ती मावशीकडे राहता तालुक्यातील नांदूरखी परिसरात जाते. दुसऱ्या दिवशी मावशी आणि मावस बहीण हे 11 वाजता घरातील वस्तू आणण्यासाठी बाजारात जातात. त्यावेळी काकाची नियत पिडीत मुलीवर फिरते. नराधम काका हा पिडीत मुलीवर वाईट नजर ठेवतो. पिडीत मुलगी ही अंघोळ करण्यासाठी गेल्यावर नराधम काका हा व्हिडीओ व फोटो काढतो. त्यानंतर पिडीत मुलीला नराधम काका हा ब्लॅकमेल करून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडीत मुलीच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरी संभोग करतो. एक जवळचा नातेवाईक व विश्वासू माणुस असल्याने नराधम काकावर कोणीही शंका घेतली नाही. मात्र, पिडीत मुलगी त्याच्या धमक्यांना बळी पडल्याने नराधम काका ही चटक लागली.
दरम्यान, वासनाधीन काका हा पिडीत मुलीच्या पाठीमागे कॉलेज मध्ये जाऊ लागला. ती शिक्षण घेत असणाऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा ब्लॅकमेल करू लागला. तुझे व्हिडीओ व फोटोज तुझ्या मैत्रिणींना दाखवीन. तुझ्या इज्जतीचे धिंडवडे उडवीन आशा धमक्या पिडीत मुलीच्या कॉलेज मध्ये जाऊन पिडीत मुलीला देत होता. पिडीत मुलीला हे टॉर्चर सहन झाले नाही. पिडीत मुलगी कॉलेज सुटल्यानंतर घरी जाते. आपल्या आईचे काम आटोपल्यानंतर जवळ बसवुन गेली दिड वर्षांपासूनचा नराधम काकाचा त्रास आईला सांगते. त्यावेळी पिडीत मुलीला आई आधार देते. आणि आजची रात्र जाऊदे आपण उद्या सर्व नातेवाईकांना बोलावून यावर मार्ग काढू असे सांगते. परंतु, पिडीत मुलीला नराधम काका कॉलेज मध्ये येऊन ब्लॅकमेल करतो हे सहन झाले नाही. शनिवार दि.30 में रोजी पिडीत मुलगी ही घरातील सर्वजण झोपल्यानंतर विषारी औषधाची बाटलीतले औषध घेते. त्यावेळी दररोज प्रमाणे पिडीत मुलीचे आई वडील हे पहाटे उठवुन जनावरांचे काम करत असतात. त्यावेळी पिडीत मुलगी ही उलट्या करत बाहेर येते. आई ही मुलीला काय झाले हे पाहण्यासाठी गेली असता पिडीत मुलीच्या तोंडातुन फेस येत होता. तेव्हा लक्षात आले की मुलीना विषारी औषध घेतले आहे.
दरम्यान, पिडीत मुलीला वडील हे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मात्र, तोपर्यंत फार वेळ झालेली होती. पिडीत मुलीला डॉक्टरांनी मयत घोषित केले होते. त्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांना राग अनावर झाला. त्यांनी नराधम काकाला पाठीशी न घालता थेट तालुका पोलीस ठाण्यात जाऊन काकाचे राक्षसी कृत्य सांगितले. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी पथक रवाना केले. त्यानंतर काल उशिरा नराधम काकाच्या मुसक्या आवळून आज कोर्टापुढे हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेने नात्याला काळीमा फासला असुन सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
अकोले - संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुली किती असुरक्षित आहेत. याची आकडेवारी आता नुकतीच समोर आली आहे. वर्षभरात 55 अल्पवयीन मुली गरोदर माता झाल्याचे महिला आयोगाने जाहिर केले आणि त्याची चौकशी देखील लावण्यात आली आहे. वास्तवत: हे गुन्हे घडतात कसे? तर पालक त्यांच्या जवळच्या नातेवाईकांवर विश्वास ठेऊन मुलींना सोडून जातात, त्यामुळे त्या मुलींचा वयाचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले जातात, कधी मित्र, कधी शेजारी, कधी पाहुणे, कधी वाटसरु यांच्यावर विश्वास ठेऊन सदैव विश्वासघात झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, पालकांना प्रशासनाने विनंतीपुर्वक आवाहन केले आहे. की, आपल्या मुलींची काळजी आपण घेतली पाहिजे, त्यांना कोणाच्या भरवशावर प्रवासासाठी, कोठे शाळेत तथा पाहुण्यांकडे सोडविण्यासाठी कोणाची मदत घेणे बंद केले पाहिजे. आपली मुलगी काय करते, तिच्या मैत्रीणी, मित्र, यांची चौकशी केली पाहिजे. वयानुसार मुलींच्या शरिरात विविध बदल होत जातात. त्यामुळे, पालकांनी आपल्या मुलांचे मित्र झाले पाहिजे. योग्यवेळी समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे. जर पालक गाफील राहिलो तर भविष्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा आलेख वाढता दिसणार आहे.
