राजुरचे रक्षाबंधन अटपून घराकडे निघालेल्या तरुणीवर अत्याचार, संगमनेर बस स्थानकावर भुरळ टाकून डोंगरात नेले, गुन्हा दाखल.!

 

सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) - 

                           संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरात वीस वर्षीय तरुणीला भुरळपाडुन दुचाकीवर बसवून खांडगाव परिसरात डोंगरभागात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि.26 ऑगस्ट 2026 रोजी 3:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. जेव्हा भुरळच्या अवस्थेत झालेला प्रकार लक्षात येताच पिडीत वीस वर्षीय तरुणीने आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीला पाठीशी न घालता थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले व काल दि.30 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. त्यावरून सिद्धांत दिपक मावस (रा. कुरण रोड, ता. संगमनेर) याच्याविरोधात  बलात्कारसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत वीस वर्षीय तरुणी ही सिन्नर परिसरात राहते. पिडीत तरुणीचा पती हा एमआयडीसी मध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे माहेर राजूर असल्याने ते रक्षाबंधनाच्या निमित्ताने दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता राजूर येथे गेल्या. राजूर येथे भावंडांसोबत रक्षाबंधन करून पिडीत वीस वर्षीय महिला ही दुपारी बसने परतीच्या प्रवासाला चालल्या. त्यावेळी पिडीत वीस वर्षीय तरुणीने आपल्या पतीला फोन करून संगमनेरला घेण्यासाठी बोलवले. त्यानंतर पिडीत महिला ही संगमनेर बसस्टँडवर थांबुन आपल्या पतीची वाट पाहत होती.

           दरम्यान, पिडीत वीस वर्षीय तरुणी नाष्टा करण्यासाठी एका हॉटेल मध्ये थांबते. नाष्टा करून बाहेर आपल्या पतीची वाट पाहत राहते. याच परिसरात राक्षसीवृत्ती असलेला आरोपी सिद्धांत मावस याची नजर या वीस वर्षीय तरुण विवाहीत महिलेवर पडते. तो गाडी आडवी लावुन या वीसवर्षीय पिडीत महिलेला गाडीवर बस असे म्हणु लागला. परंतु, पिडीत महिलेना नकार दिला. त्यावेळी आरोपी सिद्धांत मावस याने महिलेचा पाठलाग केला. तु गाडीवर बसली नाही तर तुझ्या मागेच फिरणार तुला कळून पण देणार नाही तुझ्या मागे आहे ते. पिडीत वीस वर्षीय तरुणी ही त्याच्या पासुन सुटका करण्यासाठी लांब जाते. मात्र, तो पिडीत महिलेजवळ जाऊन तिला भुरळ पाडतो. भुरळ पाडून मोटारसायकलवर वीस वर्षीय महिलेला बसुन खांडगाव परिसरातील डोंगर परिसरात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

         दरम्यान, पिडीत वीस वर्षीय महिला बसस्टँड परिसरात येते. जेव्हा भुरळच्या अवस्थेत झालेला प्रकार लक्षात आला. तोपर्यंत फार वेळ झाला होता. पिडीत महिला शांत असल्याने पतीने विचारणा केली. तेव्हा पिडीत महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्या राक्षसीवृत्ती असलेला तरुणाचा शोध घेण्यासाठी पती व पत्नी दोघे ही संगमनेर मध्ये बस स्टँड परिसरात आले. त्यावेळी  शोध घेण्यासाठी सुरुवात केली. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजता तो बसस्टँड परिसरात दिसला. त्यावेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न काही लोकांच्या मदतीने केला. तो पकडला त्यावेळी त्याने त्याचे नाव सांगितले. मात्र, हाताला हिसका देऊन त्याने तेथुन पळ काढला. पिडीत तरुणीची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर पिडीत वीस वर्षीय महिलेच्या तक्रारी वरून सिद्धांत दिपक मावस (रा. कुरणरोड, ता. संगमनेर) याच्याविरोधात  बलात्कारसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.