About Us

"लोकशाही" हा प्रत्येक नागरिकाचा "आॅक्सिजन" आहे. तर त्या लोकशाहीला टिकविणारा "चाैथा स्तभ मीडिया" आहे. पण आज प्रत्येक मोठी माध्यमे ही बिकाऊ झाली आहे. कोणाच्या न कोणाच्या पक्षाच्या ताटाखालची मांदरे झाली आहेत. म्हणून सामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. म्हणूनच फेसबुक, व्हाटसअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक लायू अशी माध्यमे पुढे आली. आजही प्रिंट व इलेक्ट्रॅनिक माध्यमे ही सामाजिक नाही तर पुर्णपणे कमर्शिअल झाली आहेत. त्यामुळे सोशल मीडियाला मागणी वाढली आहे. वास्तव मांडणी, आत्मप्रकटन आणि न्यायाचे साधन म्हणून पोर्टलने लोकांच्या मनात अनन्यसाधारण स्थान निर्माण केले आहे. म्हणून "सार्वभाैम" म्हणजे "समता", स्वातंत्र्य", न्याय" व बंधुता या तत्वांना समोर ठेऊन हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.