मुन्नाताई MBBS कडून वृद्धाचा मृत्यू.! डॉक्टरीनबाई तुमचा खेळ थांबवा, घारगाव परिसरातील खळबळजनक ऑडिओ व्हायरल.!


 सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :- 

                               संगमनेर तालुक्यातील पठार भागावरील घारगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क एका डॉक्टरच्या पत्नीनेच वयोवृद्ध माणसाला इंजेक्शन मारले. या इंजेक्शनचे वयोवृद्ध माणसाला इन्फेक्शन झाले आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवार दि.31 मे रोजी घारगाव परिसरात घडली. जेव्हा पीडित मयताचा मुलगा डॉक्टरला जाब विचारण्यासाठी गेले असता तेथे डॉक्टरांच्या पत्नीने पळ काढला. डॉक्टर नसताना देखील मुन्नाभाई होण्याची गरज काय होती? बाईंने बेकायदा इंजक्शनचा  "अभिषेक" घातल्याने एका निरापराध व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यानंतर या घटनेवर पडदा टाकण्यासाठी अनेक राजकीय पुढारी एकत्र आले आणि हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु, मयताच्या मुलाची ऑडीओ व्हायरलं झाल्याने ह्या घटनेचे बिंग फुटले आहे.   

खरंतर, या क्लिनिकमध्ये ज्या डॉक्टरच्या पत्नी रुग्णावर उपचार करत होत्या त्यांच्याकडे डॉक्टरकीची डिग्री होती का? क्लिनिक टाकून डॉक्टर कुठे गेले होते? गेली अनेक दिवसांपासून डॉक्टरची पत्नी क्लिनिकचा कारभार पाहते. कुठलीही पदवी नसताना मुन्नाभाई प्रमाणे रुग्णांवर उपचार करते. मग वरीष्ठ अधिकारी यांनी कारवाई का केली नाही? असे अनेक प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहे. तर या घटनेची चौकशी करुन तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तसेच याप्रकरणी तक्रारदार आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

           याबाबत समजलेली माहिती अशी की, घारगाव परिसरात गेली अनेक वर्षांपासून नामांकीत क्लिनिक आहे. तेथे डॉक्टर रुग्णांना उपचार करत असतात. तेथील परिसरातील लोक उपचारासाठी या क्लिनिक मध्ये येतात. मात्र, अनेक दिवसांपासून तेथे डॉक्टर नसुन त्यांची पत्नी या क्लिनिक मध्ये असते. याच परिसरातील एक वयोवृद्ध माणुस गुरुवार दि. 28 मे रोजी या क्लिनिक मध्ये उपचार करण्यासाठी गेले. ते शेळकेवाडी परिसरातील दत्त मंदिराचे दर्शन घेण्यासाठी तीन किलोमीटर पायी गेले. त्यामुळे, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी जवळच असणाऱ्या घारगाव परिसरातील क्लिकनिक मध्ये उपचारासाठी गेले. वयोवृद्ध व्यक्ती व त्यांचे नातेवाईक त्यांच्या सोबत होते. जेव्हा क्लिनिक मध्ये गेले तेव्हा डॉक्टर तेथे उपस्थित नव्हते. त्यावेळी डॉक्टरांच्या पत्नी तेथे उपस्थित होत्या. त्यांनी वयोवृद्ध आजोबांना इंजेक्शन दिले.

         दरम्यान, इंजेक्शन दिल्यानंतर रात्री दिड ते दोनच्या दरम्यान वयोवृद्ध आजोबांना त्रास सुरू झाला. त्यांना घारगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर वयोवृद्ध आजोबांची प्रकृती खालावत चालली. नातेवाईकांनी तात्काळ अहिल्यानगर शहरात पुढील उपचारासाठी वयोवृद्ध आजोबांना घेऊन गेले. तेथे देखील दोन ते तीन दिवस उपचार घेतले. मात्र, आजोबांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. वयोवृद्ध आजोबांचा रविवार दि. 31 में रोजी निधन झाले. जेव्हा मयताच्या मुलाला समजले की आपल्या वडिलांचा मृत्यू हा घारगाव परिसरातील क्लिनिक मध्ये डॉक्टरच्या पत्नीने इंजेक्शन दिले. त्याचे इन्फेक्शन झाल्याने हा मृत्यू झाला आहे. तेव्हा मयताच्या मुलाची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी थेट क्लिनिकवर डॉक्टरला जाब विचारण्यासाठी गेले.

              दरम्यान डॉक्टरची पत्नीने तेथून पळ काढला. त्यानंतर डॉक्टरांची पाठराखण करण्यासाठी व्हाइट कॉलर पुढारी पुढे आले. त्यांनी मयताच्या मुलाला शांत केले. या घटनेवर पडदा टाकण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु या घटनेची ऑडिओ व्हायरल झाल्याने  या क्लिनिकचा भोंगळा कारभार बाहेर आला. खरंतर, याच डॉक्टरांचा कुटुंबातील व्यक्ती हा तेथील आरोग्य विभागात आहे. ते देखील या परिसरात खाजगी क्लिनिक चालवतात. त्यामुळे, सरकारी पगार घेऊन आरोग्य विभागात कमी आणि खाजगी क्लिनिक मध्ये वावर यांचा अधिक असतो. कुटुंबातीलच सदस्य आरोग्य विभागात असल्याने या क्लिनिकवर कारवाईची टांगती तलवार न करता अर्थपूर्ण तडजोडी होतात का?असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

                दरम्यान, सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी चुकीचा उपचार केला म्हणुन दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पिडीत माहिलेने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, इथे डॉक्टरांच्या पत्नीकडे कुठली ही डॉक्टरची पदवी नसताना रुग्णावर उपचार केले. त्यामध्ये रुग्ण दगावला गेला. असे चुकीचे उपचार डॉक्टर रुग्णावर करत असेल तर माणसाचा जीव कोवडी मोल आहे का? असा प्रश्न सुज्ञ लोकांनी उपस्थित केला आहे. संगमनेरात अनेक लॅब देखील अनधिकृत आहेत. काही दिवसांपूर्वी रक्त लघवी तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांना नोटीसा काढण्यात आल्या होत्या त्याचे पुढे काय झाले? तालुक्यात अनेक रक्त व लघवी तपासणी केंद्र हे डॉक्टरांशी मिलीभगत असतात. त्यांच्याकडून कट मिळत असल्याने ग्रामीण भागातील क्लिनिकांमध्ये रुग्णांची लूट होताना पाहायला मिळत आहे.