धुणं धुणार्या महिलेशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न, घरात घुसून नको ते चाळे करण्याचा प्रयत्न.! गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

                      संगमनेर तालुक्यातील भोजापूर परिसरात 24 वर्षीय महिला कपडे धुत असताना जवळच्या व्यक्तीने कामा निमित्त घरात बोलवुन बळजबरी करून नाजूक संबंध करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना  शनिवार दि. 28 जुन 2025 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पीडिताच्या घरामध्ये घडली. हा प्रकार घडताच पीडितेने सर्व कैफियत आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर थेट संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठवुन 24 वर्षीय पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विक्रम राधाकृष्ण लोखंडे (रा. निमगाव भोजापुर, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध विनयभंगासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत 24 वर्षीय महिला भोजापुर परिसरात राहते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पती कामानिमित्त घरातून बाहेर जात असल्याने घरातील सर्व काम पिडीत महिलेला करावे लागते. आरोपी विक्रम लोखंडे हा देखील याच परिसरात राहत असल्याने त्याचे पिडीत महिलेच्या घरी नेहमी येणे जाणे होते. तो एक व्यक्ती म्हणुन या पिडीत महिलेवर वाईट नजर ठेवत होता. वेळोवेळी घरी जात असल्याने या आरोपी विक्रमची नियत या 24 वर्षीय पिडीत महिलेवर फिरली. मात्र, एक जवळचा विश्वासु व्यक्ती म्हणुन त्याच्यावर कोणी काही शंका घेतली नाही. पण सर्वांना अंधारात ठेऊन तो नजर ठेवत होता. 

          दरम्यान, शनिवार दि. 28 जुनला पती घरी नसताना आरोपी विक्रम हा दुपारी 1 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान आला. पिडीत 24 वर्षीय महिला आपल्या घरापुढे ओट्यावर कपडे धुत होती. आरोपी  विक्रम हा तिथे आला व पिडीत 24 वर्षीय महिलेला म्हणाला की, तुमच्याकडे महत्वाचे काम आहे. ते दोघे ही घरात आले. त्यानंतर आरोपी विक्रम याच्यातील हैवान जागा झाला. तो घरात नको ते चाळे करू लागला. मला तुझी पप्पी घ्यायची आहे असे म्हणत तिला पलंगावर लोटले आणि तो लगट करून बळजबरीने नाजुक संबंध करण्याचा प्रयत्न करत असल्याने पिडीत महिला प्रतिकार करू लागली. आरोपी विक्रम यातीलवासनांध राक्षस पाहुन पिडीत महिलेने आरडा ओरडा केला. नंतर ढकलून घरा बाहेर पळत आल्या.

          दरम्यान, पिडीत महिलेने घरातून बाहेर पडताच शेजारी असणाऱ्या नातेवाईकांकडे गेल्या. त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पिडीत महिलेने आपल्या पतीला फोन करून घरी बोलावून घेतले. घरी येताच घडलेला सर्व घटना सांगितली. त्यानंतर पतीची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी आरोपी पाठीशी न घालता तक्रार देण्यासाठी तालुका पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पिडीत 24 वर्षीय महिलेने घडलेली सर्व कैफियत पोलिसांना सांगितली. त्यानंतर पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विक्रम राधाकृष्ण लोखंडे (रा. निमगाव भोजापुर,ता. संगमनेर) याच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.