पाणीपुरी व बेकरीवाला अशा दोघांनी एका आदिवासी महिलेवर केला सामुहीक बलात्कार, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात एका 26 वर्षीय महिलेला पाणीपुरीवाल्याने घरी साफसफाई करण्यासाठी नेले. तेथे बेडरूममध्ये नेऊन महिलेशी अश्लील चाळे करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. इतकेच काय! त्याने बेकरीवाल्या मित्राला देखील घरी बोलवले व 26 वर्षीय पिडीत महिलेला जबरी संभोग करण्यास भाग पाडले. ही सर्व धक्कादायक घटना 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता घडली. जेव्हा पिडीत महिला हा सर्व प्रकार नातेवाईकांना सांगेल असे म्हणल्यावर या दोघांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, पिडीत महिला घरी येऊन रडत असल्याने शेजारी असणाऱ्या महिलेने विचारले त्यानंतर सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन पिडीत महिलेच्या पाठीशी उभे राहिले त्यानंतर घारगाव पोलीस ठाणे गाठले. मंगळवारी पिडीत महिलेने आपली तक्रार दाखल केली. त्यानंतर गणेश प्रजापती (हल्ली रा. घारगाव, ता. संगमनेर), सैफुल्ला अबुतय्यम शेख (रा.14 नं.नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्याविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत 26 वर्षीय महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. त्यामुळे, घारगाव व परिसरातील आजूबाजूच्या गावांनी जाणे येणे आहे. दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वजताच्या दरम्यान अकलापुर रोड घारगाव येथे भोलेशंकर नावाचे पाणीपुरीच्या दुकानावर पाणीपुरी खाण्यासाठी पिडीत महिला व तिचे भाऊ गेले. तेथे पाणीपुरी विकणारा आरोपी गणेश हा पिडीत महिलेच्या ओळखीचा असल्याने त्याने पिडीत महिलेला विचारले की, तुझा भाऊ पाणीपुरीच्या दुकानावर कामाला येईल का? त्यावेळी पिडीत महिला नाही म्हणाली. त्याचवेळी आरोपी गणेश हा म्हणाला की, तु माझेघरी साफसफाईचे काम करणार का? असे विचारले असता पिडीत महिला त्याला हो म्हणाली.
दरम्यान, आरोपी गणेश हा घरी कोणी नाही याचा फायदा उचलण्यासाठी पिडीत 26 वर्षीय महिलेला घर पाहुन घेऊ असे बोलतो. आरोपी गणेश प्रजापती हा पिडीत महिलेला घर दाखवण्यासाठी राहत असलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये नेतो. तेथे राहत असलेल्या पहिल्या मजल्यावर घेऊन जातो. तेथे बेडरूममध्ये नेल्यावर आरोपी गणेश या मधील हैवान जागा झाला. तेथे तो नको ते चाळे करू लागला. पिडीत महिलेने त्याला लाथ मारून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी गणेश यातील वासनांध राक्षस पाहुन पिडीत महिला आरडा ओरडा करून प्रतिकार करू लागली. मात्र, या हैवानाणे पिडीत महिलेवर वारंवार बलात्कार केला.
दरम्यान, हा आरोपी गणेश येथेच थांबला नाही. तर त्याने त्याचा बेकरीवाला मित्र सैफुल्ला याला देखील घरी बोलवले. त्याला देखील पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग करण्यास भाग पाडले. त्यानंतर पिडीत महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ती आपला जीव मुठीत धरून तेथून घरी आली. घरी आल्यानंतर रडत होती. तेथे घराशेजारी असणारी महिला आली व पिडीत महिलेला विचारले तेव्हा पिडीत महिलेने सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पिडीत महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी उभा राहणारे योगेश सुर्यवंशी या पिडीत महिलेच्या पाठीशी भक्कम उभे राहिले. त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पिडीत महिलेने सर्व घटनेची कैफियत पोलिसांनी सांगितली. यावरून गणेश प्रजापती (हल्ली रा. घारगाव, ता. संगमनेर), सैफुल्ला अबुतय्यम शेख (रा.14 नं.नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्याविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. वारंवार होणाऱ्या आदिवासी बांधवावरील अत्याचार वेळेत थांबले नाही. तर याच परिसरात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असे यावेळी योगेश सुर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.