छी.! इयत्ता 9 वीत शिकणारी मुलगी पाच महिन्याची गरोदर.! 60 वर्षाच्या म्हातार्याचे उद्योग, चौघांवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील सांगवी परिसरात अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इयत्ता 9 वीच्या वर्गात शिक्षण घेणार्या अवघ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यात पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले असून नराधम आरोपी हा तिच्या जवळचाच असल्याने या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. ही घटना पाच महिन्यापुर्वी घडली असून मुलीचे पोट दुखू लागल्याने सर्व प्रकार उघड झाला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी पंडित हिरामण वैराट (वय 60, रा. कळस बु, ता. अकोले जि. अहिल्यानगर) याच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी अकोले तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. जानेवारी महिन्यात तिचे आई वडिल एका लग्नाला बाहेरगावी गेले होते, मुलीस घरी ठेऊन अभ्यास करण्याच्या सुचना देऊन ते बाहेर पडले. हा प्रकार नराधम पंडित वैराळ याला माहित पडला. तो पीडित मुलीच्या जवळच कांद्याचे काम करीत होता, त्याला तहान लागली म्हणून तो पीडित मुलीच्या घरी गेला आणि तिच्याकडे पाणी मागितले. या नराधमाने तिच्याकडे चौकशी केली, की तुझे आई वडिल कोठे गेले आहे. तेव्हा ती म्हणाली ते लग्नाला गेले असून यायला उशिर होणार आहे. ही संधी साधून या नराधमाने घरात घुसून आतून कडी लावली आणि पीडित मुलीवर एकापाठोपाठ तीन वेळा अत्याचार केले.
दरम्यान, मुलीस प्रचंड वेदना होऊ लागल्याने ती आरोपी पंडित वैराट याच्या पत्नीकडे गेली, ती घराच्या जवळच काम करीत होती. तिने घडलेला प्रकार सांगितला असता आरोपीची पत्नी संगिता हिने पीडित मुलीस दमदाटी केली. आता जे झाले ते झाले, विषय येथेच संपून टाक अन्यथा तुला आणि तुझ्या वडिलांना जीवंत सोडणार नाही असे म्हणत पीडित मुलीवर यांनी दबाव टाकला. भितोपोटी मुलगी काहीच बोलली नाही, मात्र गेल्या दोन दिवसांपुर्वी पीडित मुलीचे पोट दुखू लागले म्हणून त्यांनी तिला धांदरफळ येथील आरोग्य केंद्रावर नेले होते. तेथे डॉक्टरांनी सांगितले की हिची सोनोग्राफी करावी लागेल. त्यानुसार वडिलांनी तिला संगमनेर येथे आणले आणि सोनोग्राफी केली. त्यात लक्षात आले. की, मुलगी ही पाच महिन्यांची गरोदर आहे. हे ऐकल्यानंतर वडिलांना धक्का बसला. त्यानंतर मुलीस विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने पाच महिन्यांपूर्वी घडलेला प्रकार कथन केला.
हे सर्व ऐकल्यावर तिच्या वडिलांनी नराधम पंडित वैराट याला फोन लावला, पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यात नंतर काही व्यक्तींनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पीडित मुलीच्या नातेवाईकांनी यथेच्छ दांड्याने चोप दिला, यावर काहीतरी मार्ग काढू असे म्हणत नराधम आरोपीच्या नातेवाईकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीचे नातेवाईक म्हणत होते की, आरोपी पंडीत वैराट याला समोर आणा. पण, तो काही समोर यायला तयार झाला नाही, त्यामुळे हा वाद आणखी पेटत गेला. शेवटपर्यंत आरोपी तोंड लपून बसल्याने पीडित मुलीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, नराधम पंडीतचे काही सोयरे पुढे आले आणि यावर तोडगा काढण्यासाठी संगमनेर शहरातील जनतानगर येथे एक घरात यांची बैठक बसली.
दरम्यान या बैठकीत असे ठरले. की, पीडित मुलीला न्याय म्हणून सोन्याची चेन आणि काही पैसे देऊ अशी चर्चा झाली. पण, त्यात देखील आरोपी पंडीत हा उपस्थित नव्हता, त्यामुळे, त्याच्यावर अधिक रोष वाढत गेला. त्यानंतर तेथे देखील या अत्याचारावर मार्ग निघाला नाही, म्हणून पीडित मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मुख्य नराधम आरोपी पंडित हिरामण वैराट, पत्नी संगीता पंडित वैराट, मुलगा संग्राम उर्फ शेरू पंडित वैराट आणि मुलगी माधुरी पंडित वैराट (सर्व रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशा चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे करीत आहे .