संगमनेरात दोन मटक्यांवर छापे, बुकींसह 35 जणांना अटक, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, तुमचा पाहुणा आहे का अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात चक्क पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. यात तब्बल 10 लाख 35 हजार 347 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन 35 जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे, संगमनेर शहरात अवैध धंद्यांना नेमके कोण पाठीशी घालत आहे. येथे पोलीस उपअधीक्षक कार्यलय व संगमनेर शहर पोलीस ठाणे यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अवैध मटक्यांवर ही कारवाई झाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पहिलीच सलामी दिली असुन येतो ट्रेलर है.!पिक्चर अभी बाकी है! अशीच सूचना त्यांनी नकळत दिली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यामुळे, संगमनेरात जुगार, मटका, दारु, वाळु हे सर्रस सुरू असल्याचे समोर आले आहे. यांच्यावर वचक निर्माण करुन धंदा बंद करणे हेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यापुढे आव्हान असणार आहे. ते हे आव्हान पेलतात का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने दि. 20 जुन 2025 रोजी संगमनेर शहरातील तेलीखुंट व कोल्हेवाडी रोड येथील अवैध मटक्याच्या टपऱ्यांवर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यात 35 जणांनाताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार 347 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर भागप्पा इटप (रा. तेलीखुंट, संगमनेर शहर), सुदर्शन दत्तात्रय इटप (रा. तेलीखुंट, संगमनेर शहर), आशरफ समशेरअली सय्यद उर्फ जहागीरदार (रा. तीनबत्ती चौक, जहागीरदारवाडा, संगमनेर शहर) दत्तात्रय भागप्पा इटप (रा. तेलीखुंट, संगमनेर शहर).
तसेच नानासाहेब बापु जाधव (रा. रायते,ता. संगमनेर), सुरज रामसिंग तांब्रकर (पंपिंग टेशन, ता. संगमनेर) अण्णासाहेब कुंडलीक खताळ (रा. धांदरफळ, ता. संगमनेर), रवींद्र नंदराम हासे (रा. माळीवाडा संगमनेर शहर) हौशीराम रामभाऊ काहांडळ (रा. सावरचोळ, ता. संगमनेर), इकबाल बशीर शेख (रा. गवंडीपुरा, संगमनेर शहर) शेखर भास्कर जाधव (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), नानासाहेब भीमराज उकिर्डे (रा. निळवंडे, ता. संगमनेर), रामदास गणपत माळी (रा. रायते, ता. संगमनेर), कैलास बाबुराव जाधव (रा. खांडगाव, ता. संगमनेर), शिवाजी दत्तु सातपुते (रा. कुरणरोड, ता. संगमनेर), राजु रामनाथ झंबरे (रा. उपासनी गल्ली, संगमनेर शहर) मधुकर नामदेव भोट (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), बाळासाहेब कारभारी पवार (रा. ओझर, ता. संगमनेर), भाऊसाहेब नाना काळे (रा. आनंदवाडी, ता. संगमनेर), शंकर संजय सवरगे (रा. वैदूवाडी, ता. संगमनेर)
तसेच रमेश बाबुराव सरोदे (रा. देवीगल्ली, संगमनेर शहर), दगडू रामचंद्र पवार (रा. कनोली, ता. संगमनेर), अस्लम सुलतान शेख (रा. समनापूर, ता. संगमनेर), हरिभाऊ बबन पवार (रा. निळवंडे, ता. संगमनेर), मनोहर काशिनाथ अभंग (रा. मात्ताडे मळा, संगमनेर शहर), संभाजी किसन साळवे (रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर), विश्वनाथ नाना आल्हाट (रा. पंपिंग स्टेशन, संगमनेर शहर), सुभाष सीताराम खैरे (रा. जोर्वे, ता. संगमनेर), नावेद उर्फ साहिल आशरफ सय्यद, आयान साजीद सय्यद, नजाकत समशेरअली सय्यद, हसेन रौफ पटेल, रियाज बापुमिया देशमुख (सर्व रा. संगमनेर शहर) यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संगमनेर शहरात एक काळ असा होता. की, खुलेआम काही कार्यकर्ते वाळु तस्करी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर करीत होते. मात्र, कालांतराने राजकीय परिस्थिती बदलली आणि वाळुतस्करी थोडी कमी झाली. मात्र, आता बहुतांशी राजकीय कार्यकर्ते संगमनेर शहरात कोणी क्लब चालवितात तर कोणी मटका चालवितात. कोणाची भागीदारी आहे. तर कोणाचे बळ आहे. त्यामुळे, पोलिसांना वाटले तरी ते राजकीय दबावापोटी तेथे कारवाई करत नाही. नंतर मात्र आतिरेख झाला की कारवाईला सामोरे जावेच लागते. मार्केट यार्ड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, कोल्हेवाडी रोड,शिवाजी नगर, या दरम्यान ३० पेक्षा जास्त मटक्याची दुकाने आहेत. त्यात पांढर्या बगळ्यांची भागिदारी फार मोठी असून. खुद्द राजकीय बडे नेते देखील त्यांच्याकडून हाप्ते वसुल करतात. त्यामुळे, झाकली मुठ सव्वालाखाची.! या म्हणीचा प्रत्यय येथे येतो.
दरम्यान, संगमनेर तालुक्याची परिस्थिती फार भयानक आहेत. येथे फार जबाबदार लोक देखील वाळुच्या गाड्यांमध्ये भागिदारी आहेत. तर अनेक जबाबदार लोकांचे जुगार मटक्याचे आड्डे आहेत. दुर्दैवाने मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्यात वेश्या व्यवसाय, गांजा, गुटखा, दारु, जुगार, मटका, आफू, कट्टा, सट्टा, कत्तलखाने यांच्यासह अन्य अवैध व्यवसायांचे आड्डे उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे जमिनिच्या किरकरोळ जागेहून जिवघेणे हल्ले होण्याचे प्रमाण फार वाढले आहे. यासाठी पोलीस यंत्रणेने प्रॉपर पोलिसिंग करणे अपेक्षित आहे. अन्यथा येणार्या काळात येथे बीड सारखे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत राहील. त्यामुळे, राजकारणी, समाजसेवक व तालुक्याच्या हितचिंतकांनी या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी त्वरीत काहीतरी प्रयत्न केले पाहिजे.