संगमनेर तालुक्यात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात, तीन ठार सात जखमी, तीन तालुक्यावर शोककळा पसरली, चौकशी सुरु.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरात कोल्हार घोटी महामार्गावर स्लिपरकोच ट्रॅव्हल व ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाले असुन सहा ते सातजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज रविवार दि.15 जुन रोजी सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास घडली. यात प्रवीण सोपान कांदळकर, (वय 28, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), फिरोज लाला शेख (वय 46, रा. कसारादुमाला, ता. संगमनेर), अंजु प्रवीण वाल्मिकी (वय 39, रा. हरियाणा) असे तिघे जण मयत झाले आहे. तर हर्षिता सोनू वाल्मिकी, बिराला पूनम, सोनिया रमेश बिर्ला, रिया अजय चावरीया, ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील, लता सुरेश, चक्रनारायण (सर्व रा. मुंबई), प्रथमेश राजेंद्र कोल्हे, (रा. पोहेगाव,ता. कोपरगाव), मोहमद रफीक जलील शेख (रा. नाईकवाडपुरा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर संगमनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कोल्हार घोटी महामार्गावरून स्लिपरकोच ट्रॅव्हल एम. एच.46 सी. यु. 2754 हे मोठे वाहन नेहमी प्रवाशांना घेऊन शिर्डी, शनिशिंगणापूर या देवस्थानकडे जात असते. आज देखील गाडी संगमनेर वरून प्रवाशांना घेऊन सकाळी शिर्डीकडे जात होती. मोठ्या संख्येने यामध्ये भाविक व प्रवाशी बसलेले होते. बहुतांश प्रवाशी हे देवर्षणासाठी बाहेर गावांमधुन आले होते. आज सकाळी ते कोकणगाव परिसरात असताना त्यांच्या समोरून लोणीच्या दिशेने एम. एच.12 एन. एक्स.1454 हा ट्रक समोरून आला. संपूर्ण ट्रक ही आंब्याने भरलेली होती. त्यामुळे, गाडीत लोड होता.
दरम्यान, पाऊस देखील मोठ्या प्रमाणात सुरू होता. रस्ता संपूर्ण ओला झाला असल्याने ट्रक व ट्रॅव्हलचालक यांना वेगावर नियंत्रण करता आले नाही. त्यामुळे, दोन्ही गाड्या एकमेकांना अगदी समोरासमोर धडकल्या. आणि रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्या. ट्रॅव्हल गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी असल्याने दोघे जण मयत झाले तर सहा ते सातजण गंभीर जखमी झाले आहे. मात्र, ट्रक मधील चालकाला मदत करणारा सहाय्यक जागीच ठार झाला. दोन्ही गाड्यांचे चालक हे सुखरूप असले तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये प्रवाशी नसल्याने एकाची जिवीत हानी झाली तर आंब्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. भरधाव वेगाने दोन्ही गाड्या असल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे, परिसरातील लोक धावत या घटनास्थळी आले.
दरम्यान, अचानक झालेल्या अपघातामुळे ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांनी एकच आरडा ओरडा केला. महिला देखील मोठ्या प्रमाणात घाबरून गेल्या. त्यातील लहान मोठ्या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. या महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी गाडी थांबवुन मदत केली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला. मात्र, तोपर्यंत तिघीजनांचा मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला होता. त्यामुळे, त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. यात प्रवीण सोपान कांदळकर, (वय 28, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), फिरोज लाला शेख (वय 46, रा. कसारादुमाला, ता. संगमनेर), अंजु प्रवीण वाल्मिकी (वय 39, रा. हरियाणा) असे तिघे जण मयत झाले आहे. तर हर्षिता सोनू वाल्मिकी, बिराला पूनम, सोनिया रमेश बिर्ला, रिया अजय चावरीया (सर्व रा. मुंबई) प्रथमेश राजेंद्र कोल्हे, (रा. पोहेगाव,ता. कोपरगाव), मोहमद रफीक जलील शेख (रा. नाईकवाडपुरा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर संगमनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.