...अखेर संकेत नवले या विद्यार्थ्याच्या हत्येचे गुढ उलगडले.! दोघांना अटक, अत्यंत नाजुक कारणाहून घडला प्रकार.!!


- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

संगमनेर शहरात इंजिनिअरींग शिकत असणार्‍या संकेत सुरेश नवले (रा. नवलेवाडी, ता. अकोले) या तरुणाची दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे हत्या करण्यात आली होती तर ९ डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह मिळून आला होता. या घटनेचा तपास सुरू असताना आज ९ फेब्रुवारी २०२३ रोजी या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. शाहरुख हसन शेख (वय २२) व सलमान इमाम शेख (वय ३०, रा. पुनरवसण कॉलनी, कुरण रोड संगमनेर) अशी या दोघांची नावे आहेत. संकेतच्या हत्येचे कारण देखील समोर आले असून अत्यंत नाजूक कारणाहून या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यात संकेतची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. यात अधिक माहिती तपासात निष्पन्न होणार असल्याची माहिती गोपनिय सुत्रांनी दिली. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

कशी केली हत्या..!!

संकेत नवले आणि आरोपी शाहरुख शेख तसेच सुलतान शेख ही तिघे पुर्वीपासून संपर्कात होते. त्यांच्यातील बोलणे, उठणे बसणे हे फार जागावेगळे असत होता. त्यामुळे, त्यांची एकमेकांशी मैत्री जमली होती. दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी आरोपी यांनी संकेतशी संकेतीक भाषेत संपर्क केला होता. त्यानुसार ते सुकेवाडी परिसरात भेटले तेथे त्यांच्या चर्चा झाली. मात्र, तिघांमध्ये एका नाजुक कारणाहून मतभेद झाले आणि तेथेच बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर धक्काबुकी आणि नंतर शाहरुख शेख व सुलतान शेख या दोघांनी मिळून संकेतची हत्या केली. तर, त्याला सुकेवाडी परिसरातच नेवून टाकले. त्यानंतर यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील पोलिसांचा तपास त्यांच्यापर्यंत जाऊन पोहचला आणि आज पहाटे दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्यात तपासाला सॅल्युट.!

गेली दोन महिने या तपासात अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी येऊन गेले. मात्र, अंतीम क्षणापर्यंत काही व्यक्तींनी यात एक धागा शोधण्याचा प्रयत्न केला. कोणी मोर्चे काढले, कोणी अंदोलने केली, कोणी निवेदने दिली. मात्र, तरी देखील अगदी शांत डोक्याने पोलिसांनी तपास केला. संकेतच्या प्राथमिक शाळेपासून ते त्याच्या नवोदय विद्यालयाच्या शाळेपर्यंत त्याच्या कॉलेज पासून ते त्याच्या मित्र परिवारापर्यंत इतका सखोल तपास केला. प्रत्येक गोष्टीची पार्श्‍वभुमी तपासून इतिहास अभ्यासला आणि अखेर तपासात महत्वाचा असणारा एक धागा शोधून काढला आहे. यात आरोपी हे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होते. मात्र, त्यांचा ताब्यात घेण्यासाठी ठोस पुरावा आवश्यक होता. त्यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे, इतक्या दिवस तापास प्रलंबित होता. पोलिसांसाठी प्रचंड आव्हानात्मक असणारा तपास तडीस नेल्यामुळे संगमनेर, नगर, अकोले आणि संगमनेर पोलीस उपाधिक पथकाला सॅल्युट केला पाहिजे..!!

काय आहे प्रकरण..!!

अकोले तालुक्यातील नवलेवाडी गावातील तरुण संकेत सुरेश नवले हा इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी संगमनेर शहरात आला होता. त्याने आमृतवाहीनी कॉलेजच्या समोर काही मित्रांना घेऊन रुम देखील शेअर केली होती. तर, अभ्यासासाठी तो एका लॅब्ररीत जात होता. या तेथे अभ्यास करीत असताना त्याच्या मोबाईलवर अचानक दोन फोटो आले आणि त्याने ते पाहिले. त्यानंतर तो ऊठला आणि गल्लीबोळातून तो सुकेवाडी परिसराकडे चालत गेला. त्यानंतर त्यानंतर त्याला ज्या ठिकाणी लोकेशन दिले होते. तशा पद्धतीने तो गेला असता त्याचा संबंधित व्यक्तींनी दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी घात केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी (दि.९) पहाटेच्या वेळी त्याला सुकेवाडी परिसरातून मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍या काही व्यक्तींनी पाहिले असता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली होती. तेव्हापासून ते आजवर या खुनाचे गुढ कायम होते. ते आजवर...!!

मोर्चा व पोलीस प्रशासन मुर्दाबाद.!

संकेत नवले या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर अकोले तालुक्यातून प्रचंड मोठा उद्रेख पहायला मिळाला. कारण, खुन झाला मात्र आरोपी मोकाट होते. का, कधी, केव्हा, कोठे, कसे? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत होेते. तर, पोलिसांच्या पथकांना देखील यश येत नव्हते. तपास चालु आहे. असे म्हणून पोलीस देखील हतबल झाले होते. त्यामुळे, अकोल्यातील नवलेवाडी ते तहसिल कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. हत्येचे कारण नसल्यामुळे, कोणी नक्षलवादी संघटन, सायबर क्राईम, दशहतवाद, तर नरेंद्र दाभोळकर आणि कलबुर्गी यांच्यापर्यंत जाऊन त्या दृष्टीने गुन्ह्याची उकल करण्याची मागणी करण्यात आली होती. दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी मोर्चा काढून पोलिसांचा जाहिर निषेध करण्यात आला होता. मात्र, सहकार्याची भावना म्हणून काही दिवस देण्यात आले. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी तपास होण्यासाठी नंतर जसा तगादा आवश्यक होता. तो दिसला नाही. नंतर मात्र तपासात बरेचशे चित्र क्लेअर झाले होते. प्रतिक्षा होती ती फक्त सबळ पुराव्याची. त्यानुसार आज पोलिसांनी त्यावर तपासाची मोहर लावली असून अत्यंत नाजुक कारण समोर आले आहे.

तपास यंत्रणा थकून गेली होती..!

दि. ९ डिसेंबर २०२२ ते दि. ४ फेब्रुवारी २०२३ या काळात संकेत नवले याची हत्या करणार्‍यांचा शोध घेण्यास पोलिसांनी फार प्रयत्नांची पराकष्टा केली. काही ठिकाणी तपास भर्कटला तर काही ठिकाणी तपास योग्य मार्गाने पुढे जात होता. मात्र, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक टिमा ह्या सायमल टेनिसने तपास करीत होत्या. त्यामुळे, एका पथकाला योग्यते यश मिळाले. मात्र, या दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेणष शाखा, अप्पर पोलीस अधिक्षक, पोलीस उपाधिक्षक, पोलीस निरीक्षक संगमनेर, त्यांची डीबी अशा अनेक पथकांनी यात प्रचंड मेहनत घेतली. नंतर हा तपास टेक्निकल मुद्द्यावर येऊन अडकला असता. काही विशिष्ट व्यक्तींनी यात फार खोलवर जाऊन या गुन्ह्याची निर्गती केली आहे. त्यामुळे, फार गंभीर पण प्रचंड गुंतागुंतीचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हा अन्य गुन्ह्यांपेक्षा फार वेगळा होता. त्यामुळे, खरोखर पोलीस अधिक्षक राकेश ओेला साहेब यांच्या पोलीस पथकांचे कौतुक करावे तितके कमीच म्हणावे लागणार आहे. 

- सागर शिंदे