महाराष्ट्र ग्रामीण बॅंक घोटाळा, कोरोना काळात 31 खातेदारांसह गोल्ड व्हॅल्यूअरने बॅंक लुटली, बनावट सोने ठेऊन 69 लाखांचा फ्रॉड केला, 32 जणांवर गुन्हे दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरात एकीकडे अधिकारी-कर्मचारी छोट्या मोठ्या लाचखोरीत पकडत आहे तर संगमनेर तालुक्यात अनेक पतसंस्था- बँकेत घोटाळे घडत आहेत. त्यामुळे, येथे किती लाचखोरी बोकाळली आहे हे नव्याने सांगायला नको. आज पुन्हा एक घोटाळा उघडकीस आला आहे. शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा संगमनेर या बँकेत 32 खातेदारांनी बनावट सोने ठेऊन बँकेची 68 लाख 94 हजार रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना कोरोनाकाळात 30 जुलै 2020 ते 13 जानेवारी 2023 दरम्यान घडली. एकीकडे लोक घराच्या बाहेर पडत नव्हते तर दुसरीकडे आरोपी बनावट सोने ठेऊन पैसा उकळत होते. हे बँक शाखेचे प्रबंधक नंदकिशोर म्हस्के यांच्या लक्षात आले त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून 32 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये आरोपी सविता दिपक जाधव (रा.मालदाड रोड संगमनेर), दिपक दत्तात्रय जाधव (रा. महात्माफुलेनगर,संगमनेर), रविंद्र रमेश राजगुरू (रा. मालदाडरोड, गणेशविहार कॉलनी, संगमनेर), संदिप नंदू कलांगे (रा.बडोदाबँक कॉलनी,पोकळेमळा,संगमनेर), आयुब उस्मान पठाण (रा.लखमीपुरा संगमनेर), प्रकाश मारुती तुपसुंदर (रा.घुलेवाडी,माझेघर हाऊसिंग सोसायटी,संगमनेर), स्वप्नील भास्कर पगार (रा.चिंचवली गुरव,संगमनेर), संजय बद्रीदास बैरागी (रा.दत्ता देशमुख नगर,ऐश्वर्या पेट्रोलपंप,संगमनेर), विजय भास्कर अवचिते (रा.पावबाकीरोड मारुती मंदिरा जवळ, संगमनेर) प्रतिक नानासाहेब केरे (रा. संगमनेर रोड, संगमनेर) कैलास रामनाथ शिरसाठ (रा.साखरकारखानारोड,पानसरेमळा, घुलेवाडी) ताराबाई रावजी घुगे (रा. नाशिक पुणे रोड, संगमनेर) नानासाहेब भागवत राऊत (रा.घुलेवाडी,ता.संगमनेर), मारुती अण्णासाहेब मंडलीक (रा.रायतेवाडीफाटा,माळीनगर, संगमनेर) वैभव प्रकाश वाकचौरे (रा. माझेघर सोसायटी,घुलेवाडी संगमनेर), राहुल शिवाजी गायकवाड(रा.वेताळेश्वर, घोडेकरमळा, कसारवाडी रोड, संगमनेर) प्रसाद संजय वर्पे (रा.वरवंडी, ता. संगमनेर), लखन शांताराम कडलग (रा.वडगावपान, ता. संगमनेर), विशाल अनिल उगले (रा.डोंगरगाव, ता. संगमनेर), मछिद्र एकनाथ मंडलीक (रा.जाणतानगर रोड, संगमनेर), सागर गोरक्ष अवचिते (रा. शिबलापुर,ता. संगमनेर) कोमल राजेंद्र जगधने (रा.वाकडी,ता.राहता), कृष्णा भाऊसाहेब गाढवे ( रा. घुलेवाडी, संगमनेर), सुधीर रावसाहेब घुगे (रा.अमृतनगर घुलेवाडी, संगमनेर), प्रदिप विठ्ठल गाडेकर (रा. मालुंजे,संगमनेर), जगदीश सुभाष म्हसे (रा.स्वामी समर्थनगर,संगमनेर), अमृतराज किसन वाघमारे (रा.खराडी,संगमनेर), संदिप पंढरीनाथ घुगे (रा. मालुंजे, संगमनेर),दत्तु खंडू साळवे (रा.पिंपारने, संगमनेर), गणेश भाऊसाहेब अवचिते (रा.मालुंजे, संगमनेर), पुष्पा राजेश पवार (रा.घुलेवाडी, संगमनेर), प्रा. जगदीश सहाणे (रा. संगमनेर) आशा 32 जणांवर फसवणुकीच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा संगमनेर ही एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत दि. 18 जानेवारी 2023 रोजी सोन्याचे ऑडीट आणि सोन्याच्या दागिन्यांचे पुनरमूल्यांकन केले. पुनरमूल्यांकनाच्या उद्देशाने बँकेतील संगमनेर शाखेच्या तीनही सुवर्ण मूल्याधारकांना बोलवले. या गोल्ड ऑडीट मध्ये 33 बनावट सोन्याचे पाकीट आढळले. राजमनी ज्वेलर्सचे जगदीश लक्ष्मण शहाणे यांची 5 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांना बँकेने गोल्डव्हॅल्युअर म्हणुन नियुक्त केले. आरोपी जगदीश शहाणे यांनी शेवटचे नुतनीकरण दि. 12 फेब्रुवारी 2020 रोजी केले गेले आहे. जे 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैध आहे. बँकेने दि. 10 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या करारानुसार गोल्डलोन मूल्यांकनामध्ये कोणत्याही गैरव्यवहारासाठी गोल्डव्हॅल्युअर जगदीश शहाणे जबाबदार आहे.
दरम्यान, या कालावधीत आरोपी जगदीश शहाणे यांनी 127 गोल्ड लोनचे मुल्यमापन केले आहे. या 127 गोल्ड लोनमधुन गोल्ड ऑडीट मध्ये 31 खातेदारांनी सोने बनावट ठेवल्याचे ऑडीट मध्ये आले आहे. या 31 खातेदारांनी ठेवलेल्या बनावट सोन्याची किंमत 68 लाख 94 हजार आहे. जी दि. 18 जानेवारी 2023 पर्यंत 72 लाख 82 हजार 652 रुपये थकबाकी झाली आहे. त्यामुळे, सोने तारण मध्ये बँकेची प्रचंड लुट सुरू होती. स्वतःच्या फायद्यासाठी गोल्ड व्हॅल्युअर खातेदरांशी संगनमत करून पैसे उकळण्याचा घाट घालत होता. आरोपी जगदीश शहाणे याने पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक लाभापोटी बँकेची फसवणुक करत असल्याचे उघड झाले. जेव्हा हे गोल्ड ऑडीट मध्ये उघड झाले तेव्हा गोल्ड व्हॅल्युअर जगदीश शहाणे व 31 खातेदारांचे पितळ उघडे पडले. बँकेची लुट जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. शाखा प्रबंधक नंदकिशोर म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 32 जणांवर विविध कलमान्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आता या अपहाराची रक्कम मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होऊ शकतो.