जेवताना छत कोसळले, चिमुकलीसह दोघांचा मृत्यु, महिला जखमी, बंगल्याच्या वरंडीने पडवी कोसळली.! व्हिडिओ पाहून काळीच तुटेल.!

  


सार्वभौम (संगमनेर) :- 

घरावर पत्रा बसविण्यासाठी शेजारील बंगल्याची वरंडी कोरुन ठेवली होती. मात्र दिर्घकाळ काम प्रलंबित असल्याने ती खचली आणि थेट शेजारील पडविच्या छतावर कोसळली. खाली तिघेजण जेवण करत असताना त्यांच्या अंगावर पत्रा आणि वरंडी पडली. यात इयत्ता दुसरीत शिकणार्‍या चिमुरडीचा आणि तिच्या चुलत्याचा जीव गेला असून आजी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात घडली. यात सानिका सोनवणे (वय ७), लक्ष्मण चंद्रकांत सोनवणे (वय ४२) ही दोघे मयत झाले असून वैजयंताबाई सोनवणे (वय ६८) ही जखमी झाली आहे. महिलेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, शुक्रवारी वेल्हाळे गावातील सोनवणे कुटूंब हे सकाळी नियमीत प्रमाणे उठले होते. दिवसभर त्यांनी आपल्या शेतात कष्ट केले. तर, रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आजीने स्वयंपाक केला असता लक्ष्मण व त्यांची पुतणी सानिका हे शेजारी-शेजारी जेवण करण्यासाठी बसले होते. आजीने दोघांना वाढून दिले आणि दोन घास सुखाचे व कष्टाचे खात असताना अचानक काळाने घाला घातला. चुलता पुतणी जेवण करीत असताना अचानक फार मोठा आवाज झाला आणि शेजारील बंगल्याची जी वरंडी होती. ती पत्र्यावर कोसळली. पत्रे हे सिमेंटचे असल्याने त्याचा खिळखिळा झाला आणि टणक वरंडी थेट या दोघांच्या डोक्यात पडली.

दरम्यान, आजी थोड्या लांब आंतरावर बसलेल्या होत्या. त्यामुळे, त्यांच्यापर्यंत वरंडीचा धोका गेला नाही. मात्र, सिमेंटच्या पत्र्यामुळे आजी गंभीर जखमी झाल्या. जेव्हा हा प्रकार जवळच्या लोकांनी पाहिला. तेव्हा, अनेकांनी संबंधित घराकडे धाव घेतली. पटापट पत्रे बाजुला करण्याचा प्रयत्न केला. तर, जी वरुंडी पडली होती. तिचे दगड, विटा, सिमेंट बाजुला करुन तिघांचा शोध घेतला. त्यावेळी सानिका आणि लक्ष्मण हे रक्ताळलेल्या आवस्थेत पडलेले होते. तर, आजी शुद्धीवर होत्या. उपस्थित व्यक्तींनी तिघांना तत्काळ  रुग्णालयात हलविले. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. यात चिमुरडी आणि तिच्या चुलत्याला आपला जीव गमवावा लागला आहे.


कशी घडली घटना.!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण, सानिका आणि वैजयंता हे ज्या पडवीत बसले होते. त्याच्या शेजारी एक बंगला आहे. त्या बंगल्याची जी वरुंडी असते ती काही दिवसापुर्वी कोरुन ठेवली होती. कदाचित त्यांना त्यात पात्रा टाकायचा होता. मात्र, ते काम प्रलंबित होते. त्यामुळे, कोरुन (ऊकरुन) ठेवलेली वरंडी खचली आणि थेट शेजारील पडविवर कोसळली. त्यामुळे, पत्रा आणि दगड, विटा, सिमेंट यामुळे टणक झालेले गोळे थेट दोघांच्या आंगावर पडले आणि त्यांना गंभीर मार लागला. त्यात लक्ष्मण आणि सानिकाचा मृत्यु झाला तर आजी जखमी झाली आहे. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. तर, आजीवर अद्याप उपचार सुरू आहे.