डॉक्टर लहामटेंचे राजूर व्हेंटीलेटरवर.! सरपंच लग्नात मग्न, नागरीक कोवीळने त्रस्त, ग्रामसेवक बडतर्फ व्हावा, ४ महिने टाकी धुतलेली नाही.!
सार्वभौम (राजूर) :-
ग्रामपंचायतीने नागरीकांना दुषीत पाणी पाजल्यामुळे अकोले तालुक्यात राजूर येथे १७० पेक्षा जास्त लोकांना कावीळचा प्रादुर्भाव झाला. यात प्रियंका हरिभाऊ शेंडे या २० वर्षाय विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला. आता मोठे खेदाने म्हणावे लागते. की, अकोले तालुक्याचे आमदार हे डॉक्टर असून ते रहायला राजूरमध्ये आहे. ही घाणेरडे पाणी पुरविणारी ग्रामपंचायत त्यांच्याच ताब्यात असून आम्ही राजुरचे आरोग्य, रस्ते, पाणी, शिक्षण सुधारले असे हजारदा त्यांच्या तोंडून ऐकले आहे. मात्र, दुर्दैवाने राजुरमध्ये शेकडो नागरिक कावीळशी झुंज देत असताना आमदारांनी नेमलेल्या सरपंच पुष्पाताई निगळे या पुण्याला जाऊन लग्नात वरमाई म्हणून मिरवत होत्या. ग्रामपंचायतीची टाकी चार महिन्यांपासून धुतलेली नव्हती. ग्रामसेवक राजेंद्र वर्पे मलिदा खाण्यात व्यस्त होते. त्यामुळे, आमदार महोयदयांनी आता सरपंच निगळे ताई यांचा राजिनामा घेतला पाहिजे, कारण त्या स्वत:हून देणार नाहीत. आणि ग्रामसेवक वर्पे याला निलंबित नको तर तातडीने बडतर्फ केले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.
राजूर ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यापासून कायम वादात राहिली आहे. आम्ही आरोग्याचे याव केले त्याव केले असे म्हणत टिमकी वाजविणार्या ग्रामपंचायतीला साधे पिण्यासाठी स्वच्छ पाणी देखील देता आले नाही. फिल्टरचे मशिन बंद पडले ते देखील निट करता आले नाही. ते तर सोडा, चार महिने पाणी पुरवठा करणारी टाकी सुद्धा यांना धुता आली नाही. धरणातून पाणी उचलायचे आणि ते टाकीत टाकायचे तेथून उचलायचे आणि लोकांच्या गळी उतरवायचे असा हा भोंगळा कारभार राजूर ग्रामपंचायतीचा सुरू होता. आम्ही रस्ते करतो, झाडे लावतो, गटारी करतो, पाणी देतोय, झाडू हाती घेऊन स्वच्छता अभियानाचा आव आणतो असे म्हणत निव्वळ स्टण्टबाजी केली. असे म्हणतात की, बड्या बड्या बाता अन ढुंगान खाई लाथा यापेक्षा वेगळे काय आहे? आज अस्वच्छ पाण्यामुळे एका लेकराचा जीव गेला, १७० नागरीक कावीळ बाधित आहेत, या आजाराचे दुष्परीनाम बाधित लोकांना आयुष्यभर भोगावे लागणार आहे. राजूरमध्ये आरोग्याची मुबलक सुविधा नाही, बरं तेथून पेशन्ट काढले तर अकोल्यात देखील दवाखाना नाही, खाजगीत पैसा देण्याची सामान्य नागरिकांची परिस्थिती नाही. त्यामुळे, अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर असेल तरी त्यांचे गाव आणि तालुका आरोग्याच्या बाबतीत पुर्णत: व्हेंटीलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.!
दुषीत पाणी पाजल्यानंतर नागरिकांना साथीचे रोग होऊ शकतात, त्यांना मृत्युला सामोरे जावे लागेल, किंवा चार-चार महिने पिण्याच्या पाण्याची टाकी धुतली नाही तर विविध आजार होऊन ते जीवघेणे ठरू शकतात अशी कल्पना असताना सुद्धा ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच या जबाबदार व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून एका मुलीला आपला जीव गमवावा लागला तर १७० पेक्षा जास्त नागरिक बाधीत झाले. याला दोषी कोण? त्यामुळे, ग्रामसेवक यांना बडतर्फ करुन शासनाने फिर्यादी होऊन सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. कारण, हा अक्षम्य गुन्हा आहे. यांच्यामुळे, संपुर्ण राजूर आज आरोग्याशी झुंज देत आहे. लोक ग्रामपंचायतीचे पाणी पीत नसून बिस्लरी घेऊन पाणी पीणे पसंत करीत आहेत. इतका अविश्वास जनता दाखवू लागली आहे.
निगळे ताई नैतिकता स्विकारुन पायऊतार व्हा.!
आपल्या नाकर्तेपणामुळे आज एका लेकराचा जीव गेला आहे. त्यात दुर्दैव असे की, तिचा जीव जाऊ देखील ग्रामपंचायत म्हणते की, ती आजारीच होती, ती अशक्तच होती, तिला अन्य आजार होते, म्हणजे स्वत:च्या अकार्यक्षमतेचा ठपका पुसण्यासाठी वास्तवाला पडद्याआड करायचे हे योग्य नाही. उद्या हे १७० कावीळ बाधित किवा उपचार घेत असणारे १९ जण देखील जुलाबाने त्रस्त होते यांना काहीच झाले नव्हते अशी चर्चा करायला मागेपुढे पाहणार नाही. लोकांचे आरोग्य धोक्यात आहे, लेकराचा जीव गेला आहे, तुम्ही स्वच्छ पाणी आणि जबाबदारीने नागरिकांची काळजी घेऊ शकल्या नाही. त्यामुळे, आपण ही नैतीक जबाबदारी स्विकारून सरपंच पदाचा राजिनामा दिला पाहिजे अशी मागणी राजुरच्या नागरिकांनी केली आहे.
ग्रामसेवक निलंबित नको, बडतर्फ करा.!
२० हजार लोकसंख्येचे गाव, १७ ग्रामपंचायत सदस्य आणि १८ वी सरपंच, तीन माध्यमिक शाळा, एक महाविद्यायल, एक मराठी शाळा असे २ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना पाण्याची सुविधा ग्रामपंचायत देऊ शकत नाही. जर विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत असेल, आजारांना सामोरे जावे लागत असेल, नागरीकांना पाण्यामुळे आजार उद्भवत असेल तर ग्रामविकास अधिकारी काय कामाचे आहेत? सरपंच काय कामाचे आहेत? त्यामुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब हे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे चांगले प्रचलित आहेत. त्यांना राजेंद्र वर्पे यांना केवळ निलंबित नको तर खात्यातून बडतर्फ केले पाहिजे. तशा प्रकारची कायद्यात प्रोव्हीजन आहे, जर यांच्यावर कठोर कारवाई झाली तर भविष्यात पुन्हा असेल साथीचे आजार उद्भवनार नाही यासाठी स्वत: ग्रामविकास अधिकारी प्रतिबंधात्मक कारवाई करतील. त्यामुळे, वर्पे यांना बडतर्फ करावे अशी मागणी होत आहे.