तु येथे का आला, आम्ही चंद्रशेखर चौकाचे बाप आहोत, चल निघ इथून असे म्हणत हनुमान जयंतीत राडा, पुन्हा दहा जणांवर गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम(संगमनेर) :-

                    हनुमान जयंती निमीत्त मानाच्या रथाची सलामी देण्यासाठी वादन पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला तुम्ही येथे कशाला आलात. आम्ही चंद्रशेखर चौकाचे बाप आहोत. तु येथुन निघुन जा असे बोलुन शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीत तरुणांच्या जवळ येत तुम्हाला काल रात्रीच येथे येऊ नका हे सांगितले असताना तुम्ही कशाला आलात असे बोलुन लथाबुक्यांनी  मारहाण करून त्यातील एका जनाने गळ्यातील सोन्याची चैन ओढुन तुम्ही जर आमच्या विरुद्ध तक्रार केली. तर तुमचे घर पेटुन देऊ अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि.11 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता ते शनिवार दि.12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ललित शरद शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आरोपी कमलाकर विश्वनाथ भालेकर, योगीराज कुंदनसिंह परदेशी, चेतन विलास तारे, अक्षय अविनाश थोरात हर्ष शामसुंदर जोशी, शामसुंदर रामेश्वर जोशी, गिरीष राजेंद्र मेंद्रे, श्रीराम अरविंद गणपुले, भगवान तुकाराम गीते, शुभम चंद्रकांत लहामगे (सर्व. रा.संगमनेर शहर, ता. संगमनेर) असे दहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनुमान जयंती निमीत्त मानाच्या रथासाठी सलामी देण्यासाठी काही वादक बोलवले होते. ते पाहण्यासाठी फिर्यादी ललित शिंपी व त्याचा मित्र ललित परदेशी हे चंद्रशेखर चौकात गेले. तेथे कमलाकर भालेकर, योगीराज परदेशी, चेतन तारे, अक्षय थोरात, हर्ष जोशी हे तेथे उभे होते. यामधील कमलाकर भालेकर यांनी फिर्यादी ललित शिंपी यांना विनाकारण शिवीगाळ करून, तु येथे का आलास असे म्हणुन आम्ही चंद्रशेखर चौकाचे बाप आहोत. तु येथुन निघुन जा, नाहीतर तुला पाहुन घेईल. अशी धमकी दिली. त्यानंतर वाद नको म्हणुन फिर्यादी ललित शिंपी हा तेथुन निघून गेला.

          दरम्यान, दुसऱ्या दिवशी 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जयंतीचा रथ पाहण्यासाठी व हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी फिर्यादी ललित शिंपी व त्याचे मित्र दरवर्षीप्रमाणे चंद्रशेखर चौकात आले. तेथे येताच योगीराज परदेशी हा फिर्यादी ललित शिंपी यांच्या जवळ येऊन म्हणाला. की, तुम्हाला काल रात्री येथे येऊ नका म्हणुन सांगितले होते. तरी तुम्ही येथे का आलात. असे म्हणुन योगीराज परदेशी शिवीगाळ करू लागला. फिर्यादी ललित शिंपी व मित्र समजुन सांगण्याचा प्रयत्न करत असताना कमलाकर भालेकर, योगीराज परदेशी, चेतन तारे, अक्षय थोरात,हर्ष जोशी,शामसुंदर जोशी,गिरीश मेंद्रे,श्रीराम गणपुले,भगवान गीते,शुभम लहामगे सर्व जण तेथे आले. तुम्हाला पाहुन घेऊ अशी धमकी देऊ लागले. तेव्हा फिर्यादी ललित शिंपी हा पुन्हा समजुन सांगत होता की, मी दरवर्षीगाव मारुतीच्या दर्शनाला येत असतो. आज देखील दर्शनासाठी आलो आहे. असे सांगत असताना पुन्हा लाथा बुक्यांनी मारहाण सुरू केली. 

           दरम्यान, हे दहा जण मारहाण करत असताना त्यातील हर्ष जोशी याने फिर्यादी ललित शिंपी याच्या गळ्यातील चैन ओढली. त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या लोकांनी त्यांच्या तावडीतून सोडले. मात्र, तुम्ही जर आमच्या विरुद्ध तक्रार करत बसले तर तुमचे घर पेटुन देऊ अशी फिर्यादी ललित शिंपी याला धमकी दिली. त्याने आज रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी कमलाकर विश्वनाथ भालेकर, योगीराज कुंदनसिंह परदेशी, चेतन विलास तारे, अक्षय अविनाश थोरात हर्ष शामसुंदर जोशी, शामसुंदर रामेश्वर जोशी, गिरीष राजेंद्र मेंद्रे, श्रीराम अरविंद गणपुले, भगवान तुकाराम गीते, शुभम चंद्रकांत लहामगे (सर्व. रा.संगमनेर शहर, ता. संगमनेर) असे दहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.