तुला ठारच करतो असे म्हणत शेतकऱ्याच्या डोक्यात चाकूने वार, भर चौकात हाफ मर्डर, सराईत आरोपींवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील लोहारे गावात चाकू घेऊन दहशत करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला शेतकरी रस्त्याने पाहायला गेला. गाडीच्या खाली उतरताच डोक्यात व हातावर चाकूने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि.12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता लोहारे गावातील अवजीनाथ बाबा मंदिरा समोर चौफुलीत घडली. यामध्ये अनिल गणपत आहेर हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दिपक पोकळे (रा. लोहारे, ता. संगमनेर) व एक अनोळखी इसमावर हाफ मर्डरसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिल आहेर हे लोहारे येथील रहिवासी आहेत. त्यांचा शेती व दुग्ध उत्पादनाचा छोटासा व्यवसाय आहे. ते गयांचा चारा पाणी आवरून दररोज गावातील दुध डेअरी मध्ये दुध टाकण्यासाठी मोटारसायकलवर जात असतात. शुक्रवार दि.12 सप्टेंबर रोजी देखील शेतातील सर्व काम अवरून गायांचे काम आवरले. ते दूध टाकण्यासाठी रात्री 8 वाजता गावात आले. दुध डेअरीवर दुध टाकल्यानंतर ते घराकडे जात असताना गावातील अवजीनाथ बाबा मंदिरा समोर चौकात मोठ्या प्रमाणात आरडा ओरडा सुरू होता. लोक मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. तेथे दोन तरुणांच्या हातात चाकू काढुन दहशत करत होते.
दरम्यान, अनिल आहेर यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावली. ते गर्दीच्या दिशेने गेले. तेथे जाताच आरोपी दिपक पोकळे हा बोला की, ये आहेरच्या पोरा तुला लय झालं का? मला विरोध करतो का? असे म्हणुन त्याने अनिल आहेर यांच्या डोक्यात, डाव्या हाताच्या बाजुस धारधार चाकूने सपासप वार करून म्हणाला की, आहेरच्या पोरा तुला आज जिवंत सोडत नसतो. तु मला आडवा आला आहे. दुसऱ्या अनोळखी इसमाने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु ते चुकवले. आरोपी दिपक पोकळे याने डोक्यात गंभीर घाव केल्याने अनिल आहेर रक्तबंबाळ अवस्थेत खाली चक्कर येऊन पडले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला तेथुन आरोपी दिपक पोकळे व त्याच्या मित्राने धुम ठोकली.
दरम्यान, अनिल आहेर हे गंभीर अवस्थेत जखमी झाले. त्यांच्या कुटुंबाला समजल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी अनिल आहेर यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. ते शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून आरोपी दिपक पोकळे (रा. लोहारे, ता. संगमनेर) एक अनोळखी इसम यांच्यावर हाफ मर्डरसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. खरंतर, रेकॉर्डवरील आरोपी खुलेआम चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करतो. सर्वांसमोर दमबाजी करतो. तेथून जमावा पुढून निघुन जातो तरी देखील पोलिसांना तपास लागत नाही. तासन तास उलटुन देखील अद्याप या आरोपीला पकडण्यात तालुका पोलीस अपयशी ठरली आहे.
