अकोले नाक्यावर सराईत गुन्हेगारांची खुलेआम दहशत, तरुणास दगडाने अमानुष मारहाण, चौघांवर गुन्हा, सगळे मोकाट.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 
                     संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात पुन्हा एकदा दहशतखाली असल्याची प्रचिती पाहायला मिळाली. रस्त्यावररून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या चार पाच दगडे डोक्यात मारून संपूर्ण डोके रक्तबंबाळ करून ठार मारण्याचा उद्देशाने प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार काल शनिवार दि.19 एप्रिल 2025 रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमार घडला. यात निलेश सोमनाथ मंडलीक (वय 36) यांच्या डोक्यात दगडाचा घाव घातला असुन त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजन आहे. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादी वरून अनिकेत मंडलीक (रा.माळीवाडा, ता. संगमनेर), साई सुर्यवंशी,अक्षय चव्हाण (दोघेसागर हॉटेल शेजारी, अकोले नाका, ता. संगमनेर)एक अनोळखी इसम आशा चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर, हे सर्व रेकॉर्डवरील आरोपी असुन वारंवार अकोले नाका परिसरात आपली दहशत निर्माण करत आहे. तरी देखील पोलिसांचा किंचितही धाक या परिसरात राहिला नसुन गुन्हेगारी प्रवृत्ती वेगाने फोफावली जात आहे. त्यामुळे, सामान्य माणसांना जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. इतकी गंभीर स्वरूपात मारहाण करुन आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे, संगमनेर शहरातील पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यावर पुन्हा एकदा जनतेने नाराजी व्यक्त केली असुन आमदार साहेब आढावा बैठकांबरोबर जनतेच्या सुरक्षे बद्दल एक बैठक घ्या अशी आर्त हाक संगमनेर शहरातील नागरिकांनी दिली आहे.
            याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवार दि. 19 एप्रिल 2025 रोजी रात्री 7:30 वा. सुमारास फिर्यादी सचिन नाईक हे संगमनेर येथे मोटारसायकलने येत असताना अकोले नाका परिसरात मारहाण सुरू होती. तेथे थांबुन पाहिले असता निलेश मंडलिक याला लाथाबुक्यांनी अनिकेत मंडलीक, साई सुर्यवंशी, अक्षय चव्हाण व एक अनोळखी असे चौघेजण बेदम मारहाण करत होते. तेव्हा तेथे निलेश मंडलीक हा मोठ्याने ओरडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे व दुकानदारांकडे मदत मागत होता. त्यावेळी मदतीसाठी लोक जाऊ लागले. मात्र, अनिकेत मंडलीक, साई सुर्यवंशी, अक्षय चव्हाण व एक अनोळखी व्यक्तीने मदतीला येणाऱ्या लोकांना दम दिला. जर कोणी मध्ये पडला तर त्याला जिवंत सोडणार नाही.
          दरम्यान,  या गुंड प्रवृत्तीच्या रेकॉर्डवरील आरोपींची अकोले नाका परिसरात दहशत असल्याने  दुकानदारांनी घाबरून आपली दुकाने बंद केली. तर रस्त्याने येणारे जाणारे लोक सैरभैर होत पळत होते. तेव्हा निलेश मंडलीक याला आज मारूनच टाकु असे ओरडुन बोलत असताना. आजूबाजूचे दगड हातात घेऊन निलेश मंडलीक यांच्या डोक्यात मारू लागले. चार ते पाच दगड निलेश मंडलीक यांच्या डोक्यात लागल्याने संपूर्ण डोके रक्तबंबाळ अवस्थेत झाले. आपल्या जीवांच्या आकांताने निलेश मंडलीक हा दगड हुकवत पळू लागला. तेथे मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याने  तेथून अनिकेत मंडलीक, साई सूर्यवंशी, अक्षय चव्हाण व एक अनोळखी इसम तेथुन पळुन गेला. त्यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत असलेला निलेश मंडलीक याला खाजगी दवाखान्या मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले. तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याचे नातेवाईक सचिन नाईक यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जाऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अनिकेत मंडलीक (रा.माळीवाडा, ता. संगमनेर), साई सुर्यवंशी,अक्षय चव्हाण (दोघे सागर हॉटेल शेजारी, अकोले नाका, ता. संगमनेर)एक अनोळखी इसम आशा चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
       
दरम्यान, शांत, संयमी व सुसंस्कृत संगमनेरात अशांततेने हैदोस माजविला आहे. पोलिसांसमोरच मारहाणीचे प्रकरण घडत आहेत. हनुमान जयंतीला रथा समोरच वाद झाले. शिव जयंतीला जागे वरून वाद चालले. हिंदु-मुस्लिम वारंवार घडले. शांतता मिटींग देखील अशांततेत होत आहे. निवेदन देण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली. तर सामन्यांना गुंडाकडून दगडाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे, संगमनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था वेशीला टांगली आहे. खरंतर, नेत्यांनी राजकारण आणि मतांची गोळाबेरीज थोडी बाजुला ठेवून पोलिसांच्या मध्यस्तीने बैठका घेऊन हे तणावपुर्ण वातावरण कमी केले पाहिजे. हे असेच चालु राहिले तर संगमनेरात मुले-मुली शिक्षणासाठी येणार नाही, लोक बाजारपेठेत येणार नाहीत. परिणामी आजचे सुजलाम सुफलाम संगमनेर उद्या ओसाड पडलेले दिसू शकते. त्यामुळे, येथे रक्तरंजित कहाण्या घडण्यापुर्वी येथील ऐतिहासिक घटनांनी या शहराची ओळख कायम रहावी म्हणून शहाण्यांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढावा असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.