लाठ्या, काठ्या, रॅड आणि शस्रास्राने केली सिंहगर्जना.! थोरात आ.तांबेंच्या नगरसेवकांची पुन्हा दहशत, विरोधात प्रचार केल्याने जबरी मारहाण, 17 जणांवर गुन्हे.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील नगरपालिकेत नगरसेवक निवडून येत नाही तेच वादात सापडत असल्याचे समोर येऊ लागले आहे. अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला म्हणुन घरासमोर डीजे, फटाके वाजूवन "इनको बाहर खिंचो, और मारो" आशा घोषणा देऊन नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांसह नगरसेवकाने लोखंडी रॉड, बेसबॉल स्टिक,चॉपरने मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये मुजीब शाहबुद्दीन शेख व साद रहिम शेख हे गंभीर जखमी झाले असुन त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सलीम हाजी शेख, नुर मोहम्मद शेख, इमरान गणी शेख, शेजाज सलीम शेख, दानिश सलीम शेख, सलमान सलीम शेख, वसीम अब्दुल रेहमान शेख, उमेर अलीम हाजी, जमील अजीज पठाण, ययाखान समशेरखान पठाण, अदनान शाहिद शेख, जिशान शाहिद शेख, सरजिल महमद शेख, अलीम हाजी शेख, नइम रहमान शेख, तलहा कलीम शेख, रिजवान उस्मान शेख (रा. भारतनगर,ता. संगमनेर) यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर, एकीकडे संगमनेर 2.0च्या दिशेने वाटचाल करायची. नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून स्वछता करायची आणि दुसरीकडे नगरसेवकांनी झुंडशाही करून बेसबॉलच्या दांडे डोक्यात टाकायचे ही दहशत नसुन तर काय आहे? त्यामुळे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि आ. सत्यजीत तांबे यांच्या नगरसेवक दहशत करत असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुजीब शेख हे संगमनेर शहरातील भारत नगर येथील रहिवासी असुन रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेजारी राहणारे शादाब शेख हे नगरपालिकेला अपक्ष उमेदवार उभे होते. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार नुरमोहम्मद शेख यांच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर मिरवणूक काढून त्यामध्ये प्रचंड गोंधळ घातला घोषणाबाजी केली. त्यावेळी निवडणूकीचा जल्लोष आहे म्हणुन पिडीत मुजीब शेख हे शांत बसले. परंतु, काल दि. 22 डिसेंबर रोजी पिडीत मुजीब शेख हे घरी असताना रात्री 9:30 वाजता नव्याने नगरसेवक निवडून आलेले नुरमोहम्मद शेख हे गल्लीमध्ये मिरवणुक घेऊन आले.
दरम्यान, ही मिरवणुक गल्लीमध्ये आली. ती पिडीत मुजीब शेख यांच्या घरासमोर जात होती. त्यावेळी मिरवणूकीमधील कार्यकर्त्यांनी अपक्ष पराभूत उमेदवार शादाब शेख व पिडीत मुजीब शेख याना शिवीगाळ सुरू केली. मिरवणुकीतुन फटाके वाजवुन मज्जा करू लागले. त्यानंतर इनको बाहर खिचो और मारो आसे नगरसेवकांचे कार्यकर्ते घोषणा देऊ लागले. त्यावेळी शेजारी राहणारा अल्पवयीन मुलगा हा वादाचा आवाज एकूण बाहेर आला. त्याने मोबाईलद्वारे व्हिडीओ काढण्यास सुरवात केली. त्याचा राग मनात धरून मारहाण करून धक्काबुक्की केली. त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी महिला आली त्यांना देखील धक्काबुक्की होऊ लागली. त्यावेळी पिडीत मुजीब शेख हे देखील आले त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लोखंडी रॉड व बेस बॉलच्या स्टिकने बेदम मारहाण केली. त्यांच्या सोबत असणाऱ्या साद शेख यास चॉपरने मारहाण केली यावेळी ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडले.
दरम्यान, मारहाण झालेल्या तरुणाला व मुजीब शेख याना खाजगी दवाखान्यात दाखल केले. ते शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना जबाब दिला त्यानंतर आरोपी सलीम हाजी शेख, नुर मोहम्मद शेख, इमरान गणी शेख, शेजाज सलीम शेख, दानिश सलीम शेख, सलमान सलीम शेख, वसीम अब्दुल रेहमान शेख, उमेर अलीम हाजी, जमील अजीज पठाण, ययाखान समशेरखान पठाण, अदनान शाहिद शेख, जिशान शाहिद शेख, सरजिल महमद शेख, अलीम हाजी शेख, नइम रहमान शेख, तलहा कलीम शेख, रिजवान उस्मान शेख (रा. भारतनगर,ता. संगमनेर) यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
