पत्रकाराच्या हस्ते खडी क्रेशर चालकाकडून 50 हजारांची लाच घेऊन तलाठी धुमचकाट पळाला, पत्रकार शेख अटक, गुन्हा दाखल.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील मांडवे गावामधील तलाठ्याने एका पत्रकाराची मध्यस्ती टाकुन क्रेशर मधील खडी वाहणाऱ्या गाडी मालकाकडून पन्नास हजारांची लाच घेतल्याचा खळबळजनक प्रकार बुधवार दि. 16 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मांडवे गावातील मारुती मंदिरा समोर घडला. यात मध्यस्थी करणारा तरुण रमजान नजीर शेख (रा. मांडवे.बु, ता. संगमनेर) यास लाच स्वीकारताना अटक केली असुन लाचखोर तलाठी अक्षय बाबाजी ढोकळे (रा. संगमनेर) हा फरार झाला आहे. या दोघांवर नाशिक लाचलुचपत विभागाने कारवाई केली असुन त्यांची संपत्ती, बँकखाते,घरझडती यासाठी पुढील प्रक्रीया सुरू केली आहे. यात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या नाशिक लाचलुचपत पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातील लाचखोर लिपीकास चार वर्षांची शिक्षा लागली. तरी देखील संगमनेरात लाच घेण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी येथील तक्रारदाराचा खडी वाहतुक करण्याचा मोठा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी याच मांडवे परिसरात या तक्रारदारांची गाडी धरून महसुल विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. या भागात अधिक व्यवसाय असल्याने तक्रारदार यांची खडीची गाडी येथुन नेहमी जाणार असल्याने त्यांनी कारवाई होणार नाही. या अपेक्षेने लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे यांना विचारणा केली. त्यांना विचारले असता त्यांनी दर महिन्याला 40 हजार रुपयांची मागणी केली. आपण महसूलच्या परवानग्या घेतल्या. सर्व रॉयल्टी भरली. मंग दरमहिन्याला पैसे कशासाठी द्यायचे? मात्र,तलाठी ऐकतील ते कसले? त्यांनी तक्रादराकडे दर महिन्याला 40 हजारांची मागणी करून आताचे 50 हजारांची मागणी केली. मात्र, तक्रादार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने त्यांनी थेट नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर नाशिकचे पथक थेट संगमनेरात दाखल झाले.
दरम्यान, तक्रारदार हे त्यांच्या मतावर ठाम होते. त्यामुळे, नाशिक लाचलुचपत विभागाने थेट मांडवे गावात सापळा रचला. तक्रादरा याना आरोपी रमजान शेख यांनी मांडवे गावातील मारुती मंदिराकडे बोलवले. त्यावेळी पन्नास हजारांची लाच घेताली. व लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे यांना फोन केला की, राहुरी येथील खडी वाहणाऱ्या मालकांनी पन्नास हजार दिले आहे. काय करू सांगितले असता उद्या बघु असे बोलुन लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे यांनी स्वीकारलेल्या लाचेस सहमती दर्शवली. ज्यावेळी, रमजान शेख यास लाच घेताना रंगेहात पकडले याचा कानोसा लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे याना लागला. ते घर सोडुन फरार झाले. काल संध्याकाळी सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोण आहेत का? यांनी यापूर्वी कोणाकडे अशी मागणीकेली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे. आशा प्रकारची पुढील कारवाई सुरू झाली.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे. याची प्रचिती येऊ लागली आहे. इथे नित्कृष्ट दर्जाचे कामकरून कोट्यावधीचा भ्रष्टाचारा होत असल्याचे पाहायला मिळते. जलजीवन मिशनचे असंख्य तक्रारी आहे. यामध्ये अनेकांचे हात मलिद्याने बरबटलेले आहे. आता तर रस्त्याच्या कामाला खडी, मुरूम न टाकता मातीवरच डांबर टाखल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. याची तक्रार देखील केली आहे. पण, तक्रारीची दखल घेतली ते अधिकारी कसले? त्यांचे हात जर मलिद्याने बरबटलेले असले तर ते काय कारवाई करणार असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ लोकांना पडला आहे. इथे कोट्यावधीचे विकास काम होत असले तर भ्रष्टाचार किती होतो हे न बोलले बर! त्यामुळे, येथे प्रत्येक शासकीय कार्यलयात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा संगमनेरातील सामाजिक कार्यकर्ते करत आहे. अगदी पोलीस खात्यात अधिकाऱ्यांपासुन ते कर्मचाऱ्यांपर्यंत छापे मारल्याचे संगमनेरात पाहायला मिळाले. येथील हप्तेखोरीची अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच काय! सर्कल पासुन ते तलाठी,कोतवाल यांच्यावर कित्येकवेळा ट्रॅप होताना दिसत आहे. त्यामुळे, ह्या वर्षी लाचखोरीत संगमनेर तालुका पुन्हा जिल्ह्यात "अव्वल" होतो की काय अशी चर्चा सुरू होत आहे.