संगमनेरात IG च्या पथकाचा छापा, 17 जणांना अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल, पुढारी कार्यकर्त्यांना बेड्या ठोकल्या.!


सार्वभौम सह्याद्री (संगमनेर) :-

                           संगमनेर तालुक्यात चक्क नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाने पत्याच्या क्लबवर छापा टाकला आहे. यात तब्बल 3 लाख 25 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन 17 जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे, संगमनेर तालुक्यात अवैध धंद्यांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे. येथे पोलीस उपअधीक्षक कार्यलय व संगमनेर तालुका पोलीस ठाणे अवघे काही अंतरावर असुन देखील आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. मात्र, नाशिक पथकाने येथे येऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल पकडला आलिशान हॉटेलमध्ये चालल्या क्लबवरील 17 जणांना आरोपी केले. तरी देखील तालुका पोलीस अनभिज्ञ असुन त्यांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. या गावामधून वरवांवर पत्याच्या क्लबला विरोध असताना देखील हा राजरोज चालू असल्याने या हॉटेल मधील क्लबला कोणाचा आशीर्वाद होता? असा प्रश्न उपस्थित होत असुन आता ग्रामस्थ देखील पुढे येत आहे. या भागातील सर्व अवैधधंदे बंद करा अशी मागणी होत आहे. तर पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पहिलीच सलामी दिली असुन येतो ट्रेलर है.! पिक्चर अभी बाकी है! अशीच सूचना त्यांनी नकळत दिली आहे. पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे यांनी ही दमदार कामगिरी केली.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील सांगवी हद्दीत रानवारा हॉटेल मध्ये पत्त्याचा मोठा डाव रंगत होता. येथे दिवसागणिक रोजच क्लबवर येणाऱ्यांची संख्या वाढत होती. याची खबर पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना लागली. त्यानंतर पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी विशेष पथक संगमनेर तालुक्यातील सांगवी हद्दीत पाठवले. त्यावेळी या पथकाने हॉटेल रानवारा येथे घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी तेथे 17 जण मिळून आले. ते खेळत असलेल्या पत्याच्या डावात पैसे देखील मिळुन आले. काही व्यक्तींकडे रोख रक्कम होती. पत्याचे डाव लिहलेले पान मिळून आले.मोटार सायकल, मोबाईल, 52 पत्यांचा कॅट असा एकुण 3 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर तालुका पोलीस ठाण्यात नेवून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली आहे.

        यामध्ये अंकुश मधुकर नालकर (रा.वाडेकर गल्ली, संगमनेर शहर. ता. संगमनेर), संदिप गंगाधर भरीतकर ( रा. भरीतकरमळा, अकोले नाका ता. संगमनेर), भाऊसाहेब दत्तु फरगडे (रा. निमगाव, ता. संगमनेर), संदिप विद्याधर दारोळे (रा.केळी रुंभोडी,ता. अकोले),  प्रभाकर सखाराम कोटकर (रा. कुंभेफळ, ता. अकोले), आनंद देवराम सारोक्ते (रा.चिरेबंदी,ता. अकोले), सागर रमेश कानवडे (रा. निमगाव बु, ता. संगमनेर), सुधीर प्रकाश बनकर (रा.धांदरफळ, ता. संगमनेर), राजेश मल्लु गायकवाड (रा.शिवजीनगर, ता. संगमनेर), बाबासाहेब बाबुराव चौधरी (रा. गणोरे, ता. अकोले), सुनील केशव धात्रक (रा. अशोक चौक, ता. संगमनेर), विक्रममधुकर नालकर (रा.वाडेकर गल्ली, ता. संगमनेर), सुनील प्रभाकर वाडेकर (रा.वाडेकर, ता. संगमनेर), सतीश गुलाब वाळुंज (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर), अफजलखान अन्सार पठाण (रा.नाईकवाडपुरा, ता. संगमनेर), अक्षय मारुती वाकचौरे (रा.परखतपुर, ता. अकोले) आशा 17 जणांना ताब्यात घेतले असुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरतरं, नाशिक ते सांगवी यामध्ये 90 किलोमीटरचे अंतर असुन पोलीस महानिरीक्षकांचे पथक नाशिक वरून येऊन सांगवी येथे कारवाई करते. मात्र, तालुका पोलीस ठाणे करते तरी काय?असा प्रश्न आता गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संगमनेर तालुक्यात एक काळ असा होता. की, खुलेआम काही कार्यकर्ते वाळु तस्करी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर करीत होते. मात्र, कालांतराने राजकीय परिस्थिती बदलली आणि वाळुतस्करी बंद झाली. मात्र, आता बहुतांशी राजकीय कार्यकर्ते संगमनेर तालुका हद्दीत कोणी क्लब चालवितात तर कोणी मटका चालवितात. कोणाची भागीदारी आहे तर कोणाचे बळ आहे. त्यामुळे, पोलिसांना वाटले तरी ते राजकीय दबावापोटी तेथे कारवाई करत नाही. नंतर मात्र आतिरेख झाला की कारवाईला सामोरे जावेच लागते. संगमनेर शहरात देखील काही वेगळी परिस्थिती नाही खुलेआम मटक्याच्या टपऱ्या, गुटखा हा सारास चालूच आहे. त्यात पांढर्‍या बगळ्यांची भागिदारी फार मोठी असून. खुद्द राजकीय बडे नेते देखील त्यांच्याकडून हाप्ते वसुल करतात. त्यामुळे, झाकली मुठ सव्वालाखाची.! या म्हणीचा प्रत्यय येथे येतो.