मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, कॉलेजला सोडवतो म्हणत हॉटेलवर नेऊन केला अत्याचार, गुन्हा दाखल.!
सार्वभौम सह्याद्री (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात मामा भाची या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मालुंजे परिसरातील एका 17 वर्षीय मुलीला मावस मामाने कॉलेजला सोडतो असे सांगुन गाडीवर बसवले आणि गाडी कॉलेजला न घेता थेट गाडी शिर्डी येथील हॉटेलला घेऊन गेला. तेथे त्याच्या भाचीला धमकी दिली की, तु माझ्या बरोबर आळंदीला लग्न कर नाहीतर हॉटेल मध्ये चल असे म्हणताच भाचीने विरोध केला असता तिला एका रूमवर घेऊन गेला व बळजबरीने भाचीच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला आहे. ही घृणास्पद घटना 29 डिसेंबर 2025 रोजी शिर्डी येथील एका हॉटेलवर दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यानंतर पिडीत भाचीचे दुखू लागले. त्यानंतर ही सर्व घटना नातेवाईकांना सांगितली असता त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी आरोपी चुलत मावस मामाला पाठीशी न घालता काल दि.8 जानेवारी 2026 रोजी तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो व बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत 17 वर्षीय भाची ही मामाच्या गावाला 11 वी सायन्सचे शिक्षण घेण्यासाठी येते. ती मालुंजे परिसरातून कॉलेजला येत जात असते. तिला कॉलेजला सोडवण्यासाठी तिचा सख्खा मामा येत जात असतो. परंतु, 29 डिसेंबर रोजी दररोज प्रमाणे कॉलेजला पिडीत मुलगी घरून निघाली. त्यावेळी सख्या मामा शेतीचे काम करत होता. त्यामुळे, पिडीत 17 वर्षीय भाचीने आपल्या मैत्रीला फोन लावला व मला कॉलेजला येऊदे असे सांगितले. त्यानंतर 11 वाजता पिडीत भाची ही मैत्रणीच्या गाडीवर आश्वि येथील एका सुपर मार्केट मध्ये येते. तेथे खरेदी करण्यासाठी गाडी थांबवते. त्यावेळी पिडीत 17 वर्षीय भाची ही सुपरमार्केटच्या बाहेर आपल्या मैत्रिणीची वाट पाहत उभी राहते. त्याचवेळी पिडीत 17 वर्षीय भाचीचा चुलत मावस मामा हा दुचाकी गाडीवर पिडीत भाची शेजारी येऊन उभा राहतो.
दरम्यान, तो पिडीत भाचीला म्हणतो की, चाल तुला गाडीवर कॉलेजला सोडवतो. त्यावेळी पिडीत भाची देखील गाडीवर बसते. तो तेथुन निमगावजाळीतुन लोहारे मार्गे घेऊन जात असताना इकडे कुठे घेऊन चालले असे विचारले असता तु शांत बस, काही बोलु नको अशी दमदाटी केली. त्यानंतर दुपारी 2 वाजता शिर्डी येथे पोहचले. त्यावेळी नराधम चुलत मावस मामा याची वाईट नजर भाचीवर होती. तु माझ्या सोबत आळंदी येथे लग्न करायला चल नाहीतर हॉटेल मध्ये चल असा नराधम मामा बोलु लागला. त्यावेळी पिडीत भाची म्हणते की, माझे वय नाही तु वेडेचाळे करू नको. त्याने कुठलीही गोष्ट न ऐकता हॉटेल मधील एका रूम मध्ये घेऊन गेला व पिडीत भाचीच्या इच्छेविरुद्ध नराधम चुलत मावस मामाने बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा गाडीवर आणुन सोडले. त्यानंतर पिडीत 17 वर्षीय भाचीने नातेवाईकांना ही सर्व घटना सांगीतली. त्यानंतर नातेवाईकांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी चुलत मावस मामाला पाठीशी न घालता तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर पोक्सो व बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलिस करत आहे.
खरंतर, संगमनेरात अल्पवयीन मुलींचे लैंगिक छळाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांना सहज हॉटेल, लॉज, कॅफे उपलब्ध होत आहे. मात्र, या हॉटेल, लॉज, कॅफेला देखील सह आरोपी करायला हवे. त्यांना देखील गुन्हेगाराला मदत केली म्हणुन लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी इतकीच शिक्षा असते. परंतु, जिल्ह्यात काही पोलीस ठाण्यात तपासातून तसे होताना दिसत नाही. ते लॉज, हॉटेल मालकांना पाठीशी घालतात आणि त्यांच्याकडून मोठा मलिदा घेतात. अनेकवेळेस पिडीत मुली जबाबात लिहून देतात तरी देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. तपासातून अगदी योग्य पद्धतीने बायपास दिला जातो. त्यामुळे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या घटनेकडे लक्ष घालावे अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांकडुन होत आहे. कारण, ते संगमनेरात पोलीस उपअधीक्षक असताना त्यांनी सर्वात मोठी हॉटेल,लॉज, कॅफे मालक यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे, बाल लैंगिक अत्याचाराला मोठ्या प्रमाणात चाफ बसला होता.
