कारखान्याच्या सभेते विरोधकांच्या तोंडात साखर.! बी.जे.देशमुख कारखान्याच्या बाजुने.! व्यासपीठाहून अनेकांची उणीधुणी.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति सहकारी साखर कारखान्याची २९ वी सर्वसाधारण सभा काल संपन्न झाली. अनेक प्रश्नांची रिघ असताना देखील विरोधक, कर्मचारी आणि शेतकरी यांनी ब्र शब्द देखील काढला नाही. का? तर केवळ आता तरी राजकारण बाजुला ठेऊन कारखाना चालावा, तो कायमचा टिकावा यासाठी सर्वांनी नरमाईची भुमिका घेतली. तर, सभाध्यक्ष सिताराम पा. गायकर यांच्या रोजच्या धडपडीवर अनेकांनी साक्ष नोंदविली. त्यामुळे, जग इकडचे तिकडे होईल. मात्र, गायकर साहेब कारखाना बंद पडू देणार नाहीत. इतका विश्वास शेतकर्यांनी व्यक्त केला. तर, ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करु, एकमेकांना सहकार्य करु अशी भुमिका निवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख यांनी व्यक्त केली. ज्या पद्धतीने कारखान्याच्या इतिहासात सभांना वादंगांचा कलंक असतो. त्याचा लवलेश देखील कालच्या सभेत जाणवला नाही. याचे समाधान चेअरमन गायकर पा. यांनी व्यक्त केले.