डॉक्टरने डॉक्टरीन बाईंवर अत्याचार केला, दोघांचे प्रेम व्हेंटीलेटरवर, गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्या, तो म्हणाला लग्न करणार नाही, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
एका 28 वर्षीय महिलेचे डॉक्टर पदवीची परीक्षा देत असताना एका तरुणासोबत ओळख झाली. दोघेही डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेत होते. दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मंग काय हाय,बाय, हॅलो सुरू झाले. दोघांची ही प्रॅक्टिस एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये सुरू झाली. तेथे घट्ट मैत्री होऊन डॉ. तरुणाने एक पाऊल पुढे टाकत प्रपोज करून लग्नाची साद घातली. त्यानंतर त्याने वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून पिडीत मुलगी भाडेतत्त्वावर राहत असलेल्या एका खोलीत गुंजाळवाडी परिसरात, हिवरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये व तरुण राहत असलेल्या भाडेतत्त्वावरील नवीन नगररोड परिसरात खोलीत वेळोवेळी संभोग केला. यातुन डॉक्टर महिला गर्भवती राहिली. या तरुणाने डॉक्टर महिलेला गोडी-गोडीत गोळ्या देऊन गर्भपात देखील केला. ही धक्कादायक घटना 2021 ते 2025 दरम्यान वेळोवेळी घडली. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाले आणि लग्न करण्याची वेळ आली तेव्हा हा तरुण टाळाटाळ करू लागला. आपल्या विश्वासाला तडागेला. लग्नाचे आमिष दाखवुन फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी डॉक्टर महिलेची तळपायाची आग मस्तकात जाते. ती थेट शहर पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर सोमवार दि.19 जानेवारी 2026 रोजी तक्रार दाखल केली. यात अमृत कारभारी बिन्नर (रा. खर्डी, ता. शहापूर,जि. ठाणे) याच्यावर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 28 वर्षीय पिडीत महिला डॉक्टर ही स्वतःचे क्लिनिक चालवून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. पिडीत डॉक्टर महिला ही 2016 साली संगमनेर तालुक्यातील नामांकित आयुर्वेद कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन 2021 मध्ये पदवी प्राप्त करते. त्या दरम्यान बी. ए. एम. एसच्या अंतीम वर्षाची परीक्षा एका नामांकित कॉलेज मध्ये होती. तेथे या पिडीत महिला डॉक्टरची ओळख आरोपी अमृत बिन्नर याच्या सोबत झाली. तोंड ओळख असल्याने ते एकमेकांसोबत बोलू लागले. त्यानंतर आरोपी अमृत बिन्नर हा नवीन नगररोड परिसरातील एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. तेथेच पिडीत 28 वर्षीय महिला डॉक्टर यांची परीक्षा झाल्यानंतर दोन महिन्यांसाठी पिडीत महिला डॉक्टर प्रॅक्टिस करू लागली. दोघे ही एकाच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करू लागल्याने दोघांची मैत्री घट्ट होत गेली. दोघांमध्ये फोनवर गुलूगुलू बोलणे सुरू झाले. आरोपी डॉ.अमृत बिन्नर याने एक पाऊल पुढे टाकत पिडीत महिला डॉक्टरला प्रपोज केला.
दरम्यान, आरोपी. डॉ. अमृत बिन्नर याने पिडीत महिला डॉक्टरला लग्नाची साद घातली. बी. एच. एम. एसची डिग्री पुर्ण केल्यानंतर लग्न करू असे आश्वासन दिले. त्यानंतर नको ते चाळे आरोपी डॉ. अमृत बिन्नर याने केले. त्याने पिडीत डॉक्टर महिला भाडेतत्वावर राहत असलेल्या गुंजाळवाडी येथील खोलीत तर हिवरगाव पावसा येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये व आरोपी डॉ. अमृत बिन्नर राहत असलेल्या खोलीत वेळोवेळी जबरी संभोग केला. हा सर्व प्रकार घडत असताना 2024 मध्ये पिडीत महिला डॉक्टर ही गर्भवती राहते. त्यानंतर पिडीत महिलेने लग्नाचे विचारले असता आरोपी डॉ.अमृत बिन्नर याने सांगितले की, मी अजुन सेटल नाही. आपण नंतर लग्न करू असे सांगुन त्याने पिडीत महिला डॉक्टरचा 20 दिवसांचा गर्भ गोडी-गोडीत गोळ्या देऊन गर्भपात केला. त्यानंतर पिडीत महिला डॉक्टरची प्रॅक्टिस संपल्यानंतर ती पुणे येथील हॉस्पिटलमध्ये जॉब करते. त्यानंतर आरोपी डॉ. अमृत बिन्नर हा पिडीत महिलेकडे होंडा कंपनीची युनिकॉर्न गाडी, स्मार्टवॉच, फोन-पे, गुगल-पे, रोख रक्कम अशी मागणी करून वेळोवेळी घेतो. आता लाखो रुपयांचा ऐवज डॉ. अमृत बिन्नर हा पिडीत महिला डॉक्टर कडून लुटतो. मात्र, लग्नाचा विषय आला की, तो टाळाटाळ करीत असल्याचे पिडीत महिला डॉक्टरचे लक्षात येते.
दरम्यान, आरोपी डॉ. अमृत बिन्नर हा जातीचे कारण सांगत तर कधी बहिणींचे लग्न बाकी आहे असे सांगून लग्नाचा विषय टाळून नेत होता. पिडीत महिला डॉक्टरच्या लक्षात येते की आपल्या विश्वासाला तडा गेला आहे. आपली फसवणूक होत आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण झाले आहे. असे लक्षात येताच पिडीत महिला डॉक्टरची तळपायाची आग मस्तकात जाते. ती थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून सोमवार दि.19 जानेवारी 2026 रोजी घडलेला सर्व प्रकार कथन करते. त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी डॉ. अमृत कारभारी बिन्नर (रा. खर्डी, ता. शहापूर,जि. ठाणे) याच्यावर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
