कॉलेजमधून विद्यार्थीनीला पळवून नेत केला अत्याचार, मित्राच्या मदतीने लपले, आठ जणांवर गंभीर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
19 वर्षीय तरुणीसोबत एका तरुणाची तोंड ओळख झाली. मंग काय,हाय, बाय,हॅलो गुलुगुलु बोलणे सुरू झाले. एकेदिवशी दोघे ही कॉलेज मधुन पळुन गेले. ते सातारा नंतर आंध्रप्रदेश मध्ये गेले. तेथे एका खोलीवर डांबून वेळोवेळी इच्छेविरुद्ध बलात्कार करून मारहाण केली. ही धक्कादायक घटना 27 डिसेंबर 2024 ते 28 मार्च 2025 पर्यंत वेळोवेळी घडली. याप्रकरणी 19 वर्षीय पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात आरोपी अक्षय नानासाहेब दिघे, गणेश बनसोडे, किरण भाऊराव शेवकर, रविंद्र नानासाहेब दिघे, अमित बाबसो जगदाळे(रा. बारामती), लता नानासाहेब दिघे, सोनाली नितीन वाकचौरे, कल्याण लक्ष्मण तावरे (सर्व रा. तळेगाव,ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील तळेगाव परिसरात 19 वर्षीय पिडीत तरुणी राहते. ती संगमनेर शहरातील एका नामांकीत कॉलेज मध्ये शिक्षण घेते. एकेदिवशी 19 वर्षीय तरुणी घरी असताना आरोपी अक्षय दिघे हा पिडीत तरुणीच्या घरी कामानिमित्त गेला. तेथे दोघांची ओळख झाली. एकमेकांवर प्रेम जडले. मंग काय!हाय, बाय सुरू झाले. त्यांची घट्ट मैत्री झाल्याने जवळीकता वाढू लागली. या प्रेमात दोघांनी पळुन जाण्याचा निर्णय घेतला. दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता संगमनेर शहरातील नामांकीत कॉलेज मधुन पळुन गेले. आरोपी अक्षय दिघे याने 19 वर्षीय पिडीत तरुणीला साताऱ्यातील म्हसवड येथे एका मित्राचा सहारा घेऊन एका खोलीवर थांबले. तेथे आठ ते दहा दिवस थांबले असता त्या खोलीवर गणेश बनसोडे हा येऊन 19 वर्षीय पिडीत तरुणीला अक्षय समोरच दम देत असे. जर अक्षयच्या घरच्यांना तुझ्या घरच्यांनी काही त्रास दिला तर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान, अक्षय व 19 वर्षीय पिडीत तरुणी ही साताऱ्यात काही दिवस राहिल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये नागलवाडी मध्ये प्रदेश येथे गेले. तेथे एका मित्राच्या मदतीने खोली घेतली. तेथे दोघे राहू लागले. मात्र, अक्षय बाहेर जात असताना तो 19 वर्षीय पिडीत तरुणीला डांबून ठेवत असे. तेथे पिडीत तरुणीला फोन न देता अडीच महिने डांबून ठेवले. अक्षय खोलीवर आल्यावर पिडीत तरुणीच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवत असे. पिडीत 19 वर्षीय तरुणी ही अक्षयला सांगत असे की,मला इथे राहायचे नाही. मला संगमनेरला जायचे आहे. मात्र, अक्षय व त्याचा मित्र अमित जगदाळे हा पिडीत तरुणीला बेदम मारहाण करत होते. त्यावेळी, तेथे आर्थिक सहाय्य करण्यासाठी किरण शेवरकर व रविंद्र दिघे हे आंध्रप्रदेश मध्ये जाऊन पिडीत 19 वर्षीय तरुणीला दमबाजी करत होते. जेव्हा पिडीत 19 वर्षीय तरुणीने मला घरी जायचे आहे. म्हणुन आरडाओरडा केला तेव्हा अक्षय दिघे त्याचा मित्र अमित जगदाळे यांनी व अनोळखी दोन इसमांनी खोलीतुन बाहेर काढण्याआधी पिडीत तरुणीच्या डोळ्यावर पट्टी बांधुन गाडीत टाकुन बारामतीकडे निघाले.
दरम्यान, बारामतीत जेव्हा पोहचले तेव्हा गाडीत अक्षयची आई व बहीण होते. पिडीत तरुणी काही बोलू नये म्हणुन अक्षयच्या आईने व बहिणीने नाक दाबुन औषध पाजले. त्यानंतर अक्षयचा मित्र कल्याण तावरे याच्या बारामती येथील घरी एक महिना डांबून ठेवले. त्यानंतर अक्षयचे मित्र अमित जगदाळे व कल्याण तावरे हे पिडीत तरुणीला औषध पाजून घराबाहेर येऊ देत नव्हते. पिडीत तरुणीच्या लॅपटॉप वरून घरच्यांशी संपर्क केला असता. त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर, पिडीत तरुणीचे नातेवाईक बारामती येथून पिडीत तरुणीला घेऊन आले. घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला असता. पिडीत तरुणी व नातेवाईक संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देतात. 19 वर्षीय पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय नानासाहेब दिघे, गणेश बनसोडे, किरण भाऊराव शेवकर, रविंद्र नानासाहेब दिघे, अमित बाबसो जगदाळे(रा. बारामती), लता नानासाहेब दिघे, सोनाली नितीन वाकचौरे, कल्याण लक्ष्मण तावरे (सर्व रा. तळेगाव,ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.