संगमनेरमधील एका महिलेशी अश्लील कृत्य, महीला असुरक्षित.! ब्लड अर्पण बँक टेक्निशियनवर गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर):- 

                    संगमनेर शहरातील एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये 26 वर्षीय तरुणीला स्टोरेज रूम मध्ये थांबवले. या तरुणीच्या तोंडामध्ये कॅटबरी भरवण्याचा प्रयत्न केला. नंतर तरुणीच्या शेजारी खुर्ची घेऊन बसला गुलूगुलू बोलु लागला. आणि गालावर हात फिरवून लगट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 6 एप्रिल 2025 रोजी 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली. पिडीत तरुणीने हॉस्पिटलमधील वरिष्ठांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, वरिष्ठांनी सिनीयरला पाठीशी घातले. त्यानंतर मोठ्या धाडसाने पिडीत तरुणीने 11 एप्रिल रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यामध्ये नयन जैन (रा. संगमनेर, ता. संगमनेर) याच्यावर विनयभंगासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. खरंतर, मागील हप्त्यात डॉक्टरांनी बलात्कार केल्याची घटना घडली. आज पुन्हा एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये असे कृत्य घडले. त्यामुळे, हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार सोडुन अश्लील कृत्य वाढले आहे का? हॉस्पिटलमधील महिला सुरक्षित आहे का? असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहे. आता हा छेड काढणारा आरोपी आज ही मोकाट फिरत आहे. याला पोलिसांनी समज दिली का? असे छेड काढणारे शिक्षीत लोक यांना पोलिसांनी सुता सारखे सरळ करण्याची गरज असल्याचे संगमनेरातील सुज्ञ लोक बोलत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 26 वर्षीय पिडीत तरुणी ही तीन वर्षांपासून संगमनेरातील ब्लड बँक मध्ये जॉब करते. ती संगमनेर शहरातच मैत्रीणी सोबत राहते. दि. 6 एप्रिल 2025 रोजी एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ब्लड स्टोरेजचे काम चालु होते. तेथे टेक्निशियन म्हणुन काम पाहणारे आरोपी नयन जैन यांचा पिडीत तरुणीला फोन आला. तो फोनवर म्हणाला की, तु हॉस्पिटल मधील स्टोरेज रूम मध्ये थांबुन रहा. आपल्या ऑफीस बॉयला दुसरे काम आहे. तो ब्लड बँक ह्या मदर ब्लड बँक येथे पाठवले आहे त्यामुळे तो येऊ शकणार नाही. त्या स्टोरेज रूमचे टेबलचे मला मेजरमेंट घ्यायचे आहे. त्यामुळे, तु स्टोरेज रूमला थांब असे म्हणुन फोन कट केला.

            दरम्यान, आरोपी नयन जैन याची पिडीत मुलीवर वाईट नजर होती. तो कारने शोधुन भेटण्याचा प्रयत्न करत होता. त्यांने फोनकरून ही शकलं लढवली. तो काही वेळातच हॉस्पिटलमधील स्टोरेज रूमकडे आला. त्याच्या हातामध्ये लस्सी व कॅटबरी होती. एक लस्सी पिडीत तरुणीला देऊन. हाताती कॅटबरी अर्धी तोडुन स्वतः खाली व अर्धी कॅटबरी पिडीत तरुणीच्या तोंडात भरवू लागला. आरोपी नयन जैनचे हे घाणेरडे चाळे पिडीत तरुणीच्या लक्षात येऊ लागले. पिडीत तरुणीने हात पुढे करून कॅटबरी घेतली. त्यानंतर पिडीत तरुणी जिथे काम करत होती. तिथे टेबल जवळ खुर्ची घेऊन बसले. आरोपी नयन जैन हा पिडीत तरुणीच्या गालावर हात लावला व म्हणाला की, याबाबत कोणाला काही सांगू नको.असे म्हणुन पाठीवर हात फिरवुन लगट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पिडीत तरुणीने आरोपी नयन जैन याला जोरात लोटले व संताप व्यक्त केला. तेव्हा आरोपी नयन जैन हा म्हणाला की, तु कोणाला सांगू नको तुझ्या पाया पडतो. नाहीतर तुला सोडणार नाही.

            दरम्यान, पिडीत मुलीने वरिष्ठांना सांगितले त्यांनी लॅबचे चेअरमनला सांगितले. ते आऊटऑफ आहे असे सांगुन पिडीत तरुणीकडे वरिष्ठांनी टाळाटाळ करून आरोपी नयन जैनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. एकीकडे पिडीत मुलीला होणारा त्रास आणि दुसरीकडे वरिष्ठांची उडवाउडवीची उत्तरे पाहुन पिडीत तरुणीची तळपायाची आग मस्तकात गेली. पिडीत तरुणीने 11 एप्रिल रोजी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर आरोपी नयन जैन (रा. संगमनेर, ता. संगमनेर)याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास पोलीस करत आहे.