पोलीस गाढ झोपेत असताना एकाच रात्रीत सात ठिकाणी घरफोड्या, शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-  

                संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी राजापूर व चिखली शिवारात सात ठिकाणी घरफोड्या केल्या. मात्र, चोरांच्या हाती एकाच ठिकाणी घबाड सापडले. यामध्ये सोन्याचे चार तोळ्यांच्या पुतळ्या, दोन तोळ्यांचे मनिमंगळसूत्र,पाच भारांचे चांदीचे जोडे असे हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना शनिवार दि. 5 एप्रिल रोजी रात्री 11 ते 6 एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी हिरामण लक्ष्मण सिनारे (रा. चिखली, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाकी ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा चार्ज रविंद्र देशमुख यांनी घेतला तेव्हापासून एकही दमदार कामगिरी त्यांची दिसुन आली नाही. संगमनेर शहरात गुन्हे दाखल होतच आहे. कायम तपासावर तपास सुरूच आहे. मात्र, एकही दमदार आशा गुन्ह्याची उकल त्यांनी केली नाही. संगमनेरातील हायप्रोफाईल गुन्हेगारी, महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले गोमांस, ड्रग्ज, गांजा, हुक्का यासह नको ते कारभार दिवसा ढवळ्या संगमनेर शहरात चालतात. मात्र, पोलीस काय करतात? तर, अर्थपुर्ण तडजोडी करुन मलिदे गोळा करण्यात आणि नेत्यांच्या पुढे-पुढे करून आपल्या वर्दीला सरेंडर करतात. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक असो वा अधिकारी किंवा डीबी यांच्याकडून आजवर जनतेला समाधानकारक काम संगमनेर शहरात झाल्याचे पहायला मिळत नाही. त्यामुळे, आता किमान एखाद्या तरी गुन्ह्याचा तपास लावा अशी साद आता लोक घालत आहे. 

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिरामण लक्ष्मण सिनारे हे चिखली येथील रहिवासी असुन त्यांना दोन मुले व आई वडील असे एकत्रीत कुटुंब आहे. त्यांचा शेती व्यवसायवर उरनिर्वाह चालतो. दररोज प्रमाणे दि.5 एप्रिल रोजी देखील शेतीतील कामे करून घरी आले. सर्वजनांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपल्या ठिकाणी गेले. तेव्हा घरातील सर्व खिडक्या दरवाजे हे बंद केले होते. मात्र, दि.6 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता हिरामण सिनारे यांच्या पत्नी झोपेतून उठल्या तेव्हा घरचा दरवाजा हा उघडा दिसला. दरवाजाचा कडी कोंडा हा तुटलेल्या अवस्थेत होता. त्यांनी आपल्या पतीला उठवले तेव्हा हिरामण सिनारे उठुन बाहेर आले असता त्यांना घरातील सर्व वस्तु अस्तव्यस्त अवस्थेत पडलेल्या दिसल्या.

                दरम्यान, हिरामण सिनारे यांनी घराच्या आजू बाजूला पाहिले असता त्यांना कपड्याची उचकापचक दिसली. बेडरूम मधील लाकडी पेटी दिसून आली नाही. तेव्हा घराच्या बाहेर जाऊन पाहिले असता पाठीमागील बाजुस लाकडी पेटी पडलेली होती. त्यानंतर, त्यांनी आईचे पेटीमधील सोन्याचे दागिने पाहिले असता ते मिळुन आले नाही.  त्यावेळी त्यांची खात्री झाली की, झोपेत असताना अज्ञात चोरट्यानी घराच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करून सोन्याचे चार तोळ्यांच्या पुतळ्या, दोन तोळ्यांचे मनिमंगळसूत्र, पाच भारांचे चांदीचे जोडवे असा 62 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यांनी हा सर्व घटनाक्रम पोलीस ठाण्यात सांगितला असता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

खरंतर, संगमनेर शहर जस-जसे विकसित होत चाले आहे. तसतशी सराईत गुन्हेगारी देखील वाढत चालली आहे. व्यापारी व सामान्य मनासांची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचे गुन्हे दाखल होत आहे. अनेक बँकेना चुना लावून फरार झालेला "शहाणे" याचा औरंगाबाद हायकोर्टाने जामीन फेटाळला तरी देखील तो सापडत नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार वारंवार गुन्हे करतच आहे. युपी, एम.पी, बिहार अशा अन्य राज्यातुन लोक आलेत, त्यांची कोठे नोंद नाही, येथील महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे. त्यांना न्याय नाही, लव जिहाद सारखी प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे, वारंवार तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहेत. दुचाकी वाहने चोरीला जात आहे. पोलीस वेळेवर येत नाही. डीबी अवैध धंद्यामध्येच मश्गुल आहे. मंग तपास करील तरी कोण?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यावर जनतेची प्रचंड नाराजी आहे. आता निष्क्रीय अधिकारी नको असा सुर जनतेतून पहिला मिळत आहे.

        दरम्यान, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने जे काम केले त्यांचे आज देखील कौतुक होत आहे. अनेक सोने, राज्यातील सर्वात मोठी मोटारसायकल रिकव्हरी, खुन, मोबाईल चोरी यांचा शिताफीने तपास लावला. मोठ्या प्रमाणात आरोपींकडून रिकव्हरी देखील केली. त्यामुळे, आपली वस्तु आपल्याला भेटली म्हणुन नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद होता. जनतेने राहुल मदने व पथकाचे हारतुरे देऊन आभार देखील मानले. आता चोरी झाली तर गाडी लवकर पोहचत नाही. शहर पोलीस ठाण्यात डीबी (तपास पथक) नेमली खरी. पण त्यांच्याकडून एकही कामगिरी नाही.