त्या PSI ला वाचवायला SP व अप्पर एसपींचा खटाटोप, वकील म्हणे हायकोर्टात खेचणार.! एक खरं लपवायला अनेक खोटे षडंयंत्र.!

 

सह्याद्री सार्वभौम :-

                   संगमनेर बस स्थानकावरील ड्रग्ज प्रकरणात सीसीटिव्हीत स्पष्ट दिसत असताना एक निरपराध व्यक्ती जेलमध्ये रहातोय आणि ज्यांनी हे कुकर्म केले त्यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला साधा शोध सुद्धा लागत नाही. ही गोष्ट बाकी हस्यास्पद वाटते. बरं ते तिघे लपलेही असतील पातळात पण ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली ते सुद्धा अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे गेले नाहीत. म्हणजे हा बळजबरीचा रामराम त्या गरीब कर्मचाऱ्यांच्या बोकांडी लादण्याचे काम प्रशासन करताना दिसत आहे. याहून धक्कादायक म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईत दाखविले आहे. ते घटनास्थळी होते की नव्हते? येथून प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पण, एक PSI ला वाचविण्यासाठी किंवा एक खरं लपविण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी रंगविण्याचे काम पोलिसांकडून सुरु असल्याची चर्चा संगमनेरात सुरु आहे. यात एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून त्यात फार खळबळजनक गोष्टी उघड झाल्या आहेत, मात्र पोलीस आणखी किती बनावट कागद रंगवितात, चुकीच्या गोष्टीला किती पाठीशी घालतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. मात्र या प्रकरणात अप्पर पोलीस अधिक्षक यांचे लाडके पीएसआय आणि एसपी साहेबांच्या मर्जीतील हे अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे यात तक्रारदार हे हायकोर्टात जात असून शेवटी तेथेच न्याय होईल अशी त्यांची धारणा झाली आहे. त्यामुळे, खोटं स्पष्ट दिसूनही अर्थपुर्ण कारणामुळे एखाद्या अधिकाऱ्याला पाठबळ दिले जात असेल तर सामान्य नागरिकांचा पोलिस वर्दीवरील विश्वास उडून जाईल. अशा प्रकारची प्रतिक्रीया खुद्द माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी चर्चा करताना दिली आहे.

 हाच तो व्हिडिओ एक व्यक्ती गाडीत ड्रग्ज ठेवतोय

             संगमनेर शहरात पोलिसांच्या करवी खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा सर्वात धक्कादायक प्रकार समोर आल्याचा आरोप झाला आहे. कारवाई केली बस स्थानकावर आणि दाखविली पोलीस ठाण्यात, कारवाई करण्यासाठी वापरले गेले ते झिरो पोलीस आणि पोलीस ठाण्यातील आगलावे पोलीस कर्मचारी यांच्यासह काही व्यक्ती. असे असताना ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत काही एक रोल नसताना त्यांना फिर्यादीत घेऊन चोर सोडून सन्याशांना फाशीला देण्याचा प्रयत्न केला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक यांनी देखील ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस काढली त्यांच्यापेक्षा जी कारवाई बस स्थानकाच्या सीसीटिव्हीत दिसते त्या पोलीस कर्मचारी, झिरो पोलीस जे अर्थपुर्ण तडजोडीसाठी पोलिसांनी पाळले आहेत त्यांना नोटीसा का काढल्या नाहीत? दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्यांना नोटीसा काढल्या त्यांनी काय जबाब द्यावे, कसे द्यावे हे त्यांच्याकडून वदून घेत त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, पोलिसांनी हे लक्षात ठेवावे 28 मे 2015 साली कोतवाली पोलीस ठाण्यात नितीन साठे प्रकरणात एक खोटं लपविताना अनेक खोटी कागदे रंगविली गेली आणि शेवटी पीआय ढोकले यांना जेलमध्ये मरावे लागले, एका व्यक्तीच्या चुकीमुळे अधिकारी व कर्मचारी यांना जेलसह मनस्ताप सहन करावा लागला होता. आता या घटनेत देखील काही व्यक्तींनी न्यायासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र एका अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी पोलीस प्रशासन चुकीची कागदी घोडे रंगविताना दिसल्याचे आरोप होऊ लागले आहेत. या सर्व गडबडीत कोणाचा जीव जायच्या आत न्याय मिळाला म्हणजे देव पावला म्हणायचे..!!

           खरंतर पोलिसांनी ही कारवाई बस स्थानकावर केली अन पोलीस ठाण्यात दाखविली आहे. ही संदिग्धता उघड उघड आहे. तरी देखील जर कारवाई करायचीच होती. तर, ज्या ठिकाणी पोलिसांना कारवाई करायची होती त्या ठिकाणी सीसीटीव्ही का नव्हते? सीसीटिव्हीत कारवाई का केली नाही.? या पोलीस ठाण्यात अशी काही ठिकाणे आहेत जेथे अर्थपुर्ण कामे होतात, अंधाऱ्या पडवित काळे कारणामे सुरु असतात त्याची देखील चौकशी होणे अपेक्षित आहे. यात खरंतर सर्व मिले सुरु मेरा तुम्हारा अशी स्थिती आहे. त्यामुळे, या घटनेचा तपास एसआयटी स्थापन करुन किंवा सीआयडीकडून या घटनेची उकल होणे अपेक्षित आहे. जर असे झाले तर भल्यभल्या अधिकाऱ्यांचे यात हात असल्याचे उघड होईल, अनेक नेत्यांची नावे पुढे येतील असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. आणि ते वास्तव आहे, संगमनेरातील नागरिकांना पोलिसांवर विश्वास राहिला नाही, इतका अतिरेख होऊन सुद्धा अधिकारी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यास पाठीशी घालतात, त्याच्याशी होणारे अर्थपुर्ण लागेबांधे आता संगमनेरातील नागरिकांना माहित झाले आहेत. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यास फार खळबळजनक माहिती उघड होऊन हे सहआरोपी किंवा बदलीचा मुद्दा नसून कटाचे मुख्य सुत्रधार असल्याचे उघड होईल असे मत वकीलांनी व्यक्त केले आहे.

हेच ते व्हिडिओ ज्यात पोलीस व आरोपी एकत्र

           पुरावे नष्ट झाल्यावर तपास सुरु होणार.!

खरंतर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे कारणाने बाहेर आले, आरोपी करण्यात आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जर सीसीटीव्ही तपासले नसते तर आरोपी साव होऊन वावरले असते. पण, हे सर्व कांड उघड होऊन सुद्धा अद्याप फक्त कागदी घोडे रंगवायचे काम सुरु आहे. यातील दुर्दैवी गोष्ट म्हणजे काही पोलीस कर्मचारी अनेक ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज काढून घेत असून काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आसल्याचा आरोप होत आहे. बस स्थानक प्रशासन तक्रारदारांना मदत करत नाही. मात्र, पोलिसांना लगेच सहकार्य करताना दिसतेय, ना पत्रव्यवहार ना विनंती, थेट सर्व्हर रुमधून काहीतरी संशयास्पद हलचाली होताना दिसत आहेत. हिच स्थिती पोलीस ठाण्यात काही वेगळी नाही. त्यामुळे भविष्यात सीसीटिव्ही बंद होता, सर्व्हर करप्ट झाले, हार्डिक्सला प्रॉब्लेम आला, सॉफ्टवेअर करप्ट झाले, मेमरी फुल झाली, रॅम संपली होती, तेव्हा लाईट गेली होती असली कारणे पुढे आली तर नवल वाटायला नको.

        कारण, आजच पोलीस ठाण्यात आणि घटनास्थळावर पोलिसांच्या, त्यांच्या हस्तकांच्या संशयास्पद हलचाली सुरु आहेत, काही व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा सर्व खेळ फक्त पुरावे नष्ट करायच्या दृष्टीने सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, किमान पुरावे नष्ट होण्याच्या आत चौकशी पुर्ण होईल का? आणि गुन्ह्याची निर्गती होईल का ? असे गंभीर प्रश्न संगमनेरकरांना पडले आहेत. पोलीस अधिक्षक यांनी अप्पर पोलीस अधिक्षक यांना तीन दिवसाच्या आत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र तसे झाले नाही. स्थानिक गुन्हे शाखेला अद्याप ते तिघे फरार झालेल्या व्यक्ती सापडल्या नाहीत, ड्रग्ज कोठून आले हे समजले नाही. त्यामुळे, पुरावे नष्ट होण्याच्या आत न्याय मिळेल अशी आशा आम्ही ठेवायची तरी कशी? अशी खचलेली प्रतिक्रीया तक्रारदार यांनी दिली आहे.

           मानव हक्क आयोगाला थेट पत्र.!

१) PSI श्रीकांत सावंत यांनी गुन्हेगार इसमांच्या प्रलोभनास बळी पडून तक्रारदार यांचा मुलगा काशीफ याचेविरुध्द खोटा गुन्हा दाखल केला आहे. एक प्रकारे सावंत हे देखील सदर गुन्ह्यात सामिल आहेत. या कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात यावे. २) तसेच सावंत हे पुरावे नष्ट करत असून त्यांची संगमनेर पोलीस ठाण्यातुन इतरत्र बदली करण्यात यावी. या खोट्या गुन्ह्याची उकल व्हावी या दृष्टीने संगमनेर बस स्थानक परिसर, बबलु टी स्टॉल, जगदंबा टी सेटर, येवले टी स्टॉल, जोशी स्वीट्स होम या व इतर अनेक व्यवस्थापन दुकानांचे आतमध्ये व बाहेर बसविलेल्या CCTV Camera द्वारे चित्रिकरण मुद्रण झालेल्या चित्रप्रती जप्त करण्यात याव्यात. तसेच संबधित दुकानदारांनी डिलीट केलेले CCTV फूटेज त्यांचे DVR जप्त करून रीकवर करण्यात यावे

 ४) दि.०२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते रात्री ८. वा. पर्यत गुलाम फरीद, तौसिफ कुरेशी व इम्रान सौदागर व पीएसआय श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या मोबाईल  किंवा फोनच्या व्हॉटसअपद्वारे एकमेकांशी किती वेळा संपर्क केलेला आहे त्याबाबत त्यांचे CDR व कॉल रेकॉर्ड डाटा तपासण्यात यावा. याप्रकरणी PSI सावंत यांचेवर तसेच इमरान सौदागर, तौसिफ कुरेशी, गुलाम फरीद यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशा महत्वाच्या मागण्या करुन सहा पानांची तक्रार तथा मानव हक्क आयोगाला पत्र लिहीले आहे.