पिचडांची उमेदवारी डॉ. लहामटेंना धोकादायक.! अपक्ष आणि महाविकास आघाडीत लढत.!
सार्वभौम (अकोले)-
अकोले विधानसभा मतदार संघात एकास एक उमेदवारी होऊ नये म्हणून डॉ. लहामटे किंवा महायुतीने प्रयत्न केले अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, मा.आ.वैभव पिचड यांनी उमेदवारी केली नाही तर अमित भांगरे यांना एकगठ्ठा पिचडांची मते मिळतील आणि तुतारीला सपोर्ट होईल, त्यामुळे, डॉ. लहामटे यांचा विजय सोपा होईल अशी धारणा महायुतीची होती. मात्र, त्यांचे हे राजकीय गणित सध्या त्यांच्यावर बुमरँग झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. पिचड यांनी ज्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. त्यानुसार अमित भांगरे यांना कमी पण डॉ. लहामटे यांनाच तोटा होताना दिसत आहे. त्यामुळे, माजी आमदारांची उमेदवारी ही लहामटेना धोकादायक ठरू शकते असे तालुक्यातील राजकीय विश्लेषकांची मत आहे. इतकेच काय! अकोल्यातील तिरंगी लढतीत खरी लढत वैभव पिचड आणि अमित भांगरे म्हणजे महाविकास आघाडी आणि अपक्ष अशा पद्धतीची होते की काय.! असे चिन्ह सध्या निर्माण झाले आहे.
खरंतर गेली ४० वर्षे मतांची विभागणी करून आदरणीय पिचड साहेबांनी अकोले तालुक्यात राजकारण केले. अर्थात त्यात गैर काहीच नाही. कारण, हे राजकीय डावपेच असतात. मात्र, २०१९ साली त्या डावपेचावर शरद पवार यांनी पाणी सोडले आणि ४० वर्षाचा राजकीय सारीपाठ बदलुन टाकला. त्यानंतर २०२४ मध्ये देखील मतांची विभागणी झाली तर, त्याचा फायदा कोणाला? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर रोखठोक सर्वाभौमने अनेक ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक आणि जाणकार नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर लक्षात आले. की, वैभव पिचड यांची उमेदवारी जितकी महाविकास आघाडीला घातक त्याहून जास्त डॉ. लहामटे यांना धोकादायक असल्याचे लक्षात येते.
खरंतर पिचड यांनी उमेदवारी केली नसती. तर, त्यांचे एकगठ्ठा मतदान भांगरे यांना मिळाले असते. असे म्हणणे चुकीचे ठरले. कारण, गावागावात दोन गट असतात. त्यांचा उमेदवारांना नव्हे तर स्थानिक गटबाजीला विरोध असतो. त्यात जसे राजूर गाव आहे, जर पिचड उमेदवार नाही तर पर्यायी कोण? तर डॉ. लहामटे यांना चॉईस केले असते. कोतुळ येथे जर पिचड नाही तर पर्यायी कोण? तर डॉ. लहामटे यांना चॉईस केले असते. अकोले शहरात देखील यापेक्षा वेगळे काही नाही. पिचड नाही तर कोण? लहामटे यांना लोकांनी पर्याय निवडला असता. मात्र, शहरात कॉंग्रेसची विचारधारा, मुस्लिम बांधवांचा एकसंघ, तसेच आंबेडकरी समुदाय यांनी भाजपाला स्विकारले नसते. त्यामुळे, मधुभाऊ नवले यांच्यसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहर कवर केले असते. त्यामुळे, पिचड यांची उमेदवारी ही अमित भांगरे यांच्यासाठी येणार्या काळात दगडाचा मैल बणून जाणार आहे.
खरंतर अकोले तालुक्यातील सातेवाडी आणि कोतुळ गटात भांगरे यांना फार जोर लावावा लागणार आहे. कारण, या भागात डॉ. लहामटे यांची चांगली चलती असून ते त्याच गटातील उमेदवार आहेत. मात्र, येथे सुनिताताई भांगरे यांना देखील मानणारा चांगला वर्ग आहे. अनेक लोक वैचारिक आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचणे हाच उत्तम पर्याय वाटतो आहे. मात्र, खाली आल्यानंतर पैठण, आंभोळ, शेलद, कोथळे, शिरपुंजे, कौठेवाडी, गंभीरवाडी, सोमलवाडी अशी अनेक गावे पहिल्या क्रमांकाने अमित भांगरे यांना सपोर्ट दिसतो आहे. त्यानंतर कोतुळ गटात बी.जे.देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते कोतुळ कवर करु शकतात. मात्र, वैभव पिचड हे उभे राहिल्यामुळे कोतुळमध्ये डॉ. किरण लहामटे यांना तोटा होण्याची शक्यता आहे.
कोतुळ येथे बबलु देशमुख, मनोज देशमुख आणि अन्य कार्यकर्ते पहिल्यापासून लहामटे यांचे काम करतात. तर, सिताराम पा. गायकर साहेब हे संपुर्ण मुळा पट्ट्यात डॉ. लहामटे यांच्यासाठी वरदान ठरणार आहे. मात्र, जर पिचड यांची उमेदवारी झाली नसती. तर, कोतुळमधून डॉ. लहामटे यांना पर्याय म्हणून कोतुळकरांनी स्विकारले असते. आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. कोतुळमध्ये राजेंद्र देशमुख, सिताराम देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते हे पिचड साहेबांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे, त्यांच्या मनाची दोलायमान स्थिती स्थिर असून ते आता वैभव पिचड यांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे, कोतुळ येथे बी.जे.देशमुख, रमेश देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची फळी भांगरे यांच्याकडे निष्ठेने काम करणार आहे. मात्र, तरी देखील कोतुळमध्ये पिचड साहेबांच्या उमेदवारीमुळे डॉ. लहामटे यांना तोटा होण्याची शक्यता आहे.
अकोले शहरात कोणी कितीही नाकारले तरी वैभव पिचड यांचा जो केडर आहे. तो कोणाचाही नाही. अशोकराव भांगरे यांना मानणारा वर्ग फार मोठा होता. मात्र, कालांतराने तो कमी होत गेला. त्यांचे रुपांतर लहामटे गटात झाले. मात्र, जसे अमित भांगरे शरद पवार गटातून सक्रिय झाले त्यानंतर त्यांनी एक चांगली फळी निर्माण केली. मात्र, तरी देखील शह देईल अशी स्थिती नाही. जर पिचड उभे राहिले नसते तर त्या मतांचा फायदा हा डॉ. लहामटे यांना झाला असता. तर काही प्रमाणात भांगरे यांना देखील झाला असता. मात्र, आज शहरात पिचड नंबर वन असले तरी मधुभाऊ नवले तथा कॉंग्रेस, अमित भांगरे, मुस्लिम बांधव, शरद पवारांना माणनारा वर्ग अशा युनिटीमुळे किमान दोन किंवा एक नंबरची मते अमित भांगरे यांना असण्याची शक्यता आहे.
आता राजुरमध्ये विचार केला. तर, पिचड कुटुंबाने उमेदवारी केली नसती. तर, ती मते महाविकास आघाडीला गेली नसती. राजुरची बाजारपेठ बर्यापैकी डॉ. लहामटे यांच्या मागे गेली असती. त्यामुळे, पिचड साहेबांची रिक्षा आता राजुरमध्ये सुसाट धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पिचड साहेबांची उमेदवारी व्हावी यासाठी डॉ. लहामटे किंवा महायुती यांनी प्रयत्न केला होता. मात्र, हमारी बिल्ली हमपर मॅव.! अशी स्थिती डॉ. लहामटे यांची होण्याची शक्यता आहे. तर, राजुरपासून वरच्या पट्ट्यात पाहिले. तर, अगदी साम्रदपर्यंत अमित भांगरे तथा महाविकास आघाडीला चांगली मते मिळण्याची शक्यता आहे.
आता मुळा पट्ट्यात पाहिले तर वैभव पिचड उभे राहिले नसते. तर, समशेरपूर, विरगाव, देवठाण, गणोरे अशा काही मोठ्या गावांतून डॉ.लहामटे यांना सपोर्ट झाला असता. जी मते महाविकास आघाडीला पडणार आहे त्याचे विभाजन झाले नाही. मात्र, वैभव पिचड यांची मत बाकी लहामटे यांना पडली असती. त्यात देवठाण येथे अरुण शेळके यांनी शांतता घेतली असती तर पर्याय म्हणून तेथील जनतेने लहामटे यांना स्विकारले असते. तर, जालिंदर बोडके आणि सुधीर शेळके यांना तेथे जमेची बाजु झाली असती. मात्र, तेथे डॉ. अजित नवले आणि तुळशिराम कातोरे यांनी महाविकास आघाडीला फार मोठा आधार दिला असता. आता मात्र पिचड यांच्यासाठी तेथे युद्धपातळीवर काम सुरू आहे. हीच स्थिती विरगाव येथे झाली असती. रावसाहेब वाकचौरे यांची गोची झाली असती. मात्र, आता पिचड उभे राहिल्याने वाकचौरे हे दिवसरात्र एक करणार आहे. तर, मतदारांनी तेथे समांतर मतदान केले असते. हिवरगाव येथे देखील तिघांना समसमान मतदान मिळण्याची शक्यता आहे. तेथे अंजनाताई बोंबले, मोरे यांच्याकडून पिचडांना सपोर्ट होईल तर सुभाष कदम, बच्छाव बोंबले, गोरख कदम हे काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तसेच गणोरे गाव हे फार महत्वाची भूमिका बजावणार आहे. तेथे आमदारांनी चांगली कामे केली असली. तरी, तेथे मास्क चेहरा म्हणून शुभम आंबरे सोडता दुसरा चेहरा नाही. मात्र, अशोक आंबरे, संत आंबरे, दातीर, सुशांत आरोटे यांची भुमीका तेथे महत्वाची ठरणार आहे. तर, पिंपळगाव निपाणी हे गाव देखील वैचारिक आहे. तेथे तुतारीला शंभर टक्के लिड असण्याची शक्यता आहे. एकंदर डॉ. किरण लहामटे यांना जे काही वाटत होते. की वैभव पिचड यांची उमेदवारी आपल्यासाठी पोषक ठरु शकते. मात्र, वास्तवत: शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवार वैभव पिचड आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे यांच्यात लढत होण्याची शक्यता असल्याचे अनेक अभ्यासू राजकीय विश्लेषक सांगतात.
तर, अकोले तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पठार भग येथे बाळासाहेब थोरात यांची चलती असणार आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. किंवा महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याने कॉंग्रेसकडून प्रथम चेहरा म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव अग्रस्थानी असणार आहे. त्यामुळे, पठार भागावर कस? तर बाळासाहेब थोरात म्हणतील तसं. आणि थोरात यांनी तुतारीचे काम प्रामाणिकपणे करा अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, पठार भागावर बर्यापैकी यंदा तरी तुतारी वाजेल. तेथे दोन नंबर मते ही डॉ. किरण लहामटे यांना असण्याची शक्यता आहे. तर पिचड यांची बारी शेवट असणार आहे. त्यामुळे, एकंदर राज्यात महाविकास आघाडी आणि तालुक्यात अमित भांगरे असे चित्र दिसेल असे अनेकांची मत आहे.