कोणी कितीही लावा शक्ती, कितीही लावा युक्ती, कोणी कितीही करारे हल्ला, लय मजबुत थोरात साहेबांचा संगमनेर विधानसभेचा किल्ला".!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर विधानसभा मतदार संघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, विखे पाटलांनी ही निवडणूक चुरशीची केली आहे. मात्र, १९८५ पासुनचा इतिहास पाहिला तर संगमनेर तालुक्यात एकदा निवडणूक झाली की विरोधातील उमेदवार जनतेकडे पाठ फिरवताना तालुक्याने पाहिले आणि जनतेनेही विरोधातील उमेदवाराला नाकारताना पाहिले. त्यामुळे, आ. थोरातांपुढे कोणाचा ही ठाव ठिकाणा लागला नाही. इतकेच काय.! थोरात साहेबांना विधानसभेला विरोध फार दुर साधा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका येथे देखील बोटावर मोजण्या इतके विरोधात निवडुन येत नाही. त्यामुळे, आजतागायत स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये देखील विरोधकांचा सुपडासाफ केलेले सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे, "कोणी कितीही लावा शक्ती, कितीही लावा युक्ती, तुम्ही कितीही करारे हल्ला, लय मजबुत थोरात साहेबांचा संगमनेर विधानसभेचा किल्ला" अशीच काहीशी गत पहिला मिळाली आहे. आता विखें पाटील ताकत आजमावत आहे. मात्र, किती मतदानात रूपांतर होते. हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
खरंतर, आ. थोरात साहेब भर भाषणा मध्ये म्हणत असतात. विरोधकांना कधी अडचड येऊ दिली नाही. विरोधकांनी संस्था उभारल्या कॉलेजस उभारले साधा मिठाचा खडा ठाकला असता तर काही झाले असते पण तसे कधी केले नाही. विरोधकांच्या कॉलेजसला सही सुद्धा आपण मिळवून दिली. त्यामुळे, हे संस्थात्मक राजकारणाचा आ. थोरात याना कधी तोटा झाला नाही. हे संस्थात्मक विरोधक देखील कधी लाल्या गोड आणि बाल्या गोड असे करताना दिसतात. जिथे सत्ता असेल तेथे घुसुन घेणे आणि शांत बसने हाच एकमेव पर्याय ते वापरतात. हे संस्थात्मक राजकारणी विरोधातील महत्वाची पदे अवठून धरतात. पदावर दावा करतात. पाठीमागे कोणी नसलेले चार-दोन लोक सोबत ठेवतात. त्यांच्या पाठीमागे ग्रामपंचायत,सोसायटी, दुधडेअरी साधा सदस्य नसतो. त्यामुळे, आ. थोरात साहेब यांना विरोधकांचा धसका घेवा असे कधी वाटले नाही. ते संपूर्ण राज्यात फिरवुन आपली मुहूर्तमेढ रोवुन आपले काँग्रेस मधील स्थान अटळ केले आहे. महाविकास आघाडीचा दुवा झाले आहे. त्यामुळे, आता थोरात साहेबांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये आहे. जर महाविकास आघाडी सरकार सत्तेत बसले तर मुख्यमंत्री नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विरोधकांच्या पदासाठी बेडुक उड्या
संगमनेर तालुक्यातील विरोधक कधीच एका पक्षात स्तिर राहत नाही. त्यामुळे, राज्यात लोकसभेला गद्दारीला धडा शिकवला तसाच येथील विरोधकांना वारंवार धडा शिकवला आहे. मुळात भाजपने आयात केलेल्या नेत्यांना पद वाटले आहे. सतीश कानवडे हे काँग्रेस कडुन बाजार समितीचे उपसभापती होते. त्यांचा भाजपात प्रवेश झाला त्यांना लगेच भाजपचे तालुका अध्यक्ष केले. मंत्री होते तोपर्यंत विखें पाटलांसोबत फिरले तालुका अध्यक्ष होते तोपर्यंत दिसले त्यानंतर ते अदृश्य झाले. हीच परिस्थिती डॉ.अशोक इथापे यांची. ते राष्ट्रवादी काँग्रेस मधुन आले आणि त्यांना देखील भाजपचे तालुका अध्यक्ष केले. माजी आ. राम शिंदे पालकमंत्री असताना त्यांच्या गाडीत फिरले. पण तालुक्यात फिरताना दिसले नाही. त्यांच्याकर्यकाळात बोटावर मोजण्या इतक्या सुद्धा ग्रामपंचायत ताब्यात आल्या नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे हे सुद्धा शिवसेनेतुन आले भाजपात महत्वाचे पद घेतले ते जिल्हाध्यक्ष झाले. त्यांनी जंम्बो कार्यकारणी केली. २४ पदे हे त्यांनी संगमनेरात दिली खरी पण ती कार्यकारणी आता निवडणूकीच्या काळात मैदानात दिसत नाही.
आता रणभूमीत कर नाहीतर मर अशी भूमिका असताना हे चेहरे तन, मन, धनाने मैदानात दिसत नाही. जे शिवसैनिक जनार्दन आहेर हे २०१४ ची विधानसभा निवडणुक लढले तालुका अध्यक्ष झाले. त्यानंतर अनेक कुरघुड्या झाल्या. तालुका अध्यक्ष पद गेले ते पक्षात ऍक्टिव दिसले नाही. त्यामुळे, जिल्हा प्रमुखांनी त्यांना निलंबित केले. याचा परिणाम सर्व विधानसभेत दिसतो तोच अमोल खताळ यांना देखील होऊ शकतो त्यांचे पक्षप्रवेश विरोधकांचा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे, अनेकांच्या बेडुक उड्या पदासाठी पाहायला मिळाल्या याचा परिणाम मतांवर होतो असे मत जाणकारांचे आहे. याउलट आ. बाळासाहेब थोरात यांची पक्षनिष्ठा ही राज्यात लढवय्या म्हणुन रुजवली जाते. इतिहास त्यांचाच लिहला जातो जे मैदान सोडुन पळ काढत नाही. पावनखिंडीचा इतिहास आ. बाळासाहेब थोरात हे आवर्जून सांगतात.
शिवसेना शिंदे गटाची संगमनेरात ताकत काय?
राज्यात शिवसेना फुटली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. त्यांना पक्ष व चिन्ह मिळाले. त्यांच्या सोबत शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे देखील गेले. परंतु त्यांना संगमनेरात शिवसेना शिंदे गटाची ताकत निर्माण करता आली नाही. पद मिळाले की राजीनामा हेच सत्र सुरू राहीले. त्यामुळे, शिंदे गट फाईट देण्याऐवजी त्यांच्यामध्ये नाराजीचे नाट्यमय घडामोडी रंगत राहिल्या. संपूर्ण कार्यकाळ कोणाला पद देखील दिले नाही. माजी खासदार सदाशिव लोखंडे हे देखील संगमनेर मतदारसंघामुळेच पराभूत झाले. त्यांना नेवासा, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव येथुन लीड मिळाले. मात्र, संगमनेरातुन 30 हजारांनी व अकोल्यातुन 50 हजार मतांनी मागे पडले. त्यामुळे, जे खासदार सदाशिव लोखंडे संगमनेरमुळे लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. तिथे आमदार शिवसेना शिंदे गटाचे निवडून आणने म्हणजे तारेवरची कसरत असणार आहे. विखें पाटील यांनी अमोल खताळ यांच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणले आहे. त्यांना विधानसभेत किती मतदान होईल हे येत्या २३ तारखेला सर्वांसमोर मताची आकडेवारी येईलच.