छी.! इयत्ता ३ रीच्या वर्गशिक्षकाचे विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे, नालायक नराधमावर गुन्हा दाखल.! एकट्या पाहून चिमुकल्यांवर अत्याचार.!
सार्वभौम (संगमनेर) :-
बदलापूर येथील घटनेत पिडत चिमुरड्यांवर अत्याचार करणारा एक शिपाई होता. मात्र, संगमनेर तालुक्यात मात्र, एका शिक्षकानेच इयत्ता तिसरीच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क हा शिक्षक एकाच मुलीशी नव्हे.! तर, वर्गातील अनेक मुलींशी अश्लिल चाळे करीत असल्याचे मुलींनी पालकांना सांगितले आहे. त्यामुळे संस्काराचे धडे गिरविणार्या संगमनेर तालुक्यात चक्क शिक्षकच नराधम निघाल्याचे समोर आले आहे. ही घटना दि. शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळशिराम यशवंतराव बांबळे (रा. डोळासणे, ता. संगमनेर, जि. अ.नगर) असे या शिक्षकाचे नाव आहे. घटना घडताच गावकऱ्यांनी शिक्षकाला यथेच्छ चोप दिला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपी ताब्यात घेतल्याने जनतेचा रोष शांत झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराडी येथे विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते. सकाळी मंथनचा क्लास असल्यामुळे इयत्ता ३ रीच्या विद्यार्थीनी लवकर आल्या होत्या. १०:३० वाजता प्रार्थना झाली आणि मुले-मुली वर्गात गेले. त्या दिवशी सकाळपासून शिक्षकांचे चलिंत्र काही ठिक दिसत नव्हते. दुपारी १ वाजता शालेय पोषण आहार खाण्यासाठी शिक्षकांनी शाळा सोडून दिली. त्यामुळे, सर्व विद्यार्थी जेवण करण्यासाठी बसले. यावेळी शिक्षक देखील जेवणासाठी गेले होते.
दरम्यान, दुपारी १:३० वाजताची वेळ होती. शाळेतून एक मुलगी रडत रडत घरी गेली. तेव्हा वडील कामावर गेले होते. तर आई घरकाम करीत होती. मुलगी अचानक घरी का आली? असा प्रश्न पडला म्हणून मुलगी घरी आली हे ठिक होते. मात्र, ती रडते का? हे जाणून घेण्यासाठी आईने तिला जवळ घेतले. शाळेत कोणी मारले का? कोणी तुला बोलले का? कोणी तुझ्याशी कट्टी घेतली का? असे अनेक प्रश्न करीत आईने आपल्या मुलीच्या मनात चाललेले द्वंद्व थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळानंतर पीडित विद्यार्थीनीने घडलेला प्रसंग सांगण्यास सुरूवात केली.
तीने सांगितले. की, दुपारी जेवणाची सुट्टी झाली होती. मी जेवण करुन सर्वात पहिल्यांदा वर्गात आले होते. त्यावेळी वर्गात आमचे वर्गशिक्षक बाळशिराम यशवंतराव बांबळे हे वर्गातच त्यांच्या खुर्चीवर बसलेले होते. पीडित मुलगी पाणी पिण्यासाठी तिच्या बाकड्यावर बसली होती. तेव्हा वर्गशिक्षक बाळशिराम बांबळे हा मुलीच्या जवळ गेला आणि त्याने मनात गलिच्छ भाव निर्माण करून मुलीशी अश्लिल चाळे केले. आपले सर असे काय करत आहे हे पीडित मुलीस समजले नाही. मात्र, त्यांनी आपल्या विद्यार्थीनीच्या मागून जाऊन घानेरडे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने या नराधमाच्या ताब्यातून सुटका केली आणि अन्य कोणावर अवलबून न राहता तिने घर गाठले.
दरम्यान, शाळेत घडलेला प्रकार पीडित मुलीने आईशी शेअर केला. तेव्हा मात्र, त्या माऊलीला प्रचंड वाईट वाटले. तिने कामावर गेलेल्या पतीस फोन लावला आणि तातकडीने घरी बोलावून घेतले. पीडित मुलीचे वडील आले असता त्यांनी थेट शाळा गाठली. शाळेचे मुख्याध्यापक भागवत सर यांची भेट घेतली. हा जो काही प्रकार मुलगी सांगत आहे तो खरा आहे का? त्यावर भगवत सर यांनी चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तर आणखी भयान सत्य बाहेर आले. त्यांनी आणखी चार पाच मुलींना बोलावून घेतले. त्यांचे जबाब घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अन्य मुलींनी देखील सांगितले. की, हे सर आमच्या छातीहून कायम हात फिरवितात, गुप्तांगाला हात लावण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर पालकांचा मात्र पार सरका. त्यांनी थेट पोलीस ठाणे गठले आणि वर्गशिक्षक बाळशिराम यशवंतराव बांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गुड टच ऍण्ड बॅड टच
ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि आयुष्य घडविण्याची जबाबदारी दिली आहे. तेच शिक्षक असे घाणेरडे कृत्य करीत असतील तर यापेक्षा घाणेरडे काय असू शकते. कुंपनच जर शेत खात असेल तर विश्वास ठेवायचा कोणावर? विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यात गुड टच ऍण्ड बॅड टच शिकविण्याच्या सुचना होत्या. आता प्रश्न पडतो की, या बांबळे शिक्षकाने गुड टच ऍण्ड बॅड टच म्हणून काय आणि कसे शिकविले असेल? अशा नालायक शिक्षकांनी किमान जनाची नव्हे तर मनाची तरी ठेवली पाहिजे. आपल्या पोटच्या लेकरांच्या वयाच्या मुलींसोबत असले घाणेरडे कृत्य करण्याचे धाडस यांचे होत असेल तर अशा नराधमांना शिक्षकी पेशातून बडतर्फ केले पाहिजी अशी मागणी आता होऊ लागली आहे.