ओढा गांजा.! संगमनेरमध्ये तब्बल सव्वाकोटी रुपयांचा 454 किलो गांजा जप्त, आरोपी झाला फरार.!


सार्वभौम सह्याद्री (संगमनेर) :-

                    संगमनेर शहरालगत असणाऱ्या सुकेवाडी येथे नार्कोटिक्स डिपार्टमेंट कडुन मोठी कारवाई करण्यात आली. आज रविवार दि.11 डिसेंबर रोजी पहाटे सुकेवाडी गावातील परिसरात 454 किलोंचा तब्बल 1 कोटी 14 लाख 50 हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला असुन याप्रकरणी तुषार उत्तम पडवळ (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यास आरोपी करण्यात आले आहे. ही धडाकेबाज कारवाई नाशिक येथील नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांनी केली. या कारवाई नंतर आरोपी तुषार पडवळ हा फरार झालेला आहे. मात्र, ही एक मोठी कारवाई करण्यात आली असुन हे कोणाला माल देत होते. कोणाकडून आणत होते, यांचे सबडिलर कोण आहे. यांच्या मागिल कर्ताधरर्ता कोण? याची सखोल चौकशी सुरू आहे. खरंतर, नाशिक वरून पथक संगमनेरात येते. 454 किलोचा गांजा पकडते. मात्र, संगमनेर शहर पोलीस करतात तरी काय? तपास पथक करते काय? फक्त किरकोळ गुन्हे हाताळायचे आणि जनतेची दिशाभूल करण्यात येथील पोलीस पटाईत असल्याची टीका आता होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुकेवाडी गावात काही तरुण अम्ली पदार्थाची विक्री करत असुन मोठे रॅकेट चालवत असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना मिळाली. त्यांनी एक पथक तयार करून सुकेवाडी येथे रवाना झाले. सुकेवाडी गावात आरोपी तुषार पडवळ यांच्या घरापासुन हे गांजाचे रॅकेट चालते याची खात्री पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना झाल्यानंतर. त्याच्या घराची झडती घेतली असता 300 किलो गांजा घरात मिळून आला. संपूर्ण घराची झडती घेतली असता परिसरातच एक छोटाहाती टेम्पो उभी होती. या टेम्पो मध्ये काही आहे का? असे विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. या टेम्पोमध्ये गांजाचे पॅकेट करून ठेवलेले होते. त्यावर मोठा पडदा टाकलेले होता. जेव्हा हा पडदा काढला तेव्हा या टेम्पोमध्ये 150 किलो गांजा या पाकिटांमध्ये आढळुन आला. 

       दरम्यान, पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पोलिसांनी सोबत नेलेले पंच, फोटोग्राफर व वजनकाटा यांच्या सहाय्याने सबळ पुरावे जमा करण्यात आले.  त्यावेळी प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक केलेले हिरवट पाने, काड्या व बिया असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला उग्रवास असलेला गांजा मिळून आला. यामध्ये तब्बल 454 किलोंच्या सुका गांजासह अन्य वस्तु धरून 1 कोटी 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईने नाशिक नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पोलीस उपअधिक्षक गुलाब पाटील यांचे सर्वत्र कौतूक होत असुन स्थानिक पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत आहे. ही दमदार कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज खरे, पो. ना. माळी, पो. हे.कॉ. विश्वास बेरड, पो. ह.डांबले, पो. कॉ.गणेश महाले, पो. कॉ. वैभव पांढरे, गणेश मिसाळ पो. कॉ. चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

        दरम्यान, संगमनेर शहर हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडला हे स्थानिक पोलिसांना माहीत नाही असे होऊ शकत नाही. कारण, कोठ्यावधी रुपयांचा गांजा फक्त एक गावात चालतो. आणि ते पण एक फरार आरोपी संगमनेर शहरात हा गांजाचा धंदा करतो हे पोलिसांना माहीत नसावे का? येथे किती जणांचे हात मलिद्याने बरबटलेले आहे. शहर पोलीस ठाण्यातील डीबी जशी नव्याने स्थापन झाली तशी काही अवैध धंद्यांना अभय मिळाले असल्याचे आता बोले जाते. वर्षानुवर्षे फरार आरोपी, चैन स्नॅचिंगची रिकवरी, दरोड्यातील, खुनातील आरोपी अद्याप यांचा अजूनही उलगडा झालेले नाही. तर शहर हद्दीतील गांजातील मुख्य आरोपी असलेली फरार महिला आजही शहर हद्दीत गांजाचा धंदा करत असल्याचे बोले जाते. या आरोपी महिलेचे पती मयत झाल्यानंतर ती सर्व विधीला उपस्थित होती. असे फोटो देखील सोशल मीडियाला व्हायरल झाले. त्यानंतर, काही खकितील अधिकारी व कर्मचारी यांनी पाच अंकी आकड्यातील मोठा मलिदा घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. तर गुन्हेगारीतील मोठ्या मासेंना अभय देऊन छोट्या मास्यांना गळाला लावुन किरकोळ स्वरूपाची कारवाई संगमनेर शहरात करण्यात येते.