कॉलेजच्या मुलीचे अपहरण, ओरडली तर फोटो व्हायरल करण्याची धमकी, छोटा हत्तीत घेऊन तिला तो पेमगिरीला गेला, गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                      राज्यासह संगमनेर तालुक्यात लव जिहाद तापलेले असताना पुन्हा-पुन्हा तरुणांकडे चुका होताना दिसत आहे. विशेष म्हणजे संगमनेर शहरात हजारो सकल हिंदु बांधव रस्त्यावर उतरले असताना देखील येथे लव जिहाद सारखे प्रकरण घडणे हे फार दुर्दैवी आहे. हे वातावरण कुठे थंडावत नाही तेच पुन्हा नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलीला हाय हॅलो मेसेज करून फ्रेंडशीप केली. तुला छोटा हतीमध्ये कॉलेजला सोडतो असे म्हणुन बसस्टँडवरून पेमगिरीकडे मुलीची इच्छा नसताना नेले. तु आरडा ओरडा केला तर तुझे फोटो व्हायरल करील अशी धमकी दिली. ती शांत गाडीत बसते. पुढे येऊन पिडीत मुलीचा हातात हात घेऊन ओढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पिडीत मुलगी गाडीखाली उतरते तितक्यातच दोन व्यक्ती तिथे येतात ते जाब विचारतात तेव्हा हे सर्व बिंग फुटते. त्यांनी पिडीत मुलीच्या वडीलांना फोन करून मुलगी ताब्यात देतात. हा सर्व धक्कादायक प्रकार मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पेमगिरी परिसरात घडला. याप्रकरणी अस्लम दादा पठाण (रा.मेंढवण, ता. संगमनेर) याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

           याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिडीत तरुणी ही संगमनेर शहरातील एका नामांकीत कॉलेज मध्ये नर्सिंग करत असुन ती दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. पिडीत मुलगी व आरोपी अस्लम पठाण हे एकच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांची लहान पणापासूनच ओळख होती.  मार्च 2024 मध्ये आरोपी अस्लम याने पिडीत मुलीला मेसेज केला. त्यानंतर हाय, हॅलोचे मेसेज सुरू झाले. नंतर हळूहळू फोनवर बोलणे सुरू झाले. त्यानंतर एकेदिवशी आरोपी अस्लमने पिडीत मुलीला आय लव यु असा मेसेज केला. पिडीत मुलीने त्याला कुठला ही रिप्लाय दिला नाही. पिडीत मुलीने फक्त फ्रेंड म्हणुन राहील रिलेशनशिप नको आहे असे सांगितले. त्यानंतर पिडीत मुलीचे व आरोपी अस्लम यांची चॅटींगवर बोलणे होत होते.

            दरम्यान, गुरुवार दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी  सकाळी 7:30 वाजता पिडीत मुलगी व तिची वहिनी हे स्कुटीवर संगमनेर शहरात आले. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आरोपी अस्लम याचा पिडीत मुलीला फोन आला व पिडीत मुलीला म्हणाला की, आपण दोघे कुठे तरी फिरायला जाऊ. पिडीत मुलगी म्हणाली की, मला कॉलेजला जायचे आहे. आरोपी अस्लम म्हणाला की, एक दिवस कॉलेज बुडवल्याने काय होणार नाही. पिडीत मुलीने फिरण्यासाठी नकार दिला. तेव्हा आरोपी अस्लम म्हणाला की, तुला कॉलेजवर सोडतो गाडीत बस त्याला पुन्हा गाडीत बसायला नकार दिल्याने आरोपी अस्लम याने पिडीत मुलीला गाडीत ओढले. मारायची धमकी देऊ लागल्याने पिडीत मुलगी गाडीत बसली. तो छोटा हाती घेऊन शहरातील बस स्टँडवरून पेमगिरी येथे 11 वाजण्याच्या दरम्यान पिडीत मुलीला घेऊन गेला.        

दरम्यान, पिडीत मुलगी आरोपी अस्लमला म्हणाली की इकडे कशाला आणले तर तो म्हणाला की गडावर जाऊ तेव्हा पिडीत मुलीने आरडा ओरडा सुरू केला तेव्हा आरोपी अस्लमने सेल्फी काढलेले फोटो व्हायरल करील अशी धमकी दिली. तो पिडीत मुलीचा हात हातात घेऊन ओढत होता तितक्यात पिडीत मुलीने चपळाई दाखवुन गाडीच्या खाली उतरते. तेव्हा रोडना जाणारे दोन व्यक्तीने हे पहिले असता त्यांनी विचारले गाडी मध्येच का थांबवली. तेव्हा पिडीत मुलीने सर्व घटनाक्रम सांगितला त्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांना व भावाला सांगितले असता त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले व पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून अस्लम दादा पठाण (रा. मेंढवण, ता. संगमनेर) याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.