40 वर्षे पाकीट देऊन थोरातांनी सेटलमेंन्टचे राजकारण केले पण आता पराभव अटळ, सुत्र फित्र काही नाही, सुजय विखेच उमादवार असू शकतो.!


 - सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर): विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली. डॉ. सुजय विखें यांची पहिलीच सभा तळेगावात घेऊन शक्ती प्रदर्शन करून आ. थोरात यांना आव्हान दिले. आतापर्यंत चाळीस वर्षे तुम्ही सेटलमेंटचे राजकारण केले. चाळीस वर्षात तुम्हीच उमेदवार निवडायचा पाकीट पोच करायचे तोच उमेदवार मिळायचा. मात्र, आता असा गडी आलाय नो सेटलमेंट. ज्या दिवशी विकत न घेणारा माणुस तुमचं नेतृत्व करेल. तो कुठल्याही पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही. दडपशाहीला घाबरणार नाही. कुठल्याही गोष्टीवर ज्याला परिणाम होणार नाही असाच उमेदवार आता तुम्हाला मिळणार. कोणी दाखवलं सुजय विखें याना तिकीट नाकारलं कोणी दाखवलं शिवसेनेच्या हक्काची जागा आहे त्यांना जागा सुटली. मुंबईला बसुन पाहिले हे काय चाललंय सूत्रांची माहिती. आता कुठले सूत्र तर यशोधनचे सुत्र यांची इतकी हवा ताईट झाली की, ते आता बातम्या पेरायला लागले. दोन दिवसांमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटणार. त्यामुळे, जे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहताय हे आमदार होणे सुध्दा अवघड झालेले आहे. यांच्यापुढे आमदार राहते की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. आजची तळेगावची सभा हा जनसमुदाय, आलेला प्रत्येक व्यक्ती तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहे की संगमनेर विधानसभेच्या परिवर्तनाची नांदी ठरणारी ही सभा आहे. तळेगावची सभा हा ट्रेलर आहे "पिचर आभी बाकी है" मेरे दोस्त असे बोलत सुजय विखे यांनी आ. थोरतांवर जहरी टीका केली.
             ते पुढे बोले की, चाळीस वर्षे सत्तांतर करणारी ही सभा आहे. ही निवडणूक लढवायची असेल तर तुमच्याकडे चार गोष्टी अपेक्षित आहे. तुम्ही इथल्या आमदारांचे नातेवाईक पाहिजे, खडी क्रेशर आहे का?स्टोन क्रेशर चालवणारा पाहिजे, तुम्हाला जमिनीचा ताबा मारता येतो का? गरिबांची जमीन दिसली की ताबा मारायचा, एखादा प्रश्न तुम्ही चाळीस वर्षे लावुन धरू शकतो का? तो प्रश्न लांबवून त्यावर मतदान घेता आले पाहिजे असे असेल तरच आमदार होऊ शकतो असे प्रश्न उपस्थित करत आ. थोरातांवर टीकेची झोड उठवुन पिचरचा डायलॉग मारला आज के बाद "राजा का बेटा राजा नहीं,जो हकदार है वही राजा बनेगा" ही संगमनेर विधानसभेची टॅग लाईन आहे. असे बोलत हे आता संगमनेरचे राजकारण आहे. जर येथील आमदार यांनी जनतेवर काँट्रॅक्टर लादले तर आम्ही पाडणार. परिवर्तनाची नांदी तळेगाव मधुन झाली. मोठ्या-मोठ्या ठेकेदारांना ग्रामपंचायत मध्ये पाडले. या भुमीत ती ताकद आहे. तुम्ही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत राहिले या तळेगाव गटात ४४ कोटींचा निधी दिला. निमोण, तळेगाव, निळवंडे या परिसरातील कागद आला तर निधीकडे पाहिले नाही फक्त मंजुरी देऊन कोट्यवधीचा निधी दिला. कार्यकर्त्यांनी आता दडपशाही मोडीस काढायची आहे. जर तुम्हाला एकाला ही कार्यकर्त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर इथं येऊनच गाडेल हे तुम्हाला मी सांगतोय असे बोलून दहशतीचे झाकण येथे उघडणार असा सूतोवाच सुजय विखें यांनी नाव न घेता आ. थोरात यांना दिला.
          दरम्यान, चाळीस वर्षे तुम्ही राजकारण केले. २५ वर्षे मंत्री राहिले. याच तळेगाव परिसरातील महिलेच्या डोक्यावरील हंडा तुम्हाला खाली घेता आला नाही. त्यामुळे, तुम्हाला आमदारकीचा फॉम् भरण्याचा देखील अधिकार नाही. चाळीस वर्षात हंडाखाली उतरवता आला नाही तो दोन वर्षात उतरवणार परिवर्तन करून दाखवा भोजपुरचं पाणी सुजय विखेच देऊ शकतो हे स्पष्ट सांगतो. तुम्ही तुमचं काम केलं असत गरिबांना न्याय दिला असता सातत्याने खोटे बोले नसते. गरिबांच्या भावनेशी खेळले नसते. तर आज ही सभा झाली नसती पण आता ही ऐतिहासिक सभा झाली. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा परिवर्तन घडवून आणणार आहे. येथील लोकप्रतिनिधींवर विश्वास कमी होत गेला. विश्वासहर्ता राहिली नाही. त्यामुळे, या मतदारसंघाची जबाबदारी विखे पाटील घेत आहे. ज्या योजना प्रवरा विभागात आहे त्याच आता तळेगाव भागात देखील देणार आहे.
           
दरम्यान, सुजय विखें यांनी छोटासा प्रश्नाचे उपस्थित केला की, या तालुक्यात जिल्हा बँकेचे पुस्तक लिहले गेले.पण, सर्वसामान्य माणुस जिल्हा बँकेचा कधी चेअरमन झाला नाही. जिल्हा परिषद सदस्य सर्व येतात पण कधी सर्वसामान्यला कधी जिल्हा अध्यक्ष केले नाही. पंधरा वर्षे संगमनेर नगरपरिषदे मध्ये एकाच घरात सत्ता आहे पण कधी सर्व सामान्य केला नाही. कारण, तो येथील आमदारांचा नातेवाईक नाही अशी खोचक टिका आ. थोरात यांचे नाव न घेता केली. मात्र, आता मनमानी बस झाली. या पुढचा संगमनेर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष हा सर्वसामान्य, गोरगरीब घरातील करून दाखवणार हा विखे कुटुंबाचा शब्द आहे. दहशत जोर्वे गावात पहा. जोर्वे गावात महिलांना गृह वस्तू वाटल्या या मध्ये काही कर्मचाऱ्यांच्या महिला होत्या त्यांना काढुन टाकण्याची भाषा वापरली. ही दहशत आहे आणि तुम्ही आमच्यावर आरोप करतात. मात्र, ही सभा सांगुन जाते आम्ही दबणार नाही. या तालुक्यात परिवर्तन अटळ आहे. एक नवा सुर्य उगुण या पिढीला व पुढील पिढीला समृद्ध करील.