कर्ज देतो म्हणत शेतकऱ्याची जमीनच खरेदी करुन घेतली, चेअरमनसह 14 जणावर गुन्हा दाखल.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :-
तालुक्यातील सावरगाव घुले येथील एका शेतकऱ्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कवडीमोल भावात शेती हडप करण्याचा पतसंस्थेने डाव आखला. शेतकऱ्याला पतसंस्थेतुन गहाणखत करायचे असे संस्थेचे चेरमनने सांगुन कर्ज देतो असे बोलवून उपनिबंधक कार्यलयात बोलवले तेथे गहाणखत करण्या ऐवजी खरेदीखत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. येथेच चेअरमन व पतसंस्थेचे उद्योग थांबले नाही. त्यांनी शेतकऱ्यावर कर्ज देखील दाखवले आणि शेतकरी व साक्षीदार यांची जमीनीचा निकाल देखील आपल्या बाजूने लावून घेतला. शेतकऱ्याला भूमीहीन केले. तेव्हा शेतकऱ्याने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. कोर्टाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देऊन पतसंस्थेचे चेअरमनसह कै. विमल गुंजाळ ग्रामीण शेती पतसंस्थेवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय देण्यात आला. त्यानंतर आरोपी मधुकर बादशहा वाळे (रा.झोळे, ता. संगमनेर), सविता साहेबराव हासे (रा.झोळे, ता. संगमनेर), पोपट सोमनाथ एरंडे (रा. झोळे, ता. संगमनेर), सीताराम निवृत्ती फटांगरे (रा. झोळे ता. संगमनेर), शांताराम रेवजी जाधव( रा.झोळे,ता.संगमनेर), कुसुम मधुकर वाळे (रा. झोळे, ता. संगमनेर) राधाबाई दत्तू राहणे (झोळे, ता. संगमनेर) मिराबाई साहेबराव हासे (रा. झोळे, ता. संगमनेर ) मारुती रामकृष्ण वाळे (रा. झोळे, ता. संगमनेर), मच्छिंद्र भिकाजी घुले (रा. झोळे, ता. संगमनेर), गोविंद लक्ष्मण घुले (रा. झोळे ता. संगमनेर), रावसाहेब कारभारी टेकुडे (रा,झोळे. ता. संगमनेर), संजय शिवाजी घुले (रा, झोळे. ता. संगमनेर), किरण लहानु घुले (रा.झोळे, ता. संगमनेर) यांच्यावर फसवणुकीसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावरगाव घुले येथील खरात यांना आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी २०१४ साली झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर बादशहा वाळे यांच्याशी संपर्क साधला. त्याने दिनांक 20 फेब्रुवारी 2014 रोजी दोन लाख रुपये कर्जाची मागणी केली. तुमचे नावावर जमीन आहे का? असे पतसंस्थेच्या अध्यक्षांनी त्याला विचारले. खरात यांनी गट नं. 829/2 चा उतारा दाखवला. त्यावेळी चेअरमन मुधकर वाळे म्हणाला की, हा चालेल, एक लाखापेक्षा तुमची रक्कम जास्त असल्याने गट नं. 829/2 ही जमीन ही पतसंस्थेच्या नावाने तुम्हाला गहाणखत करून द्यावी लागेल असे त्याला सांगण्यात आले. यानंतर खरात व त्यांचे वडिल यांनी गहाणखताकरीता होकार दर्शविला. त्याने गावातील बाळासाहेब दगडु खरात यास गहाणखताकरीता साक्षीदार म्हणून बोलावून घेतले. त्याच दिवशी पतसंस्थेचे अध्यक्ष पतसंस्थेतून फिक्स लोन कर्ज अर्ज, वचन चिठ्ठी, प्रतिज्ञापत्रक हे कागदपत्र घेवून कर्जदार, त्याचे वडिल व बाळासाहेब दगडु खरात यांना सब रजिस्ट्रार ऑफिस येथे घेवून गेला. त्याठिकाणी फिक्स लोन कर्ज रोखा, फिक्स लोन कर्ज अर्ज, वचन चिट्ठी या सर्व को-या फॉर्मवर पतसंस्थेचे अध्यक्षाने कर्जदार व त्याचे वडिल भागा श्रावणा खरात व जामीनदार बाळु उर्फ बाळासाहेब दगडु खरात यांच्या सह्या घेतल्या. त्याठिकाणी बसायला लावून गहाणखताचा कागद टाईप करून आणतो असे सांगुन पतसंस्थेचे अध्यक्ष बाहेर गेला.
दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आला. तुम्ही आता सब रजिस्ट्रार यांच्यापुढे फक्त सह्या करा, बाकी सह्या मघाशीच घेतल्या आहे, वेळ जास्त झाली आहे, ऑफिस बंद होण्याचा टाईम झाला आहे" असे सांगुन अध्यक्षाने त्यांच्या सह्या खरेदीखताच्या दस्तावर करून घेतल्या व त्याप्रमाणे दस्त नोंदवून घेतला. दस्त नोंदवून घेतल्यानंतर गहाणखत झाले असे सांगून त्याने कागदपत्र स्वतःच्या ताब्यात ठेवले. तालुक्यातील सावरगाव घुले येथील खरात कुटुंबाची गट नं. 829/2 ही मिळकत स्वतःचे नावे करून घेतली. कर्जदार याने त्यावेळी रकमेची मागणी केली असता रक्कम मिळायला 10 ते 15 दिवस लागतील, पतसंस्थेमध्ये कागदपत्रांची नोंद पहिली करावी लागते असे वाळे याने सांगितले. वारंवार रकमेची मागणी केल्यानंतर दस्त नोंदूवन घेतल्यानंतर 10 ते 15 दिवसाने वाळे याने एक लाख दहा हजार चा चंदनापुरी येथील अहमदनगर डिस्ट्रीक्ट कॉ.ऑपरेटीव्ह बँकचा चेक दिला. सदरची रक्कम त्याने परत घेतली. वाळे याने बाळासाहेब खरात यांना काय कागद केला, किती रकमेचा केला, याबाबत काही माहिती दिली नाही त्यानंतर बोगस, वचन चिट्ठी चिठी, फिक्स लोन कर्ज अर्ज, फिक्स लोन कर्ज रोखा या खोट्या कागदपत्रांच्या आधारे सहीचा गैरफायदा घेवून को-या फॉर्मचा गैरवापर करून दि. 20 में 2014 रोजी केलेल्या सह्यांच्या आधारे दि. 25 एप्रिल 2014 चे गहाणखत प्रकरण दाखवून सदर कर्ज प्रकरणाची रक्कम रु.1 लाख 70 हजार त्याचा कालावधी पाच वर्षाचा दाखवून मासिक हप्ता 4 हजार 930 रुपये दाखवून परतफेड ता. 25 फेब्रुवारी 2019 दाखवून त्या अनुषंगाने सहकारी पतसंस्था कायदा क्र. 101 प्रमाणे अर्ज दाखल केला.
उपनिबंधक यांच्याशी आरोपी वाळे याने हात मिळवणी करून खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे कोणतीही कर्जाची तारीख नमूद नसताना, कर्जाची रक्कम नमूद नसताना, फिक्स लोन किती पाहिजे, कशा करीता पाहिजे, फेडीची मुदत, फेड कशी करणार, याचा कुठलाही मजकुर नमूद नसताना, तसेच वचन. चिठ्ठीमध्ये कोणतीही तारीख नमूद नसताना, कर्जाची रक्कम नमूद नसताना, फिक्स लोन कर्ज रोखा यामध्ये लिहून घेणार यांचे नाव नमूद नसताना, लोन तारीख नमूद नसताना, बेकायदेशीररित्या रक्कम 5 लाख 33 हजार 762 रुपयांचा निकाल फिर्यादी व जामीनदार बाळासाहेब खरात यांचे विरूध्द कोरोना कालावधीचे बंधने असताना पारीत केला. त्यामुळे, निकालाच्या अनुषंगाने वसुली अधिकारी याने तत्पर जामीनदार बाळु दगडु खरात यांच्या मौजे सावरगाव धुले येथील त्याचे नावे असलेल्या गट नं. 102, 80, 82, 835, 887 या मिळकती जप्त करून इतर अधिकारात कै. विमल गुंजाळ ग्रामीण पतसंस्थेचे नाव लावले. फिर्यादी यास उपनिबंधक यांची नोटीस आल्याने त्याने पतसंस्थेचा अध्यक्ष मधुकर बादशहा वाळे मॅनेजर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कागदपत्रांची मागणी केली. वेळोवेळी कागदपत्रे मागुनही त्यांनी कागदपत्रे दिली नाही.
दरम्यान, त्यानंतर घरात कुटुंबाने दि. 21 जुन 2024 रोजी वकिलामार्फत नोटीस देऊन कागदपत्राची मागणी केली. सदर नोटीस मिळूनही कोणतीही कागदपत्रे देण्यात आली नाही त्यामुळे खरात यांनी 07ऑगस्ट 2024 रोजी सहाय्यक निबंधक अहमदनगर यांचे कार्यालयात जावून कागदपत्र मिळणेकरीता अर्ज दिला. सदरची कागदपत्रे त्यांना त्याच दिवशी प्राप्त झाली. यानंतर फिर्यादी व जामीनदार यांचे विरुध्द सहकार कायद्याचे कलम 101 ची कार्यवाही करण्याकरीता पंच कमिटी सभा दि.31 जुलै 2020 रोजी घेतली. यामध्ये ठराव मंजूर करून् घेतला त्यावर सुचक म्हणून आरोपी मधुकर वाळे, अनुमोदक सिताराम फटांगरे, चेअरमन म्हणून एरंडे पोपट सोपान व सिताराम व मॅनेजर यांनी सह्या केल्या. दि. 30 जुन 2021 रोजी संचालक मंडळ सभा घेवून ठराव घेऊन मॅनजेर सविता हासे, व क्लर्क रावसाहेब टेकुले यांना अधिकार दिले, कोणतेही गहाणखत झालेले नसताना त्याची सर्वांना माहिती असताना सर्वांनी बेकायदेशीर ठराव पास करून संगनमत करून कट रचला, उपनिबंधक अहमदनगर (परसेवा) यांचेकडे आरोपी 14 यांनी संगनमत करून फिक्स लोन कर्ज अर्ज, फिक्स लोन कर्ज रोखा, वचनचिड्डी, कर्ज लेजर तसेच आरोपी सविता हासे हिने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र, व आरोपी मधुकर वाळे याने बनवलेले बेकायदेशीर खरेदीखत यांचे अवलोकन करता संगनमत करुन आरोपी यांनी खालील बेकायदेशीर कृत्य केले आहे. त्याचा तपशिल "उपनिबंधक अहमदनगर (परसेवा) यांनी दिलेल्या निकालाचे अवलोकन केले असता, नमुना "यु" मुद्दा क्र. 3 वरती फिर्यादी यांनी दि. 20 फेब्रुवारी 2005 रोजी कर्ज मिळणेकरीता रितसर अर्ज दाखल केला, जाब देणार नं. 2 ते 3 यांनी जामीनदार राहण्याचे कबुल केले हे दिसत आहे." त्याचप्रमाणे मुद्दा क्र. ६ मध्ये जाब देणा-याने पतसंस्थेत दि. 25 फेब्रुवारी 2014 रोजी डिमांड प्रॉमिसरी नोट आणि योग्य ते दस्तऐवज करारनामे लिहून दिले आहे असे दिसत आहे.
दि. 20 फेब्रुवारी 2005 रोजीच कर्ज मंजूर झाले हे दिसत आहे. एकमिलाफी होवून आरोपींनी कागदपत्र ही बेकायदेशीर केले आहे. कागदपत्रांचे अवलोकन केले असता कर्जाची माहिती या सदरात कर्ज मंजूरी सभा दि. 31 डिसेंबर 2005 कर्ज मंजूरी दि. 31 डिसेंबर 2005 ही एकाच दिवसाची दिसत आहे. ज्यादिवशी कर्ज मंजूर झाले त्याच दिवशी फिर्यादी यांना ते मिळू शकले असते परंतू कर्ज उचल दिनांक 25 फेब्रुवारी 2014 ही त्यांनी दाखविली आहे. जवळपास मंजूर झालेले कर्ज हे कोणीही 10 वर्षाने घेत नाही, वरील सर्व तारखा या अफरा तफर करण्याच्या उद्देशाने स्वतःचा गुन्हा झाकरण्याकरीता विचारपूर्वक टाकलेल्या आहेत. असे करून आरोपीने गंभीर गुन्हा केला आहे. खोट्या तारखा नमूद करून, खोटी कागदपत्रे तयार करून आरोपींनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे. उपनिबंधक अहमदनगर (परसेवा) यांनी पारीत केलेल्या निकालासोबत पतसंस्थेच्या अध्यक्षांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रे , तारखा या सर्व चूकीच्या आहेत. फिर्यादी यांनी कधीही सदर पतसंस्थेकडून कर्ज घेतलेले नाही, केवळ खरेदीखताचा व्यवहार उघडिस पडू नये म्हणून गहाणखत आरोपींनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे व फिर्यादी हा अशिक्षित असल्याचा व अनुसूचित जातीचा असल्याचा गैरफायदा घेतलेला आहे. आरोपी नं. 1 व 2 यांचेकडे फिर्यादी कुटूंबास कर्ज दिले नसल्यामुळे हि खरीवस्तुस्थिती असल्यामुळे त्यांचेकडे रकमेबाबत कोणतेही कागदपत्रे नाहीं, स्टेटमेंट नाही, अथवा पतसंस्थेतून भरणा त्यांना मिळाल्याबाबतचा तपशिल नाही. त्याचप्रमाणे सदर पतसंस्थेने कसे पैसे वर्ग केले, किती तारखेला पैसे वर्ग केले, त्या तारखेला सदर पतसंस्थेमध्ये किती ठेव / रक्कम शिल्लक होती याचा तपशिल दाखल केलेला नाही. खोटी कागदपत्रे तयार करून फिर्यादी कुटुंबाची जमिन खरेदीखताने गिळंकृत करण्याकरीता खोटे गहाणखत तयार करून त्या मार्फत आरोपी सर्व 14 आरोपीं यांनी संगनमत करून फिर्यादी कुटूंबाची व जामीनदार बाळासाहेब खरात याची जमिन बळकावली आहे. लिलाव करून तिचेवर बेकायदेशीररित्या बोजा तयार हा केला आहे. करीता आरोपी सर्व 14 जणांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
दरम्यान, उपनिबंधक अहमदनगर यांनी गहाणखताच्या नावाखाली खरेदीखत करून घेतले हि बाब दुर्लक्षित करून आरोपींच्या बाजूने निकाल पारीत केला. आरोपींनी संगनमत करून तयार केलेले कागदपत्र या अजर्जाचे / कागदपत्रांचे अवलोकन केले असता स्पष्ट दिसून येते की, सदर अर्जामध्येही कोणतीही तारीख नमूद नाही, पतसंस्थेकडून किती कर्ज घेतले हे नमूद नाही, त्यावरती साक्षीदारांचे नाव नमूद नाही, सही नाही, केवळ को-या कागदावर सह्या आहेत. पंच कमिटी सभा याचेही अवलोकन केले असता. सदर पंच कमिटी सभा यावरतीही कोणतीही तारीख नमूद केलेली दिसत नाही. आरोपी मधुकर वाळे व सविता हासे यांचा गुन्हा झाकण्याकरीता त्यांनी त्यास साथ दिलेली इतर आरोपीनी दिसून येत आहे. करीताही त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई व्हावी. ।) त्याचप्रमाणे उपनिबंधक अहमदनगर (परसेवा) यांचेकडे दाखल केलेल्या मॅनेजर सविता साहेबराव हासे यांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले असताना त्यामध्ये स्पष्ट दिसून येते की, कोणतीही तारीख त्यात नमूद नाही. संस्थेकडून किती तारखेला कर्ज घेतले, किती व्याजदराने घेतले, जाब देणार याचे नाव कोठेही नमूद नाही, त्याचप्रमाणे एकूण रक्कम किती होते हेही नमूद नाही, त्याचप्रमाणे संबंधीत मॅनेजर आणखी एक शपथपत्र दाखल केलेले दिसून येत आहे. त्यामध्ये अपेलंट याने पतसंस्थेकडे कर्जाची किती तारखेला मागणी केली, किती तारखेला वचन चिठ्ठी, करारपत्र करून दिले. याबाबतही कोठेही नमूद नाही हि बाब सुध्दा उपनिबंधक अहमदनगर (परसेवा) यांनी दुर्लक्षित करून कर्ज घेतल्याचा नसताना कर्ज घेतल्याचे दाखवले आहे. खरात यांच्या फिर्यादी वरून तालुका पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे मधुकर बादशहा वाळे, मॅनेजर सविता साहेबराव हासे,पोपट सोपान एरंडे, सिताराम निवत्ती फटांगरे, शांताराम रेवजी जाधव,कुसुम मधुकर वाळे राधाबाई दत्तु राहणे,मीराबाई साहेबराव हासमारूती रामकृष्ण वाळे,मच्छिंद्र भिकाजी घुले. गोविंद लक्ष्मण घुले,रावसाहेब कारभारी टेकुठेसंजय शिवाजी घुले,किरण लहाणु घुले या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
