जात प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठ्याने घेतले सहा हजार रुपये, एसीबीने रंगेहाथ पकडून ठोकल्या बेड्या.! संगमनेर तहसिल परिसरात कारवाई!


सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :- 

              जात प्रमाण पत्र काढुन देतो माझे तहसील व प्रांत कार्यलयात ओळख आहे. असे सांगुन एका तलाठ्याने व दोन एजंट यांनी सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार आज मंगळवार दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान तहसील परिसरात घडला. यात लाचखोर मुख्य आरोपी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे, (वय ५७ वर्षे) तलाठी आश्वी बु, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, आरोपी नं. 2) हितेश सोमनाथ घोडेकर (वय २८ वर्षे) धंदा मेडिकल स्टोअर रा. राजापूर रोड ढोलेवाडी ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर (खाजगी इसम) व आरोपी क्र. 3 तथा तलाठी बोऱ्हाडे याचा भाचा प्रतीक विजयकुमार कातोरे (वय २६ वर्षे) धंदा मेडिकल स्टोअर रा. सांगवी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही दमदार कारवाई अजित त्रिपुटे यांच्या पथकाने केली आहे. या घटनेचा पुढील तपास अ. नगर लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरिक्षक छाया देवरे करीत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लाचखोर तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे हे सेतु मध्ये पूर्वी काम करायचे. ते जुने तहसील समोर पूर्वी सेतू होता त्यामध्ये लाचखोर बाबासाहेब बोऱ्हाडे हे काम करत होते. तेथुन ते जात प्रमाणपत्र, शिक्षणासाठी लागणारे दाखले हे तरुणांना काढुन देत होते. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने सरकारी सेतु बंद केले आणि खाजगी सेतु चालू केले. जे सरकारी सेतूत काम करत होते त्यांना अंशकालीन मधुन वेवगळ्या डिपार्टमेंट मध्ये सरकारी नोकरी देण्यात आली. त्यामधूनच बाबासाहेब बोऱ्हाडे हे तलाठी झाले. त्यांना काही दिवसांपूर्वीच आश्वि बु येथे तलाठी म्हणुन काम करण्यात सुरवात देखील केली. ते तलाठी म्हणुन काम करत असले तरी त्यांनी अनेक वर्षे हे सेतु मध्ये काम करत असल्याने ते सेतु छोटे मोठे काम तलाठी असताना देखील करत होते. त्यामुळे, त्यांची सर्वांशी ओळख होती. सेतूच्या कामांसाठी देखील लोक त्यांना भेटत होते. अनेकांचे कामे लवकरात लवकर होत असल्याने लोक देखील त्यांची भेट आवर्जून घेत होते.

       दरम्यान, तक्रारदार हे शिक्षण घेत असून त्यांचा कुणबी जातीचा दाखला काढण्याकरिता व कास्ट व्हॅलेडीटी काढण्याकरीता बोऱ्हाडे तलाठी (आश्वी बु) याने त्यांची तहसील कार्यालयात व प्रांत कार्यालयात ओळख असल्याचे सांगून तक्रारदार यांच्याकडे १३ हजार रुपये लाच मागणी करून लाच स्वीकारली होती. तसेच आता लोकसेवक बोऱ्हाडे हे तक्रारदार यांच्या मोठ्या बहिणीचा कुणबी जातीचा दाखला काढण्यासाठी सहा हजार रुपये व कास्ट व्हॅलिडीटी काढून देण्याकरता सात हजार रुपये असे मिळून एकूण 13 हजार रुपये लाच मागणी करत असल्याबाबतची तक्रार यांनी सांगितले. यात आरोपी मुख्य आरोपी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे, (वय ५७ वर्षे) तलाठी आश्वी बु, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, आरोपी नं 2) हितेश सोमनाथ घोडेकर (वय २८ वर्षे) धंदा मेडिकल स्टोअर रा. राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर (खाजगी इसम) व आरोपी क्र. 3 तथा तलाठी बोऱ्हाडे याचा भाचा प्रतीक विजयकुमार कातोरे (वय २६ वर्षे) धंदा मेडिकल स्टोअर रा. सांगवी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तक्रारदार लाचखोर तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे यांच्याकडे आला. त्याने जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रे दिले. कागदपत्रे देऊन देखील ते वेळेत जातप्रमानपत्र भेटत नसल्याने तक्रादार हा तलाठ्यावर नाराज झाला. त्यामुळे तो तलाठ्याकडे आला त्यावेळी ते जातप्रमाणपत्र काढण्यासाठी तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे यांनी पैसे मागितले. तेव्हा हो न करता करता सहा हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपी तलाठीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. यात प्रांत कार्यालय तसेच तहसिल कार्यालयातील पडताळणी विभाग संगमनेर येथील दलालांची देखील चौकशी करावी. कारण आरोपी हा सामान्य माणसांकडून पैसा वसूल करुन तो गेल्या अनेक वर्षापासून कोणाला देत होता, त्याच्या नावे किती प्रकरणे निकाली काढली आहेत, यात किती अर्थपुर्ण तडजोडी झाल्या आहेत याची चौकशीची मागणी होत आहे.