अल्पवयीन मुलीला घरातून पहाटेच उचलून नेले, अत्याचार करताना आईने पकडले, तो पळाला, तिने गुन्हा नोंदविला.!


सार्वभौम (संगमनेर) :-  

                     संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला परिसरात एका 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दि.17 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे पाच वाजता तर मागील चार महिन्यांपासून वेळोवेळी सुरू होती. जेव्हा पिडीत मुलीच्या आईने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा सर्व पितळ उघडे पडले. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी थेट तालुका पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यावरून सुहास प्रदिप जाधव (रा. नान्नज, ता. संगमनेर) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.     

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नान्नज परिसरात पिडीत 17 वर्षीय तरुणी व आई वडील व भाऊ राहतात. ते मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्या परिसरातील आरोपी सुहास जाधव हा देखील राहतो. तो नेहमी 17 वर्षीय पिडीत मुलीला घरासमोरून येताना जात पाहतो. आरोपी सुहासची पिडीत मुलीवर वाईट नजर होती. दि.16  फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलीची आई व भाऊ यांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी घरात गेले. पहाटे चार वाजता पिडीत मुलीच्या आई ही अचानक उठुन मुलांच्या घरात गेली. तेव्हा अल्पवयीन 17 वर्षीय पिडीत मुलगी ही घरात नव्हती. त्यामुळे, पिडीत मुलीची आई ही शोधाशोध करू लागली. ती आसपास परिसरात पाहू लागली. मात्र, ती मिळुन येत नसल्याने त्यांनी पिडीत मुलीचा शोध घेण्यास सुरू केला.

           दरम्यान, पिडीत मुलीच्या आईने अल्पवयीन मुलीचा भरपूर वेळ वाट पाहुन देखील येत नसल्याने आई घरापासून काही अंतरावर शोध घेण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी सुहास याच्या घरासमोर बाजावर अल्पवयीन 17 वर्षीय मुलीला घेऊन नको ते चाळे करत होता. जेव्हा आईने या दोघांना पहाटे पाच वाजता पाहिले तेव्हा मोठ्याने कज्जा केला. त्यावेळी पिडीत मुलीला विचारले असते आरोपी सुहास हा तेथुन पळून गेला. मात्र, पिडीत मुलीला आईने विचारले की, तु इथे काय करते. तेव्हा तिने सांगितले की, चार महिन्यांपूर्वी आरोपी सुहासने मला दमदाटी केली. माझ्या बरोबर चार महिने शरीर संबंध ठेवले नाही तर तुझ्या आईला, भावाला, पिडीत मुलीला जीवे मारील व पिडीत मुलीची बदनामी करील अशी धमकी दिली.

          दरम्यान, हा सर्व प्रकार पिडीत मुलीकडून ऐकल्यानंतर आई संताप व्यक्त करते. पिडीत मुलीच्या आईला राग अनावर होतो. तिची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. पिडीत मुलीची आई थेट तालुका पोलीस ठाणे गाठवते. जेव्हा घडलेला सर्व प्रकार तालुका पोलीस ठाण्यात कथन करतात. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात  आरोपी सुहास प्रदीप जाधव (रा. नान्नज, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कार आणि पोक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.