जातीयवाद्यांच्या उराडावर आमदार थुईथुई नाचले.! तुम्हाला मी पात्र वाटलो तर मत द्या, अन्यथा नको.! पण मत विकू नका...

सार्वभौम (राजूर) :- 

दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू झालेल्या तिरंगा जनसंवाद यात्रेने अकोले तालुक्याती २७५ गावे घेतली आणि आज ९ सप्टेंबर २०२४ रोजी ही यात्रा राजूर येथे विसावली. ही यात्रा कशासाठी होती? तर महापुरूषांच्या कर्तुत्वाची आठवण करुन देण्यासाठी, मतदारांना जागृत करण्यासाठी, गावागावातील समस्या समजून घेऊन त्या मिटविण्यासाठी, महिला भगिनींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी आणि विशेष म्हणजे जातीयवाद्यांच्या उराडावर थुईथुई नाचण्यासाठी ही जनसंवाद यात्रा होती. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातीचे मावळे जमा करून स्वराज्य निर्माण केले. त्यांनी कधी जातीयवाद केला नाही. महात्मा फुले दाम्पत्याने शिक्षण देताना कधी जातीयवाद केले नाही ना कधी स्वत:चे राजकारण संभाळण्याचा विचार केला, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहीताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला डोळ्यासमोर ठेवून संविधान लिहीले. त्यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार, ते होते म्हणून मी आमदार होऊ शकलो, तुम्हा सर्व मतदारांना महत्व आले याचे सर्व श्रेय्य डॉ. आंबेडकर यांचे आहे. महिलांनी डॉ. आंबेडकर समजून घेतले पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन करीत या तालुक्यात जातीयवाद करणार्‍या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आमदारांनी चांगलीच चपराख दिली. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे ही प्रतिज्ञा म्हणत आपण मोठे झालो आहोत, त्यामुळे आपण सर्व भारतीय आहोत हे कधीच विसरु नका असे म्हणत त्यांनी ऐकोप्याचा तिरंगा जनसंवाद यात्रेतून संदेश दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र आरोटे यांनी केले. 

राज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरा पगड जाती धर्माचे लोक एकत्र गेले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या अनेक महत्वाच्या मोहीमेत मुस्लिम मावळे होते. त्यांनी कधी मशीद पाडली नाही ना कधी महिलांचा अनादर केला नाही. मात्र, आजकाल अनेकांना राजकारणासाठी हिंदु-मुस्लिम दंगे घडवून सत्ता हस्तगत करायची असते. असले घाणेरडे राजकारण मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी करणार नाही. राज्यांची पाऊले या अकोल्याच्या मातीत रुजली आहेत, त्यांच्या पाऊलखुना आज देखील ज्वलंत असून त्या आपल्याला प्रेरणा देतात, येथील सह्याद्रीत त्यांच्या नावाचा आज देखील जयघोष गुंजतो आहे. त्यामुळे, हा तालुका सर्वांना धरून चालणारा आहे. शिव, फुले, शाहु, आंबेडकर यांचा वारसा जपणारा तालुका आहे. आम्ही येथे वैचारिक आणि विकासाचे राजकारण करु. पण, जातीचे राजकारण येथे होऊ देणार नाही हाच तिरंगा रॅलीचा उद्देश असेल. 

आमदार ट्वेंटी ट्वेंटी खेळले...

अकोले तालुक्यातील जनतेने आ. डॉ. लहामटे यांना १ लाख १३ हजार मतांनी निवडून दिले. मात्र, त्यानंतर लागेच कोरानाचा काळ चालु झाला. दोन वर्षे त्यात निघून गेले. त्यानंतर एक वर्षे ते सत्तेबाहेर होते. त्यामुळे, तीन वर्षाच्या काळात त्यांना उल्लेखनिय काम करता आले नाही. मात्र, अजित पवार यांच्या सोबत जाऊन तालुक्याला २३ शे कोटी रुपयांचा निधी आणता आला. केवळ दोन वर्षे मिळून देखील ४० वर्षाचा बॅकलॉक भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. कामे आणायची तर थेट कोटीत, मागेल त्याला निधी किंवा गाव तेथे निधी अशा प्रकारचा विकास अजेंडा त्यांनी अगदी अल्पकाळात राबविला. त्यामुळे, एक कार्यसम्राट आमदार म्हणून लोकांच्या मनात छबी तयार झाली आहे. दोन वर्षात ते अक्षरश: नॉटआऊट राहून आमदार ट्वेंटी ट्वेंटी खेळले. यात त्यांनी शाळा आणि आरोग्य याकडे जास्त लक्ष दिले. पुर्वी लोक सभामंडप मागत होतेे आता शाळाखोल्या मागतात हा सर्वात मोठा आनंद आहे. असे मत सेवादलाचे ज्येष्ठ नेते विनय सावंत यांनी व्यक्त केले.

मी मत मागत नाही...

डॉ. किरण लहामटे यांनी सरासरी महिनाभरात २७५ गावे पायाखाली घातली. यावेळी त्यांनी कोणत्याही गावात मते मागितली नाही. मी मते मागायला नव्हे तर तुमच्या गावात काय कमी आहे आणि काय दिले असून आणखी काय देता येईल, येथील मुलभूत समस्या काय आहेत यावर चर्चा करणे, राष्ट्रीय ऐकोपा जपने असे अनेक अजेंडे घेऊन आल्याचे सांगितले. त्यामुळे, तिरंगा जनसंवाद यात्रा दिसताना राजकीय हेतुची जरी दिसत असली. तर, आमदारांचे मत प्रंजळ असल्याचे दिसते. कटू पण सत्य बोलणे, मतांसाठी उगच कोणाला खुश करणे, अश्‍वासने देणे, लाल्या गोड आणि बाल्या गोड ही भुमिका त्यांच्या अंगवळणी नाही. त्यामुळे, त्यांनी बोलताना परखड जातीयवाद आणि व्यक्तीद्वेष याच्या विरूद्ध आपले मत व्यक्त केले.

मत विकणार्‍यांवर थुं...!!

पुर्वी मतदान करण्याचा अधिकार फक्त उच्चभ्रु लोकांना होता. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तो प्रत्येकाला बहाल केला. मात्र, आजकाल फार वाईट वाटते. की, लोक काही रूपयांसाठी लोक आपले मत विकतात, त्यांना आपल्या मतांची किंमत नाही. एक मत काय करु शकते याचे भान नाही. त्यामुळे, जे लोक पैसा घेऊन स्वत:चे मत विकतात त्यांच्यावर थुं..!! असे म्हणत आमदारांनी निषेध व्यक्त केला. अर्थात अकोले तालुक्यात असे होत नाही. म्हणून तर मी २०१९ मध्ये १ लाख १३ हजार मतांनी निवडून आलो, लोकांनी मला वर्गणी काढून पैसे दिले आणि माझी निवडणुक केली. त्यामुळे, लोकशाही बळकट करायची असेल तर देशात कोठेही मत विकली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

आता नामदार म्हणून उर्वरित कामे...

सर्वात कमी वेळ मिळून देखील आमदार डॉ. किरण लहामटे यांनी २३ शे कोटी रुपयांचा निधी अकोले तालुक्यात आणला. त्यांना जेव्हढे शक्य होते तितके ते पळाले. दिवसरात्र एक करून पायाला भिंगरी बांधून त्यांनी तालुका पिंजून काढला. प्रत्येक गावात निधी दिला. आता मात्र त्यांचे पाच वर्षे संपत आले आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात जेव्हा आमदार तालुक्यात कामे करतील तेव्हा ते नामदार म्हणून कामांचा शुभारंभ करतील. त्यासाठी अकोले तालुक्यातील जनता त्यांच्या कामाची पावती देतील. आज आमदार असताना आणि फक्त दोन वर्षात त्यांनी २३ शे कोटींचा निधी आणला आहे. तर, ते जेव्हा नामदार होतील तेव्हा कामांचा वेग काय असेल आणि किती कामे मार्गी लागतील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असे मत सचिन नरवडे यांनी व्यक्त केले.

अर्थमंत्री दादा, चाव्या लहामटेंकडे...

राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार आहेत. मात्र, तिजोरीच्या चाव्या ह्या आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडे आहेत. दादांनी सांगितले आहे. अकोले तालुक्याला लागेल तेव्हढा निधी तुम्ही न्यायचा आणि विकास कामांसाठी खर्च करायचा अशा प्रकारचे धोरण ठरले आहे की काय? असा प्रश्‍न पडतो असे मत ज्येष्ठ विधीज्ञ वसंत मनकर यांनी व्यक्त केले. कारण, अकोल्यात पिंपारकणे पुल, बस स्थानक, बाजारतळ, उंचखडक बु सारखी शाळा, न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय अनेक रस्ते सभामंडप, पेव्हिंग ब्लॅक, एमआयडीसी मंजुरी आणि अन्य कामे अशी २३ शे कोटींचा निधी आणून तालुक्यात विकासगंगा आणली आहे. एकाच वर्षात इतके काम करणारा आमदार आम्ही पहिल्यांदाच पाहिला आहे. म्हणून आम्हाला प्रश्‍न पडतो. की, अर्थमंत्री अजित दादा असले तरी तिजोरीच्या चाव्या डॉ. लहामटेंकडे आहे असे आम्हाला वाटते असे वसंतराव मनकर म्हणाले...

ही सांगता सभा नव्हे.! विजयी यात्रा...

डॉ. किरण लहामटे यांनी तालुक्यात तिरंगा जनसंवाद यात्रा काढली होती. त्यास जनतेने उदंड प्रतिसाद दिला. आज अंतीम दिवशी राजूर गावात प्रचंड मोठा जनसमुदाय मिरवणुकीत दिसून आला. त्यामुळे, ही सांगता सभा नव्हे.! तर, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाची सभा आहे असे मत अगस्ति कारखान्याचे चेअरमन सिताराम पा. गायकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले. २०१९ मध्ये ते भाग्य आम्हाला लाभले नाही. मात्र, २०२४ मध्ये आम्ही ऐतिहासिक विजय मिळविणार आहोत. अगस्ति कारखान्याला चालु ठेवण्यासाठी अनेकांनी त्रास दिला. मात्र, डॉ. लहामटे यांच्यामुळे एनसीडीसीचे कर्ज मिळण्यास फार मोठा हातभार लागला. म्हणून कारखान्याला नवचैतन्य आले आहे. त्यामुळे, तालुक्याच्या शेतकर्‍यांचे हित चितणार्‍या या व्यक्तीला २०२४ मध्ये आपल्याला मंत्री म्हणून पहायचे आहे असे गायकर पा. म्हणाले.