संगमनेरमध्ये पुन्हा ट्रॅप, लाचखोर तलाठी अटक, घरकुलासाठी वाळु पुरविण्यासाठी 25 हजार घेताना ताब्यात.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

                   संगमनेर तालुक्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर असे वाटत होते. की, अधिकार्यांना धाक निर्माण होईल, अधिकारी आणि कर्मचारी सामान्य माणसांचे शोषण करणार नाही. पण, दुर्दैव असे की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सर्वात जास्त लाचखोरीचे प्रकार संगमनेरमध्ये घडले आहेत. गेल्या आठ दिवसांपुर्वीच येथे छापा पडलेला असताना आज पुन्हा कनोली व शेडगाव येथील तलाठ्याने घरकुलाची वाळु नदीपात्रातुन उचलण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता घेईल तर 25 हजार अन्यथा काम करणार नाही. असे आरोपी संतोष शेलार या तलाठ्याने सांगितले. त्यानंतर आज 7 जुलै 2025 रोजी दुपारी नगरच्या लाचलुचपत विभागाने संगमनेर शहरातील बसस्टँड परिसरात सापळा रचला आणि लाचखोर तलाठी संतोष बाबासाहेब शेलार (रा. जनतानगर, ता. संगमनेर) याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की,  संगमनेर तालुक्यात घरकुलांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे, गावातील नागरिक घरकुलाच्या कागदपत्रांची पूर्तता तयार करून घरकुल मिळवत आहे. शासनाची परवानगी मिळाली की घर बांधण्यासाठी जागा तयार करत आहे. मात्र, घरकुलांच्या कामासाठी वाळू मिळत नसल्याने घरकुल धारकांना महसुल विभागातील तलाठ्याचे उंबरे झिजवावे लागत आहे. कनोली येथील घरकुल धारकांना वाळू मिळवण्यासाठी तलाठी संतोष शेलार यांच्याकडे तक्रारदार परवानगीसाठी जात होता. मात्र, वेगवेगळे कारणे सांगून तलाठी वाळू उचलण्यासाठी परवानगी देत नव्हता. शासनाने घरकुलांना वाळू उचलण्यासाठी कायद्याच्या अटी व शर्ती घालुन परवानगी दिली आहे. मंग, तलाठी संतोष शेलार हा अडवणूक का करतो? असा प्रश्न तक्रादार यांच्या मनाला भेडसावत होता.

          दरम्यान, तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात तसेच ओढ्यातुन, पाझर तलाव या ठिकाणांवरून तहसीलदार यांनी घरकुलाच्या कामासाठी वाळू उचलण्यासाठी परवानगी दिली आहे. गावा-गावातील पॉईंट काढुन घरकुलधारकांना सोईस्कर होईल तेथून वाळू उचलण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, कनोली गावातील तलाठी संतोष शेलार हा पैसे मागण्याच्या उद्देशाने अडवणूक करत होता. तक्रादार यांनी तलाठी संतोष शेलार यांना विचारले असता 25 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने त्यांनी थेट अहिल्यानगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर अहिल्यानगरचे पथक थेट संगमनेरात दाखल झाले. तक्रादार हे त्यांच्या मतावर ठाम होते. लाचखोर तलाठी संतोष शेलार यांनी तक्रारदाराला बसस्टँड परिसरात बोलवले. तेथे लाचलुचपत विभागाचा सापळा रचण्यात आला. त्यावेळी तलाठी संतोष शेलार यांना 25 हजरांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. आज दुपारी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोण आहेत का? यांनी यापूर्वी कोणाकडे अशी मागणी केली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे. आशा प्रकारची पुढील कारवाई सुरू झाली.

         

दरम्यान, संगमनेर मधील 42 ब व 42 ड  बिनशेती करून स्वतंत्र सातबारा केले. यामुळे तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन केले. यात संगमनेर मधील पाच महसुल कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले. एक महिन्यांपूर्वी मांडवे गावातील तलाठी पन्नास हजरांची लाच घेताना निष्पन्न झाला. तो तेथुन पसार झाला होता. महिना उलटून देखील त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे, कारवाई होऊन देखील आरोपी मोकाट सुटतात कसे? त्यांना कोणी पाठीशी घालते का? खडी क्रेशरची गाडी चालावी म्हणुन एक तलाठी पन्नास हजार घेत असेल तर रात्रीचे वाळू, मुरूम चालवण्यासाठी किती रुपये मोजले जात असेल. हे न बोलेले बरे. स्वतः आमदार अमोल खताळ हे वाळूची गाडी पकडतात. मात्र, महसुल विभाग झोपेचे सोंग घेऊन मोठ्या प्रमाणात मलिदा घेते असल्याची चर्चा वारंवार होत आहे. कारण, एका तलाठ्याची शेतकऱ्यासोबत संभाषण करताना पोटहिस्सा साठी पैसे दिल्याची व्हिडीओ व्ह्यायरल झाली. मात्र, कारवाई फक्त गावातील सजा बदलणे. त्यामुळेच, महसुल अधिकारीच कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा वारंवार होत आहे.