कैलास वाकचौरै यांना मोठा धक्का.! सरपंच, उपसरपंच, चेअरमन सगळे वाजविणार तुतारी.! घड्याळ बंद, रिक्षाला हॅण्डब्रेक.!

 

सार्वभौम (अकोले)-

 शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेल्या भाजपाला साथ द्यायची नाही आणि जे भाजपाला साथ देतील त्यांना देखील साथ द्यायची नाही असे म्हणत कळसमध्ये एक वेगळीच क्रांती पहायला मिळाली. वैभव पिचड यांना साथ द्यायची म्हणून कैलास वाकचौरे यांनी रिक्षाचे सारथ्य केले खरे. मात्र त्यांच्या मागे बसलेले प्रवाशीच उतरुन विजयाची तुतारी वाजविण्यासाठी निघुने गेले. त्यामुळे, आता कळसमधून रिकामी रिक्षा धावते की काय.! असे वाटु लागले आहे. कारण, वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली कळसमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडुन आल्या होत्या. आता मात्र, सरपंच, उपसरपंच आणि सोसायटीतील चेअरमन सुद्धा महाविकास आघाडीला जाऊन मिळाले आहे. त्यामुळे, कैलास वाकचौरे ज्या कळसच्या जीवावर उदार होते. ते कळस तुतारीच्या बाजुने गेले असून तेथे सामान्य मनसांच्या मनात देखील सुप्त लाट आहे. त्यामुळे, गावाला गृहीत धरण्याची खोड यंदा वाकचौरे यांना महागात पडणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

अकोल्यातील कळस हे जरी तालुक्याच्या पायथ्याला असले. तरी ते शिक्षण, राजकारण, समाजकारण आणि धार्मिक दृष्ट्या हे गाव तालुक्याच्या पटलावर कायम चर्चेत राहिले आहे. या गावाने कायम कैलास वाकचौरे यांना बळ दिले आहे. त्यामुळे, एकाधिकारशाहीने या गावाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आता मात्र, वाकचौरे यांची गावावर असणारी पकड कमी होत चालली आहे. पहिल्यांदा कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे यांनी त्यांना अनेकदा धक्के दिले. त्यानंतर आता उपसरपंच केतन वाकचौरे यांनी देखील आपल्या उपसरपंच पदाचा आणि ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजिनामा देऊन महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा विषय येथेच थांबला नाही. तर, विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यामान चेअरमन विनय वाकचौरे यांनी देखील कैलास वाकचौरे यांनी साथ सोडून अमित भांगरे यांना साथ देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे, कैलास वाकचौरे यांच्या गडाला खिंडार पडले असून त्यांच्या सतत बदलत्या भुमिकेचे पडसाद आता पहायला मिळू लागले आहे.

दरम्यान, गेली अनेक वर्षे कळसमध्ये एकाधिकार सत्ता असताना देखील तेथे विरोधक म्हणून ईश्‍वर वाकचौरे, आशिष ढगे, प्रभात चौधरी यांच्यासह अनेकांनी कैलास वाकचौरे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाव सदैव वाकचौरे यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर मात्र वाकचौरे यांनी कधी भाजपा तर कधी राष्ट्रवादीत, कधी अपक्ष तर कधी अलिप अशी धोरणे स्विकारली. त्यामुळे, गावकर्‍यांनी त्यांच्या पाठोपाठ किती कोलांटउड्या मारायच्या? असा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यानंतर यंदा मात्र त्यांच्या अगदी जवळचे आणि कट्टर कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बंड पुकारू लागले आहे. पुर्वी राजकारणात असे म्हणायचे की, लोकसभेेला काय करायचे ते करा. पण विधानसभेला साथ द्यावी लागेल. आता विधानसभेला देकील कार्यकर्ते बंडाचे निषाण होती घेऊ लागले आहेत. हीच लाट उद्या गावोगावी ग्रामपंचायतीत देखील दिसून येणार आहे. त्यामुळे, नेत्यांनी देखील निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले पाहिजे अशा प्रकारचे मत अधुनिक कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे.

तीन हजार मतदार असणार्‍या कळसमध्ये जेव्हा आढावा घेतला तेव्हा लक्षात आले. की, कैलास वाकचौरे यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदर आहे. मात्र, कळसमध्ये देखील पुरोगामी विचारधारा आहे. त्यात शेतकरी वर्ग मोठा असून त्यांना भाजपाची धेय्यधोरणे मान्य नाहीत.      शरद पवार यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे, कळसमध्ये सुप्त लाट असून तेथे डॉ. लहामटे, वैभव पिचड आणि मारुती मेंगाळ यांच्यापेक्षा अमित भांगरे यांना जास्त मते मिळतील अशी परिस्थिती आता दिसू लागली आहे. आता कळसमध्ये सरपंच राजेंद्र गवांदे, उपसरपंच केतन वाकचौरे, सोसा. चेअरमन विनय वाकचौरे, संभाजी वाकचौरे तसेच अरुण वाकचौरे असे अनेक चेहरे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे, हा तोटा सर्वात जास्त वैभव पिचड यांना बसणार असून हे बंड कैलास वाकचौरे यांच्यासाठी धक्का देणारे ठरले आहे. 

ही दोस्ती तुटायची नाय.!

अशोकराव भांगरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सर्व मित्र पक्ष बदलुन गेले होते. तरी देखील प्रकाश मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब ताजणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पुन्हा अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यांनी मित्राची मैत्री निभविली आहे. तर, पिचड परिवाराने माझ्यासाठी खुप काही केले आहे. त्यामुळे, की वैभव पिचड यांना साथ देण्यासाठी आलो आहे असे म्हणत कैलास वाकचौरे यांनी रिक्षाचे सारथ्य केले आहे. त्यांच्या पाठोपाठ वाळुंज आणि मालुंजकर यांनी देखील मैत्री जपली आहे. तर, दुसरीकडे कळस येथील गणेश रेवगडे यांचे देखील चांगले नेटवर्क आहे. त्यांनी आजवर कैलासराव यांचा शब्द प्रमाण मानला आहे. मात्र, रेवगडे यांचा परममित्र केतन वाकचौरे यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी अमित भांगरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कैलास भाऊ मित्रासाठी वैभवराव यांना साथ देऊ शकतात तर मी केतनला का साथ देऊ नये असे म्हणत गणेश रेवगडे यांनी तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे, निवडणुकीत देखील ही दोस्ती तुटायची नाय..!! असे दिसते आहे.