भाजपाला मतदान करु नका- विनय सावंत, लहामटे भाजपाचा छापा आणि पिचड काटा.! एकाच नाण्याच्या दोन बाजू.!

 सार्वभौम (अकोले)-

भाजपाने वैभव पिचड यांना उभे राहण्यासाठी रसद पुरविली आहे. ते भाजपाचे उमेदवार असून त्यांना मतदान करु नका असे मत भाजपाच्या व्यासपिठावरील पुरोगामी विचारांचे माजी ज्येष्ठ विचारवंत विनय सावंत यांनी केले. मात्र, वैभव पिचड हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचा भाजपाशी काहीच संबंध नाही असे मुळीच नाही. कारण, भाजपाचे निष्ठावंत सोडले. तर, भाजपाचे तालुकाध्यक्ष, भाजपाचे युवाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी वैभव पिचड यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले आहे. मात्र, विनय सावंत सांगतात ते खोटं आहे. भाजपाचे खरे अधिकृत उमेदवार हे डॉ. किरण लहामटे आहे. त्यांच्या बॅनरवर मोदीजी, शहा, फडणवीस आणि शिंदे यांचे फोटो देखील आहे. त्यामुळे, सावंत साहेबांच्या तोंडून पुरोगामी विचार चांगले वाटत होते. मात्र, खोटं पण रेटून बोलण्याची शैली त्यांना जमत नाही.अर्थात वैभव पिचड यांचा प्रचार करणारे भाजपाचे पदाधिकारी आहेत आणि डॉ. किरण लहामटे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या व्यासपिठावर कट्टर भाजपा तथा पदाधिकारी जलिंदर वाकचौरे आहेत. त्यामुळे, पिचड आणि लहामटे हे भाजपाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. अशा प्रकारची टिका होऊ लागली आहे.

म्हातारपणी बोंबिल खाल्ला हे वाक्य आठवले. की, सावंत साहेबांची आठवण होते. मात्र, कालपर्यंत पुरोगामी विचार सांगणारे, भाजपामुळे संविधान धोक्यात आहे असे सांगणारे, जातीयवादी भाजपा म्हणारे, आर.एस.एसची विचारधारा मान्य नसणारे विनय सावंत जेव्हा पोटतिडकीने भाजपाचे तथा महायुतीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांचा प्रचार करताना दिसतात. तेव्हा तालुक्यातील अनेकांच्या भुवया उंचावताना दिसतात. डॉ. किरण लहामटे हे चांगले आहेत, त्यांनी विकासकामे केली यात तिळमात्र शंका नाही. मात्र, ते ज्या पक्षाला बळ देणार आहे. ती विचारधारा तुम्हाला मान्य झालीच कशी? आज भाजपाला बळ देण्यासाठी तुम्ही खारीचा वाटा उचलत आहात हे तुम्ही पुर्णत: विसरून गेलात.

मुळात, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज लहामटेंना संधी मिळाली त्यांनी चांगली कामे केली. उद्या अमितला संधी मिळाली तर तो त्याहून जास्त कामे करु शकतो. त्यामुळे, विकास केला म्हणून आमदारकीवर मक्तेदारी दाखविणे ही किती संकुचित विचारसारणी आहे. डॉ. लहामटे साहेब यांच्याबाबत कोणी अविचार करीत नाही. पण, त्यांनी अविचारी मार्ग धरायचा, पुरोगामी विचारांना तिलांजली देणार्‍यांना साथ द्यायची आणि आपण त्यांना बळ द्यायचे? हा कसला विचार? का तर म्हणजे विकास होतोय.! मुळात वेश्या व्यवसाय करून मुलांचे शिक्षण करणार्‍या मुलाने देखील आईला मिळणार्‍या अर्थार्जनापासून मिळणारे शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य नाकारले होते. ही बातमी फार लांबची नाही. ती पुण्यातील आहे. तो म्हणाला, आई लोकांच्या घरी भांडी घास, कपडे धू पण स्वाभिमानानं वाग आणि कष्टाने पैसा कमवून मला दे. चुकीच्या मार्गाने मिळालेल्या पैशांवर माझे शिक्षण होत असेल. तर ते शिक्षण मला नको. अर्थात हा लेख एका वृत्तपत्रात छापून आला होता. ही एक वैचारिक ठेवण आहे. तो स्वाभिमान कोठय? ती वैचारिक तळमळ कुठय? तो ताठ मानेचा बाना कुठय? तो आजकाल ज्येष्ठ विचारवंतांमध्ये का दिसून येत नाही. असा प्रश्‍न पडतो आहे. म्हणून सुरुवातीला माजी विचारवंत करावासा वाटला आहे. 

हे भाजपा नाही तर कोण?

 थोडक्यात.! नाही झाला विकास तरी चालेल. पण, गद्दारीतून विकास नको आणि टक्केवारीचा मलिदा नको. या तालुक्याला स्वाभिमानी बाणा असणारा आमदार हवा आहे. निष्ठेने वागणारा आमदार हवा आहे. सर्वांना धरून वागणारा आमदार हवा आहे, आज इकडे तर उद्या तिकडे अशा बेडूक उड्या मारुन ५० खोके, एकदम ओके असा आमदार नको. तर, काल झोळी घेऊन फिरणारा आज उधळपट्टी करणारा आमदार या तालुक्याला नको आहे. तसेच मायबाप जनाता म्हणत त्यांच्या उराडात लाथा घालणारा आमदार नको आहे, वाळे सारखा व्यक्ती हाताशी धरुन ठेकेदारांना वेठीस धरणारा आणि राजा हरिश्‍चंद्रची बदनामी करणारा आमदार या तालुक्याला नको आहे. विकास कामे केली असे म्हणज अवडंब पेटवत अनेक कामांची फक्त नारळ फुटले, प्रत्यक्षात कामांच्या प्रमा देखील निघालेल्या नाहीत. असा नारळ फोड्या आमदार आपल्याला नाको आहे, कुठय काचेचा पुल, कुठय एमआयडीसी, कुठय उपजिल्हा रुग्णालय, फुटली का तोलार खिंड, झाला का शहापूर-मुंबई हायवे? फक्त बाजारतळ आणि बस स्थानकाला गंद पावडर केली म्हणजे विकास का? हे सांगण्याचे सामर्थ्य माजी ज्येष्ठ विचारवांमध्ये का नाही? असा प्रश्‍न खर्‍या विचारवंतांना पडला आहे.

खरंतर भाजपाचे कोणी? वैभव पिचड की लहामटे हे त्यांनी एकमेकांमध्ये ठरवून घेतले पाहिजे. कारण, उमेदवारी लहामटेंकडे आणि भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी वैभव पिचड यांच्याकडे. त्यामुळे, हे एकाच महायुतीच्या दोन चुल्ही आहेत. हे न समजण्याईतकी दुधखुळी जनता अकोले तालुक्यात तरी नाही. विशेष म्हणजे, विनय सावंत यांनी जरा तरी विचार करुन बोलले पाहिजे. की, आपण ज्या व्यासपिठावर बसतोय. त्यावर मोदीजी, शहा, फडणवीस आणि शिंदे यांचे फोटो आहेत. हौसाने केला पती अन त्याला झाली रघतपिती असे डॉ. लहामटे यांना म्हणणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते जालिंदर वाकचौरे त्याच व्यासपिठावर आहेत. त्यांची जोरदार भाषणे देखील होतात. अन्य भाजपाचे पदाधिकारी देखील आपल्या व्यासपिठावर असतात. त्यामुळे, तुम्ही भाषण करताना इतके कसे बेभाण होतात? हेच कळत नाही. त्यामुळे, डॉ. लहामटे हेच भाजपाचे उमेदवार आहेत हे तुमच्यासारख्या स्टार प्रचारकांनी विसरता कामा नये.



आता हा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. की, एकतर तुमच्या मार्गदर्शनानुसार भाजपाच्या नेत्यांचे फोटो प्रचार सभेत लावले जात नव्हते. भाजपाच्या निष्ठावंतांनी त्यावर आवाज उठविला आणि इच्छा नसताना देखील भाजपा नेत्यांचे फोटो लावण्याची नामुष्की ओढवली. मात्र, भाजपाच्या तथा महायुतीच्या उमेदवाराचे तुम्ही स्टार प्रचारक असताना देखील तुम्ही भर व्यासपिठावर म्हणतात. की, आपण विचारी माणसे आहोत. आपले आणि भाजपाचे जन्माचे वैर आहे. त्यामुळे भाजपाला मत द्यायचे नाही. हे किती मोठे बंड आहे. हे जालिंदर वाकचौरे, सिताराम भांगरे अशा लोकांना सहन झाले तरी कसे? महायुतीचा उमेदवार आणि त्यांचा स्टार प्रचारक भाजपाला मत देऊ नका असे म्हणत असताना भाजपाच्या निष्ठावंतांची हाताची घडी आणि तोंडावर बोट का? एरव्ही भाजपावर कोणी बोलले तर दोन पायावर उठणारे आज गप्प का? की फक्त सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठीच पक्ष, निष्ठा आणि प्रेम असते? हा प्रश्‍न बाकी अनुत्तरीत आहे.

खरंतर  विनय सावंत हे पुरोगामी चळवळीतून आले आहे. तर, डॉ. किरण लहामटे हे आर.एस.एस च्या विचारधारेतून आले आहेत. आजकाल लोक खात्रीने म्हणतात की, येणार्‍या काळात ते दिर्घकाळ भाजपाचे उमेदवार राहणार आहे. त्यामुळे, किमान त्यांनी तरी भाजपाचा आदर राखणे गरजेचे आहे. खरंतर सावंत हे पुरोगामी विचारांचे आहे. त्यांनी कायम भाजपा आणि आर.एस.एसच्या धोरणांचा विरोध केला आहे. त्यांनी भाजपाला मतदान करु नये असे म्हटले. तर, वावघे काही नाही. पण, लहामटे साहेब काही झाले तरी आपला मुळ बेस हा आर.एस.एसचा आहे. गेली काही वर्षे आपण संचलन केले आहे. त्यांचे केडर केले आहे, गणवेश परिधान केला आहे. त्यामुळे, आपल्या व्यासपिठाहून भाजपाची अवहेलना व्हावी ही दुर्दैवी गोष्ठ आहे. आता यावर भाजपाचे नेते काय म्हणतात आणि काय भुमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

काल बोलता बोलता सावंत साहेब म्हणाले. की, आपली लढाई ही विचारांची आहे. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची आहे. डॉ. लहामटे देखील त्याच विचारांचे आहे. त्यांना आपण बळ दिले पाहिजे. आता या तालुक्याला प्रश्‍न पडला आहे. की, ते भाजपाच्या सोबत गेले म्हणून बळ द्यायचे का? त्यांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी केली म्हणजे जनतेच्या भावनांशी गद्दारी केली म्हणून त्यांना बळ द्यायचे का? ज्यांनी बहुजन समाज्याच्या नेत्यांची ४ वर्षे अवहेलना केली. त्यांना बळ द्यायचे का? आमचा नाद करायचा नाही असे म्हणणार्‍यांना बळ द्यायचे का? जो व्यक्ती मृत्युशी झुंज देणार्‍या व्यक्तीला म्हणतो, तुम्ही मरु नका, माझा विकास पहायला थांबा अशा व्यक्तीला बळ द्यायचे का? जो व्यक्ती हयात नाही अशा व्यक्तीविषयी नको ते बोलतो, आरोप करतो अशा व्यक्तीला बळ द्यायचे का? जो व्यक्ती येथील जनतेच्या छाताडावर लाथा मारतो अशा व्यक्तीला बळ द्यायचे का? जो व्यक्ती आमदार होण्यासाठी हजारो लोकांनी दिवसरात्र मेहनत केली त्यांना सहज कोलुन देतो अशा व्यक्तीला बळ द्यायचे का? एक कार्यकर्ता फिरुन बोलला म्हणून रात्री ३ वाजता पोलीस गाडी पाठवून जेलमध्ये ठेवणार्‍या व्यक्तीला बळ द्यायचे का? तालुक्यातील व्यक्तींवर ऍट्रॉसिटी आणि खंडणीचे गुन्हे दाखल करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणार्‍या व्यक्तीला बळ द्यायचे का? संविधानावर घाला घालणार्‍या पक्षांसोबत बस्तान बांधणार्‍या व्यक्तीला बळ द्यायचे का? मुळ मालकांचे पक्ष फोडून स्वत:च्या नावे पक्ष करणे आणि चिन्ह सुद्ध पळविणार्‍यांना बळ द्यायचे का? भ्रष्टाचार लपविण्यासाठी पक्षांतर करणार्‍या व्यक्तींना बळ द्यायचे का? इडी, सीबीआय, सीआयडी अशा संस्थांचा गैरवापर करणार्‍या पक्षांना बळ देण्यासाठी यांना निवडून द्यायचे का?

 शेतकर्‍यांच्या शेताचा माल रस्त्यावर फोकण्यासाठी यांना बळ द्यायचे का? महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला पाठविण्यासाठी यांना बळ द्यायचे का? महाराष्ट्रावर कर्ज काढून लाडक्या खुर्चीसाठी नको त्या योजना काढणार्‍यांना बळ द्यायचे का? दुधाला दर नाही म्हणून दुध रस्त्यावर फोकण्यासाठी यांना बळ द्यायचे का? पंधराशे देऊन महागाईन माय माऊल्यांना लुटण्यासाठी यांना बळ द्यायचे का? उच्च शिक्षण होऊन सुद्धा मुलगा घरी संड्या सारखा फिरतोय, त्यासाठी यांना बळ द्यायचे का? सांगा विनय सावंत साहेब.! कशासाठी बळ द्यायचे आहे. तुम्ही अकोले तालुक्यात एक आमदार देण्यासाठी जीव काढताय पण एक लाख प्रश्‍न देशासमोर आ वासून उभे आहेत. त्याचे काय? जेव्हा आम्ही तुमच्याकडे पाहतो. तेव्हा काल आदर्श वाटत होता. आज काय वाटते हे शब्दात देखील सांगू शकत नाही. अंतीमत: एकच डॉ. लहामटेंना मत म्हणजे भाजपाला मत. अजूनही वेळ गेली नाही. एक डॉक्टर सोडून दुसरे डॉक्टर अजित नवेल परिवर्तनासाठी तुमची वाट पाहत आहेत...! तुमच्या तोंडून भाजपाचे कौतुक या तालुक्याला पाहवत नाही आणि तुम्ही त्या व्यासपिठावर शोभत देखील नाही. वैचारिक मानसांनी म्हातारपणी बोंबिल खाऊ नये हिच जनतेची इच्छा.!!