अखेर मा.गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ निलंबित.! रोखठोक सार्वभौमच्या मालिकेनंतर कारवाई, ते तोतया सजग नागरिक अमरण उपोषण करणार की पोटभर जेवणार- तालुक्याचे लक्ष..

 
- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

अकोले तालुक्यातील प्रभारी गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ साहेब यांचे निलंबन करण्यात आले आहे. रोखठोक सार्वभौमच्या माध्यमातून त्यांनी केलेला गैर कारभार, पत्रकार परिषदांच्या माध्यामातून तालुक्यात माजाविलेली जातीय अराजकता आणि शिक्षकांच्या बदल्या अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांना दोषी धरण्यात आले आहे. त्यांनी चार-पाच आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांची जवळीकता असणारे, शिक्षण मंत्री खात्यातील अधिकारी, तीन-चार माजी आमदार यांच्यासह अनेकांच्या दरबारी जाऊन आपली कैफीयत मांडली होती. मात्र, त्याला यश आले नाही. शेवटी त्यांनी काही चापलुसी करणारे शिक्षक आणि मराठा जात म्हणून काही पुढार्‍यांना हाताशी धरुन पत्रकार परिषदेत आम्ही पीडित असल्याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलट तेथे काही शिक्षक अडचणीत आले. त्यांनी सेवा शर्तीते उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर देखील कडक कारवाई होण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, स्वत:ला निर्दोश सिद्ध करताना खताळ यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. चुकीच्या लोकांचे मार्गदर्शन आणि संगत ही त्यांना कारवाईपासून वाचवू शकली नाही. अखेर काल भास्कर पाटील यांनी त्यांना निलंबित केल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

काय आहे प्रकरण.!

निलंबित मा.शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी ३६ शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात काही बदल्या पात्र होत्या तर काही अपात्र होत्या. मुळात तसा अधिकार नसताना बदल्या करणे हाच गुन्हा आहे. जरी त्या केल्या होत्या तरी त्यात गटविकास अधिकारी यांना विश्‍वासात घेतल्याचे दिसत नाही, कागदोपत्री नोंदी केल्याचे दिसत नाही. त्यामुळे, या बदल्या कोणत्या बेसवर केल्या? हा प्रश्‍न निर्माण होतो. दुसरी गोष्ट म्हणजे समायोजन प्रक्रियेत स्वत:च्या मनाला वाटेल असे बदल केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, खताळ यांच्याकडून चार्ज काढून घेतल्यानंतर तत्काळ पुर्वीची समायोजन प्रक्रिया रद्द करुन ती नव्याने घेण्यात आली. त्यामुळे, यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल होते हे निच्छित होते. यांसह खताळ यांच्यावर यापुर्वी अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. त्यांचा ४३ पानांचा अहवाल प्रशासनाने तयार केला होता. मात्र, आत्तापर्यंत मर्जीतील माणूस म्हणून त्यांना सवलत मिळत गेली. मात्र, त्यांनी कारभाराची सिमा ओलांडल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई करणे अनिवार्य झाले. चौकशी झाल्यानंतर पुर्णत: अहवाल भास्कर पाटील यांना वरिष्ठांकडे पाठविल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली आहे. 

आता सजग नागरिक काय करणार?

अकोले तालुका हा पुरोगामी विचारांना म्हटला जातो. मात्र, तो खरोखर आहे का? असा प्रश्‍न पडतो. म्हणजे, एखाद्यावर अन्याय झाला तरी त्याने तो सहन करायचा आणि त्याने ब्र शब्द सुद्धा काढायचा नाही. दुसरीकडे ज्याने चुका केल्या त्या माहित असताना तो जातीचा आहे म्हणून त्याच्यावर कारवाई केल्यास आम्ही येव करुन तेव करु अशी वल्गना करायची.! बदल्या केल्या त्या चुक आहेत. मात्र, त्यात गैर काहीच नाही. ही कोणती निती म्हणावी? बदल्यांमध्ये कोणतीही अर्थपुर्ण तडजोड झाली नाही हे नेते छातीठोकपणे सांगतात. मग ज्यांनी तोडजोडी केल्या ते काय गावात बॅनर लावून आपली तोडजोड सांगणार आहेत काय? फक्त एखाद्याची सुपारी घेतल्याप्रमाणे वक्तव्य करणारे आता उघडे पडले आहेत. त्यामुळे, कारवाई झाली तर आम्ही तहसिलसमोर अमरण उपोषणाला बसू असे म्हणणारे नेते आता उपोषणाला बसतील का? की, पोटभर जेवण करुन झोपा काढणार? असा प्रश्‍न तालुक्यातील सजग नागरिकांनी उपस्थित केला आहेत. खरंतर बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे या सजग नागरिकांनी अमरण उपोषणाला बसावे आणि खताळ साहेबांना न्याय द्यावा अशी देखील मागणी होत आहे. अन्यथा तेव्हाच्या पत्रकार परिषदा मॅनेज होत्या असे म्हणावे लागेल. अशी चर्चा तालुक्यात रंगाली होती.

शिक्षकांवर कारवाईची टांगती तालवार.!

निलंबित मा.शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांच्या समर्थनार्थ १५ शिक्षकांनी राजकीय व्यासपिठावर जाऊन पत्रकार परिषदा टोलेजंग भाषणे करुन गाजविल्या होत्या. मात्र, खताळ यांना पत्रकारांनी बोलण्यास विनंती केली. तेव्हा ते म्हणाले. की, सेवाशर्तीचे उल्लंघन होते. त्यामुळे मी बोलु शकत नाही. मात्र, शिक्षकांना हा नियम कदाचित माहित नसावा की काय? की साहेबांसाठी त्यांनी स्वत:ची नोकरी दावणीला बांधली देव जाणे.! पण, आता १५ जणांवर कारवाईची टांगतील तलवार आहे. त्यात भरत सदगिर (नवलेवाडी), राजू सुखदेव थोरात (खंडोबाची वाडी, लिंगदेव), अशोक नाना पथवे (आंबिकानगर), गणपत भाऊराव सहाणे (मदगेवाडी), किरण जिजाभाऊ फापाळे (धुमाळवाडी), राजेंद्र गोविंदराव सदगिर (कुंभेफळ), आण्णासाहेबे रामभाऊ आभाळे (कुंभेफळ), जयवंत राजाराम लांडे (खंडोबाची वाडी, लिंगदेव), बबन रामा बांबेरे (निळवंडे वसाहत), भाऊसाहेब गोपीनाथ वाकचौरे (पिंपळगाव निपाणी), जयश्री गणपत वायाळ (आंबड), शिंदे बाळु बन्सी (पैठण), खतोडे सुमन गणपत (नवलेवाडी), लांडगे शोभा शिवाजी (उंचखडक खु), शेळके अनिता रामदास (धुमाळवाडी) अशा १५ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तर त्यांनी उत्तरे देखील सादर केली आहेत. मात्र, यातून चार जणांना का वगळले? असा प्रश्‍न अनेक शिक्षक संघटनांनी केला आहे.

शिक्षणाची झाली बोंबाबोंब.!

पुर्वी शिक्षण विभागात पुर्णत: भोंगळ कारभार चालत होता. नातेगोते संभाळणे, मित्र परिवार संभाळणे, शिक्षक नेत्यांना हवे तसे ठिकाण देऊन त्यांची मर्जी राखणे, कमी पट असेल तेथे देखील अधिकचा शिक्षक देणे अशा अनेक कारणांनी शिक्षण विभागाला किड लागली होती. मात्र, रोखठोक सार्वभौम नंतर अनेक ठिकाणी न्याय मिळाला असून अनेकांची तारांबळ उडाली आहे. आता लोकांना आगाऊ शिक्षकांची सवय झाली असून ते तशी मागणी करत आहेत. मात्र, हे सर्व संभाळताना गटशिक्षण अधिकार्‍यांच्या नाकीनव येत आहे. पुर्वींची बरबटलेली व्यवस्था निट करण्यासाठी थोडा कालावधी जाईल. मात्र, शिक्षणाची गाडी पुन्हा पटरीवर येईल. त्यासाठी प्रभारी चार्ज असणारा अधिकारी नको. तर खुद्द शिक्षण अधिकार्‍यांकडेच चार्ज असणे गरजेचे आहे. वास्तवत: पाट्या टाकणारे अधिकारी जोवर खात्यात असतील तोवर शिक्षणाचे काहीच खरे नाही. एकंदर प्रशासन शिक्षणासाठी तत्पर नसून प्रचंड उदासिन असल्याचे लक्षात येते. त्यामुळे, येणार्‍या काळात जिल्हा परिषद शाळा टिकतील आणि पट वाढेल असे चित्र दिसत नाही. नशिब.! कोरोनामुळे पट वाढला होता. मात्र, तो येणार्‍या तीन महिन्यात कमी झालेला दिसेल. याचे उत्तम उदा. म्हणजे अकोले शहरातील झेडपीची शाळा ही त्याची पहिली शिकार असेल. कारण, ही देखील बंद पडण्याच्या मार्गावर असणारी शाळा सुरु झाली खरी. पण, अकार्यक्षम शिक्षकांचे ग्रहण काही तिचे थांबले नाही असे पालकांचे मत आहे. त्यामुळे, त्यांनी शिक्षकाची मागणी देखील केली. परंतु, प्रशासनाची मानसिकता काही बदलली नाही. त्यामुळे, शाळा चालाव्याव अशी झेडपीची मानसिकता आहे की नाही? असा प्रश्‍न अनेक पालकांना पडला आहे.