नालायक पणाचा कळस.! दारुची बाटली घ्यायला पैसे नाही म्हणून दोघांनी एकाला दगडाने ठेचून मारले. गावात आब्रु जाण्यापेक्षा याला संपून टाका. दोघे तरुण आरोपी अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील साकुर जवळील चिंचेवाडी परिसरात मलीबाबा मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये देवराम मुक्ता खेमनर (वय 65) यांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याची उकल करण्यात घारगाव पोलिसांना यश आले आहे. बुधवार दि.17 जानेवारी 2024 रोजी देवराम खेमनर हे नशेत असताना दोन व्यक्तींनी दारू पिण्यासाठी कोपरीच्या खिशातून पैसे काढुन घेतले. हे पैसे काढत असताना याना ओळखले. त्यामुळे, देवराम खेमनर हे दोघांच्या नावाने शिवीगाळ करू लागले. ते दोघे चोरलेल्या पैश्यांची दारू पिऊन आले. ते जेव्हा समोर आले तेव्हा देवराम खेमनर यांनी पाहुन पुन्हा शिवीगाळ सुरू केली. पिडीत देवराम खेमनर हे उद्या गावामध्ये पैसे चोरून दारू पितात असे सर्वांना सांगतील आपले सर्व पितळ उघडे पडेल.त्यामुळे, या दोघांनी मोठा दगड घेतला आणि देवराम खेमनर यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर टाकुन ठार केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी हा प्रकार समोर आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अतिशय सुक्ष्म तपास करून आरोपी सुरेश बाबुराव कोकरे (रा. केंगारवस्ती, चिंचेवाडी ता. संगमनेर), नामदेव रंगनाथ सोन्नर (रा,चिंचेवाडी, ता. संगमनेर) यांना ताब्यात घेतले. या दोघांना पोलीस खाकी दाखवली असता यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत देवराम खेमनर याना दारूपिण्याचे वेसण होते. बुधवार दि.17 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता देवराम खेमनर व त्यांच्या पत्नीचे स्वयंपाकावरून वाद झाले. पिडीत देवराम खेमनर याना राग आला. त्यांनी दररोजच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तु एका गाठोड्यात बांधल्या आणि ते घेऊन ते घराबाहेर पडले. त्यांनी त्या वस्तु विकुन पैसे घेतले आणि थेट दारूचे दुकान गाठले. मात्र, तेथे आरोपी सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर या दारूच्या दुकानावर होते. त्यांच्याकडे पैसे नसल्याने दारुवल्याने त्यांना दारू दिली नाही. तेथे पिडीत देवराम खेमनर यांनी आपल्या कोपरीतून पैसे काढले व दारू घेतली. मात्र, कोपरितील पैश्यांवर आरोपी सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर यांची नजर पडली. त्यांनी देवराम खेमनर यांचा पाठलाग केला. देवराम खेमनर हे चिंचेवाडी रोडलगत असणाऱ्या मलीबाबा मंदिरा जवळ जाऊन दारू पिण्यासाठी बसले. आरोपी सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर यांनी याच गोष्टीचा फायदा उचलुन वयोवृद्ध देवराम खेमनर यांना मारहाण करून त्यांच्या कोपरीतील पैसे काढून घेतले.
दरम्यान, हे पैसे काढत असताना आरोपी सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर याना ओळखले. याना ओळखल्यानंतर देवराम खेमनर यांनी नाव घेऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेथुन पैसे घेऊन सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर हे दारुच्या दुकानावर गेले. तेथुन दारूची बॉटल घेऊन ते पुन्हा मलीबाबा मंदिराकडे आले. पिडीत देवराम खेमनर हे शिवी देत असल्याने मंदिराच्या आडोशाला जाऊन सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर हे दारू पिले. देवराम खेमनर हे आज शिव्यादेतात तर ते उद्या गावात देखील सांगतील की, हे चोरीच्या पैशाचे दारू पितात तेव्हा आपले पितळ उघडे पडेल.
आपला गावात अपमान होईल. त्यामुळे, आरोपी सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर या दोघांनी हातात मोठा दगड घेतला आणि देवराम खेमनर यांच्या डोक्यात व तोंडावर टाकुन जागीच ठार केले. देवराम खेमनर यांना मारून टाकुन त्यांना मंदिराच्या शेडमध्ये ठेवले. आणि तेथुन आरोपी सुरेश कोकरे व नामदेव सोन्नर यांनी तेथुन धुम ठोकली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी हा प्रकार समोर आला. घारगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ओळख पटवली आणि खोलवर जाऊन तपास केला. यामध्ये सुरेश बाबुराव कोकरे (रा. केंगारवस्ती, चिंचेवाडी, ता. संगमनेर), नामदेव रंगनाथ सोन्नर (रा. चिंचेवाडी, ता. संगमनेर) यांच्या घारगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर,त्याने हा गुन्हा कसा केला हे देखील सांगितले असुन गुन्ह्याची कबुली दिली आहे.