😔 *वाईट.! इयत्ता १० वीच्या मुलीने ८ व्या महिन्या दिला गोंडस मुलीस जन्म, भावाच्या मित्राने घात केला, आरोपी अटक.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  दहावीत शिकणाऱ्या शालेय मुलीवर अत्याचार झाला. त्यातुन ती गर्भवती राहिली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे 2023 ते 2024 या दरम्यान घडली. काल अचानक मुलीचे पोट दुखू लागले. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे सोनोग्राफी केल्यानंतर 32 ते 34 आठवड्यांची प्रेग्नेंट असल्याचे समजले. तेव्हा हा घडलेला सर्व प्रकार अनेकांच्या लक्षात आला. त्यानंतर पिडीत मुलीची प्रसुती करण्यात आली.  तेव्हा तीने  एका गोंडस मुलीस जन्म दिला आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर जेव्हा पिडीत मुलीची मानसिकता ठिक झाली तेव्हा तीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून आरोपी सुभाष दिलीप मेंगाळ (रा. सावरगावतळ,ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ढुमणे करत आहेत.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील वर्षी 2023 मध्ये पिडीत मुलीच्या भावाला आरोपी सुभाष मेंगाळ हा भेटायला येत होता. त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मेंगाळचे घरी येणे जाणे अधिक वाढले. त्याची आपल्या मित्राच्या बहिनीवर वक्रदृष्टी पडली आणि त्याच दरम्यान. पिडीत मुलीची आणि आरोपी सुभाष मेंगाळची ओळख झाली होती. घरी येणे जाणे वाढल्याने वारंवार एकमेकांच्या नजरा होऊ लागल्या होत्या. मात्र, त्यांच्यात भिती होती ती फक्त कुटुंबाची. मात्र, प्रेम झाले म्हणजे वय आणि भिती या सर्वांच्या पलिकडे व्यक्तीची मजल जाते. त्यामुळे, एके दिवशी सुभाष मेंगाळने तिला प्रपोज करून आपण लग्न करू असे म्हणाला. मात्र, मुलीने पहिल्यांदा नकार देत आपण धाकात असल्याचे दाखविले. मात्र, प्रेमाची चटक लागलेल्या मेंगाळला काही रहावले नाही. तो स्वत:च्या कमी आणि मित्राच्या घरी जास्त राहु लागला. त्यामुळे, पीडित मुलगी देखील त्याच्या नजरेखाली अधिक येत होती. त्याने तिला पुन्हा प्रपोज केला मात्र, तेव्हा देखील मुलगी म्हणाली. की, आई वडीलांना विचारल्याशिवाय मी लग्न करणार नाही असे ठामपणे सांगितले.

              या दरम्यान सुभाष मेंगाळ म्हणाला की, माझे तुझ्यावर प्रेमवजडले आहे. तुझे घरचे काहीही म्हणाले तरी काही फरक पडत नाही. तुझे आई वडील नाही म्हणाले तर आपण पळुन जाऊ. मात्र, या गोष्टीला देखील तिने नकार दिला. तेव्हा तिने आरोपीशी बोलणे कमी केले. मात्र, आरोपी सुभाष मेंगाळची पिडीत मुलीवर नेहमी नजर असायची. प्रेमाच्या नावाखाली वाईट भावना असायची. मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याच्या प्रेमाचा अतिरेक वाढत चालला होता. पीडित मुलीला प्रेमात घेऊन त्याने तिला भेटण्यासाठी तिचे घर गाठले. एकांताचा व पीडितेच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला मकेच्या शेतात भेटायला ये असे म्हणाला. पिडीत मुलगी म्हणाली की, घरच्यांना कळले तर ते मारतील. तेव्हा सुभाष म्हणाला की, काही होत नाही तु भेटायला ये. पिडीत मुलगी घरच्यांना कारण सांगुन मकेमध्ये भेटायला गेली. तेथे सुभाष याने पिडीत मुलीच्या नासमजपणाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला.

           दरम्यान, हा प्रकार एकदाच नाही. तर पुन्हा एकदा आरोपी सुभाष मेंगाळ याने घराजवळील मकेच्या शेतात बोलावून बळजबरीने अत्याचार केला. या बाबत पिडीत मुलीने मौन बाळगले. पिडीत मुलीला त्रास जाणवत होता. मात्र, कोणाला सांगायची हिंम्मत झाली नाही. त्या दरम्यान पिडीत मुलीची तब्येत बिघडली. त्यामुळे ती अनेक दिवस शाळेत गेली नाही. काल अचानक 1 फेब्रुवारी 2024 रोजी पिडीत मुलीचे पोट दुखू लागले. त्यामुळे, घरच्यांनी पिडीत मुलीला दवाखान्यात नेले. तेथे पिडीत मुलीची सोनोग्राफी केली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, पिडीत मुलगी साडेआठ महिन्यांची गर्भवती आहे. वेळ कमी असल्यामुळे डॉक्टरांनी दाखल करून घेतले. त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान डिलीवरी झाली. तिने गोंडस मुलीस जन्म दिला आहे. हा सर्व प्रकार भयानक असला तरी पिडीतेस घडल्या प्रकाराची माहिती विचारली असता तिने सुभाष मेंगाळ याचे नाव सांगितले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.