डॉ. लहामटेंना सोडून अशोकराव भांगरेंचे जुने सहकारी अमित भांगरेंच्या दिमतीला.! मित्राचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.!

 

सार्वभौम (अकोले)-

 स्व. अशोकराव भांगरे यांनी १९९० ते २०१४ पर्यंत विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. त्यापुर्वी १९५२ मध्ये अजोबा गोपाळराव भांगरे आमदार झाले. तर भांगरे परिवारात १९६२, १९७२ आणि १९७७ अशा तीन वेळा स्व. यशवंतराव भांगरे आमदार राहिले. १९८० साली मधुकर पिचड साहेब, सक्रु बुध मेंगाळ आणि यशवंतराव भांगरे अशा तिघांमध्ये लढत झाली आणि पिचड साहेबांनी अकोले विधानसभेवर आपले नाव कोरले ते २०१४ पर्यंत. या दरम्यानच्या काळात राजाराम भांगरे यांनी १९८५ आणि त्यानंतर अशोकराव भांगरे यांनी १९८० पासून पिचड साहेबांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. आता ती वेळ आली आहे. स्व. अशोकराव भांगरे यांना आमदार करण्यासाठी आहोरात्र झटून देखील त्यांना कायम निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी अखेरचा श्‍वास घेईपर्यंत त्यांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. त्यांच्या पश्‍चात त्यांचे कार्यकर्ते कोणी पिचडांकडे तर कोणी लहामटे आणि गायकर साहेब यांच्या पंगतीला जाऊन बसले. मात्र, २०२४ ची निवडणुक आली आणि विस्तारीत व विस्कळीत झालेल्या भांगरे समर्थकांनी पुन्हा मोट बांधली. आपल्या मित्राला आमदार करण्याचे स्वप्न आम्ही पुर्ण करु शकलो नाही. पण, मित्राच्या मुलाला आमदार करुन ते स्वप्न साकार करूया असे म्हणत शेकडो कार्यकर्ते एकत्र आले आहे. त्यामुळेे, मैत्रीचे प्रतिक जपल्याचे अनोखे चित्र अकोल्यात पहायला मिळाले आहे.

कवी अनंत राऊत यांच्या कवितेने कोट्यावधी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले आणि काळजात घर केले. ती कविता म्हणजे, दु:ख अडवायला उंबर्‍यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा..! खरोखर  अशोकराव भांगरे यांनी हजारो मित्र तयार केले. त्यांच्या पाठीशी उभे राहून कोणला राजकीय स्थैर्य तर कोणला व्यवसायीक स्थैर्य दिले. हजारो कार्यकर्त्यांना काहीच न मिळता देखील ते भांगरे साहेबांसोबत राहिले. ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत..! त्यात प्रकाश मालुंजकर, स्व. डॉ. बाजीराव बोंबले, गुलावराव शेवाळे, बाळासाहेब ताजणे, सोन्याबापू वाकचौरे, दादापाटील वाकचौरे, दिलिप मंडलिक, कैलास शेळके, तुकाराम गोर्डे, भरत मुर्तडक, विनोद हांडे, विकास बंगाळ, मधुकर माने, सोमनाथ भरितकर, रामनाथ सहाणे, लक्ष्मण नेहे, एकनाथ हासे, पाटील बुवा सावंत, अनिल सावंत, विलास हासे, सुभाष हासे, प्रदिप हासे, एकनाथ हासे, वसंत कोल्हाळ, मधुकर भोर, बाळासाहेब वाकचौरे, कारभारी अवारी मारुती वाकचौरे, अनिल वाकचौरे, अण्णा आभाळे, प्रकाश आनंदा मालुंजकर, हिरामन भोत, सुरेश देशमुख, संभाजी वाकचौरे, सिताराम वाकचौरे, बाळासाहेब कोटकर, सखाराम पांडे, माधव वैद्य, मधुकर माने, मोरे काका गणोरे, अरुण नाईकवाडी, मदन आंबरे, रमेश उगले, विठ्ठल उगले, चंद्रभान उगले, दत्तु वाकचौरे, रमेश बोडके, त्र्यंबक आवारी, मारुती काळे, भास्कर आरोटे, सुभाष घुले, बाळासाहेब भोर असे हजारो कार्यकर्ते आता अमित भांगरे यांना आमदार करण्यासाठी एक झाले आहेत.

सन १९९० मध्ये अशोकराव भांगरे यांचा राजकारणात प्रवेश झाला. पहिलाच पराभव झाल्यानंतर १९९३ मध्ये दुधसंघाचे इलेक्शन लागले आणि त्यात प्रकाश मालुंजकर चेअरमन झाले. वर्ष उलटले आणि पुन्हा १९९४ मध्ये निवडसमिती बसली. त्यात प्रकाश मालुंजकर यांना अशोकराव भांगरे यांनी सपोर्ट केला आणि पुन्हा ते चेअरमन झाले. तेव्हापासून त्यांची मैत्री अधिक दृढ होत गेली. त्यानंतर अगदी काही महिन्यात म्हणजे १९९५ साली विधानसभा लागली माजी मंत्री मधुकर पिचड साहेबांच्या विरोधात सगळ्यांनी बंड पुकारले. सिताराम पा.गायकर साहेब यांच्यासह अनेकांनी अशोकराव भांगरे यांना सपोर्ट केला. मात्र, झाले काय? भावनिक लाट निर्माण होताच ३४ हजारांच्या फरकाने पिचड साहेब निवडून आले. हाच विरोधाचा सिलसिला अगदी अगस्ति कारखान्याच्या २०२२ मधील निवडणुकीपर्यंत चालु होता. यावेळी अनेक नेते इकडून तिकडे गेले. मात्र, अशोकराव भांगरे यांचे कट्टर समर्थक कधीच दोलायमान झाले नाही.

अशोकराव भांगरे हेच आमचे पक्ष असे म्हणणारे हजारो कार्यकर्ते २०२३ मध्ये पोरके झाले. साहेब गेल्यानंतर काय करायचे? तर कोणी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासोबत तर कोणी वैभव पिचड आणि कोणी सिताराम पा. गायकर साहेब यांच्यासोबत गेले. पण, त्यांना हवा तसा मान सन्मान मिळला नाही. कार्यकर्ते म्हणतात, लहामटे साहेब आमच्या जवळुन गेले असतील. पण, कधी रामराम घातला नाही. इतका शिक्का आमच्यावर बसला होता. पण, ते म्हणतात. की, दु:ख याच गोष्टीचे होते. की, आम्ही अशोकराव भांगरे यांना आमदार करण्यासाठी प्रचंड मेहनत केली होती. पण, त्यांच्या नशिबी तो योग नव्हता. जेव्हा साहेब अनंतात विलीन झाले तेव्हा त्यांनी केलेला संघर्ष आणि आम्ही केलेली धडपड डोळ्यासमोर चलचित्रासारखी फिरत होती. ते आमदार होऊ शकले नाही याचे दु:ख आणि त्यांना आमदार करण्यात आम्ही कमी पडतो याची खंत साहेबांच्या पश्‍चात कायम मनाला कुरूप करीत होती.

आज आनंद या गोष्टीचा आहे. की, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात साहेब यांच्यासह अन्य नेत्यांच्या आशीर्वादाने अमित भांगरे यांनी चांगली भुमिका घेतली आहे. त्यामुळे, आम्ही कोठेही विस्तारीत झालेलो असलो. तरी, आमचे मित्र स्व. अशोकराव भांगरे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येत आहोत. पक्ष, पार्टी, मतभेद सोडून शक्यते आर्थिक पाठबळ देऊन सहकुटुंब सहपरिवार अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे स्व. अशोकराव भांगरे यांच्या मित्रांनी सांगितले आहे. त्यामुळे, कठीण काळात देखील कार्यकर्ते कसे साथ देतात, मित्र गेला म्हणून काय झाले? एकजुटीने पुन्हा मित्राच्या मुलाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धारया मित्रांनी केला आहे. त्यामुळे, एकीकडे राष्ट्रवादीची ताकद, शिवसेनेची ताकद, कॉंग्रेस आणि आंबेडकरी विचारांची ताकद, पठारावर बाळासाहेब थोरात यांची ताकद तर आता वडिलांच्या मित्रांची ताकद असा संगम झाल्याने अशोकराव भांगरे यांच्या घराण्यातील तिसरा आमदार करण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.