निंदकाचे घर असावे शेजारी, तसे विखे पा. पण, मविआचे सरकार येईल अन सर्वव्यापी बाळासाहेब थोरातच मुख्यमंत्री होतील.!
- बाबा ओहळ
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांना कोंडीत पकडण्यासाठी अनेक व्यूहरचना आखल्या जात आहे. कारण, बाळासाहेब थोरात यांचे नाव आता मुख्यमंत्री पदासाठी प्रामुख्याने घेतले जात आहे. तसे शरद पवार साहेबांनी सूचक वक्तव्य देखील केले आहे. बाळासाहेब थोरातांना आता निर्णय घेण्याचे अधिकार द्यायला हवेत. त्यांच्या हातात राज्य दिले तर अनेक प्रश्न सुटण्यात मदत होईल. त्यामुळे, महाविकास आघाडी सत्तेत आली तर आ. थोरात हे मुख्यमंत्री असु शकतात. असे असले तरी निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे, तालुक्यात येऊन हे मुख्यमंत्रीच काय साधे आमदार होणार नाही असे वक्तव्य करू लागले. मात्र, आ. थोरातांना पराभूत करणे म्हणजे दिवसा स्वप्न पाहिल्या सारखे आहे. ज्यांनी कधी साधे ग्रामपंचायत लढवली नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती लढवली नाही त्यांना हाताशी धरून पाडायची भाषा करत आहे. त्यामुळे, आ. थोरात हे लाखांच्या फरकाने निवडुन येतील. जे भाजपचे सेनेचे विरोधक आहे ते शांत आहे. मात्र, विखें पाटलांच्या छत्रछायाखाली आहे ते आज उड्या मारताय. पण या उड्या २३ तारखेला बेडुक उड्या होऊन एखाद्या डबक्यात पुन्हा जाऊन बसतील अशी टिका आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा ओहळ यांनी केली.
बाळासाहेब थोरात हे नाव बोलबोल करता देशाच्या राजकारणात घेतले जाते आहे. ते वर्किंग काँग्रेस कमिटीचे सदस्य आहे. देशातील काँग्रेसच्या २१ पैकी ते एक आहेत. अर्थात कोणीही माणूस सहज मोठा होत नाही. कारण, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही हे सर्वश्रुत आहे. आज बाळासाहेब थोरातांनी जे काही नाव कमविले, त्याला कोणाचेही पाठबळ नाही. वडिलांचा वारसा असला तरी त्यांनी तो निती नियमाने जोपासला आहे. सत्तेची लालसा आणि ईडीच्या, भ्रष्टाचाराच्या धमक्यांचा कलंक त्यांनी माथी पडेल असे कोणतेही कृत्य केले नाही. म्हणून तर माजी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, थोरात साहेब म्हणजे धुतललेले पांढरेशुभ्र तांदुळ त्यांच्यावर आरोप करुन पांढऱ्या कपड्यावर काळे डाग पाडू नका. आता यापेक्षा त्यांच्या चांगुलपणाचे वेगळे प्रमाण काय असू शकते.? अर्थातच विरोधकांनी देखील गुण गैरवावे असे हे व्यक्तीमत्व आहे. ते नुसते काँग्रेसमध्ये राहिले नाही. तर, त्यांनी तो विचार अंगिकारला. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या वाक्याला वास्तवात आणले. नाहीतर, काल गावकुसाबाहेर असणारा दलित, वंजारी, मुस्लिम, माळी हा समाज आज सत्तेच्या खुर्चीवर स्थानापन्न आहे. म्हणून कोण्या एका जातचे म्हणून नव्हे. तर, बाळासाहेब म्हणजे सर्वसमावेशक व्यक्तीमत्व ठरले आहे असे ओहळ म्हणाले.
फार नाही. पण,थोरात साहेबांचे थोडक्यात उदा. सांगता येतील की, संगमनेर तालुक्यात १२ बलुतेदार व १८ पगड जाती एक करुन त्यांच्या वाड्या वस्तींचा विकास केला. इतकेच काय.! फुले, शाहु, आंबेडकरांचे नाव मुखी घेताना त्यांनी त्यांची विचार देखील अंगिकारले. म्हणून तर, येथील दलित व अल्पसंख्यांक समाज शासनकर्ती जमात होऊ शकला. कारण, तुम्हाला आठवत असेल. १५ वर्षापुर्वी वंजारी समाजाचे नेते गणपत सांगळे यांनी जनरल जागेहुन तिकीट दिले व निवडून आणत त्यांना जिल्हा परिषदेवर पाठविले. पुन्हा जिल्हा बँकेवर पाठविले. विश्वास मुर्तडक यांना नगराध्यक्ष केले. तर याच समाजातील बी. आर. चकोर याना जिल्हा नियोजन समितीवर संधी दिली. मातंग समाजाचे नेते जगनराव अल्हाट कारखान्या. दरम्यानच्या काळात बी.आर कदम, जी.व्ही रुपवते, भास्कर बागूल, सुधाकर रोहम अशा अनेकांना कारखान्यावर संधी दिली. तर दुधसंघात संघात माणिकराव यादव तीन वेळा संधी तर एकदा पं.समितीत सदस्य केले. शेतकी संघात श्री. वाघमारे व मार्केट कमिटीवर आत्माराम जगताप, तर जनरल जागेवरून बाळासाहेब गाडकवाड यांना पंचायत समिती निवडुन आणुन पंचायत समितीचे उपसभापती केले. अतिशय अल्प असणारा कुंभार समाजाच्या महिला सुनिता अभंग याना देखील उपसभापती केले होते. तर सर्वच संस्था माणल्याजाणाऱ्या सहकारी साखर कारखान्यावर बाबा ओहळ याना चेअरमन तर शंकर पाटील खेमनर यांना बाजार समितीचे सभापती केले. यांच्यासह मुस्लिम समुदायास अनेकदा संधी देत त्यांना नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व नगरसेवक केले. त्यामुळे, तालुक्यातील कुठलाच समाजाचा घटक आ. थोरातांवर नाराज दिसत नाही. तो उघड विरोध ही करत नाही. त्यामुळे, सर्व समाजाचे मताधिक्य आ. थोरात यांना मिळताना दिसतात असे मत ओहळ यांनी व्यक्त केले.
खरंतर, सन १९८५ पासूनचा इतिहास पाहिला तर आजतागायत आ. थोरातांना पराभूत काय साधे त्यांच्या मताधिक्याच्या जवळपास देखील कोणी आलेले नाही. इतका त्यांची मतदारसंघात बांधणी आहे. विरोधक नेहमी तहान लागली की विहीर खंदतात. निवडणूक आली की वलग्ना करतात. त्यानंतर बुळगा विरोध पाहायला मिळतो. त्यामुळे, विखें पाटील यांना देखील संगमनेर तालुक्यात काही हाती लागत नाही. इतकेच काय! विखें पाटील यांनी २०१९ च्या विधानसभेला सर्व विरोधक एकत्र करण्याचा प्रयत्न केला. डझनभर-डझनभर उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मात्र, २०१९ चे २०२४ आली तरी सर्व विरोधक एकत्र आल्याचे दिसले नाही. हेच पाण्याचे मुद्दे तळेगाव, निमोण, साकुर भागात २०१९ साली उठवले होते. त्याचंपाण्याच्या मुद्द्यांनी विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आणि आ. थोरात यांना ६१ हजार ८५३ मतांनी मोठ्या मताधिक्याने विजयी केले. संपूर्ण राज्यासह पुणे,नाशिक मध्ये भाजपचे वारे वाहू लागले महानगरपालिकासह जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात गेल्या. इतकेच काय! विखें पाटील यांच्या राहता नगरपालिकेवर राजेंद्र पिपाड यांची सत्ता आली. मात्र, संगमनेर नगरपालिकेत अवघा एक नगरसेवक आला. त्यामुळे, आ. थोरात साहेबांना पराभूत करणे म्हणजे दिवा स्वप्न पाहण्यासारखे आहे.