दुधसंघावर कॅन धुणे आणि घोटीला फर्शी पुसणे यापेक्षा थोरातांकडे तरुणांना नोकरी नाही, आता परिवर्तन हवे.!

सार्वभौम (संगमनेर):-

                          संगमनेर तालुक्यात काँग्रेसची युवा संवाद यात्रा पेमगिरीतुन काढण्यात आली होती, तेथेच आज विखें पाटील यांची जाहीर सभा झाली. विखें पाटील बोले की, या तालुक्यात आल्यावर स्व. खताळ पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य निस्वार्थी, निष्कलंक या तालुक्याला समर्पित काम केले होते. मंत्री झाल्यानंतर देखील त्यांच्यावर कधी दहशतवाद, दडपशाहीचा आरोप झाला नाही.  त्यामुळे, आता अमोल खताळांच्या रूपाने पुन्हा एकदा स्व. खताळ पाटलांची आठवण होते. खरंतर, येथील आमदारांना तरुण नोकरी मागण्यासाठी गेले तर दोनच काम आहे. दुध संघावर कॅन धुण्यासाठी नाहीतर घोटीला फरची पुसण्यासाठी पाच-पाच हजार रुपयांवर येथील तरुण काम करतो. त्यामध्ये ही चौदा हजार रुपयांच्या स्लिपवर सही घेतो आणि चार हजार हातावर ठेकवतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे, ज्यांना चाळीस वर्षात युवकांसाठी काही करता आले नाही. निव्वळ धाक दडपशाहीचे राजकारण केले ते आता उखडून टाकण्याची वेळ आली आहे. अमोल खताळ या शेतकऱ्याच्या मुलाला संधी द्या तुमचे प्रश्न मिटवतो असे विखें पाटील यांनी पेमगिरीतील सभेत मत व्यक्त केले.

ते पुढे बोले की, येथील आमदार महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्री होते. या मंत्र्यांनी अडीच वर्षात काय दिले तर दडपशाही, गुंडशाही, झुंडशाही हे तालुक्याच्या नशिबी आले. पण ते आता उखडून टाकायचे आहे. असंख्य लोक कोविडच्या काळात प्रवरेला आले. मोफत औषध उपचार झाले. असे एखादे सेंटर संगमनेरात होते का?  खाजगी डॉक्टरकडे गेले तर चार-चार लाख रुपये बिल येत होती. ज्याला इच्छा मरण पाहिजे तो घुलेवाडीला जात होता अशी परिस्थिती संगमनेर कोविड काळात होती. मात्र, त्यांना कधी इच्छा झाली नाही की घोटीचे एखादे सेंटर कोविड काळात संगमनेरात सुरू करू आणि जनतेला मदत करू असे कधी येथील आमदारांना वाटले नाही असे आ. थोरातांचे नाव न घेता कोविडच्या विषयावरून विखें पाटलांनी धारेवर धरले. जिल्ह्यात तीन मंत्री होते सर्व थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसले. त्यांचे मुख्यमंत्री फेसबुकवर होते. अशा कोविडच्या काळात जनता वाऱ्यावर होती. आता या सभेत तुम्ही आलात तुमचे फोटो काढतील सर्वांचे नाव लिहतील दमदाटी करतील. समोर पराभव दिसल्यावर गुंड आणतील बुथ ताब्यात घेतली पण चिंता करू नका तुमच्या पाठीशी मी उभा आहे. तुमच्या केसाला ही धक्का लागणार नाही.

            या तालुक्यात अनेकांनी अन्याय सहन केला आहे. याच तालुक्यातील कारभारी कडलगला मारताना पाहिले. गुंजाळ साहेबांच्या निवडणुकीत हंगेवाडीत काय झाले पाहिले. बापूसाहेब गुळवे यांच्या निवडणूकीत धिंगाना घालताना पाहिले. तेव्हा येथे चुप बैठेगा तो कान काटूगा ही येथील आमदारांची पद्धत आहे. जेव्हा आपले सरकार आले तेव्हा येथील वाळूमाफीया, अवैध स्टोनक्रेशर, अवैध उत्खनन यांचा उच्छाद बंद केला आहे. येथील लोक नेहमी आमचा दुध संघ असा आहे आमचा कारखाना असा आहे. त्याच दुध संघाची मलई खातात, याच कारखान्यातुन साखरीचे पोते छोट्या बोगद्यातून चोरीला गेले. ते अजुन सापडले नाही याचे कौतुक कोण करील असे विखें पाटील यांनी आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टिकेची झोड उठवली. आता तुम्ही काळजी करू नका पेमगिरीतील ऐतिहासिक स्थळांचा आराखडा तयार करा. या विकासासाठी कितीही निधी लाघु द्या तो आपण देऊ त्याची पूर्तता करायची जबाबदारी ही माझी राहिली असे विखें पाटील पेमगिरी येथे बोलताना सांगितले.

        दरम्यान, महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी देखील स्थानिक विषयांवर तोंड सुख घेतले. ते बोले की, २०१९ मध्ये येथील आमदारांचे बॅलेट पेपरवर विजय उर्फ बाळासाहेब नाव असायचे आता ते हद्दपार झाले आहे. त्यामुळे आता चिंता करू नका विजय आपलाच निश्चित आहे. जेव्हा संजय गांधी निराधार योजनेचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळी पेमगिरी गावातील वृद्ध व्यक्तींना राजकीय द्वेषातून डावले गेले. त्यावेळी विखें साहेब बोले आपल्याला भेदभाव करायचा नाही. आपण याच गावात २५% काँग्रेसच्या लोकांचे काम केले. जो गरजुवंत आहे मंग तु कुठल्याही पक्षाचा आहे. याचा विचार केला नाही. याच पेमगिरी गावात एका ठेकेदाराची दहशत आहे. त्या ठेकेदारानी तरुणांना वेठीस धरण्याचा त्रास देण्याचे काम केले आहे. पण, आता घाबरू नका महायुतीचे सर्व नेते आपल्या पाठीशी आहे. विखें पाटील आपल्या पाठीशी आहे. यांनी चाळीस वर्षे विकास केला म्हणता मंग विकास कुठे झाला. तर ठेकेदारांचा, कुटुंबाचा, बहिणीचा आणि भाच्याचा केला सर्वसामान्य जनतेचा केला नाही. तो आता मी करणार आहे. हे आता सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाचे फ्लेक्स फाडण्यापर्यंत यांची मजल जाती ती आता आपण मोडीत काढणार आहे. तुम्ही फक्त एकदा संधी द्या त्या संधीचे सोने करून दाखवेल असे अमोल खताळ यांनी पेमगिरी येथे प्रचार सभेत बोले.