अखेर गटशिक्षण अधिकार्‍यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू.! तीन दिवसांपासून चौकशी.! झेडपी मुलांचे केले वाटोळे.!

 

सार्वभौम (अकोले) :-

     गेल्या दोन ते तिन दिवसांपासून गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांच्या अनागोंदी कारभाराची चौकशी शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब आणि त्यांचे पथक थेट अकोले पंचायत समितीत येऊन करीत आहेत. शिक्षकांच्या बदल्या असतील, त्यांचे समायोजन असेल, वेगवेगळी बिले मंजूर करताना झालेल्या "अर्थ"पुर्ण तडजोडी असेल, महिलांशी असभ्य वर्तन, जातीयवाद आणि शिक्षकांशी अश्‍लिल व आरेरेवीच्या भाषेत बोलणे असेल. अशा अनेक गोष्टींची चौकशी सुरू आहे. यात अनेक चुकांमध्ये खताळ हे दोषी असल्याचे विश्‍वसनिय सुत्रांकडून समजले असून शिक्षण अधिकार्‍यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे, प्रचंड भोंगळ आणि मनमानी कारभार करणार्‍या खताळ यांच्यावर कठोर कारवाई होण्याचे संकेत अधिकार्‍यांनी दिले आहेत. तर, अकोले तालुक्यात ४४ शिक्षकांच्या मनमानी बदल्या त्यांनी केल्या असून त्या नेमकी कोणत्या अर्थाने आणि हेतूने केल्या आहेत? त्याबाबत कोणाला विचारणा केली आहे? अशा अनेक गोष्टींवर ते निरुत्तर झाले आहेत. मात्र, त्याचा एक पठ्ठ्या आजी-माजी आमदार, काही नेते पुढारी यांच्या गाठीभेटी घेत असून या अधिकार्‍यावर कारवाई होऊ नये म्हणून जिवाचा आकांत करीत आहे. आता या चौकशीतून कोठे "अर्थपुर्ण" तडजोडीचा वास बाहेर येणार नाही. अशी अपेक्षा पाटील यांच्याकडून शिक्षक संघटना आणि अकोलेकर यांनी व्यक्त केली आहे.

...तर मुलांचे शैक्षणिक वाटोळे होईल.!

अकोले शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. मात्र, काही पुरोगामी विचारांच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन ती पुन्हा सुरू केली. जेव्हा या शाळेत पाच विद्यार्थी शिल्लक होते. तेव्हा तेथे जे पुर्वी शिक्षक होते. त्यानंतर त्यांची बदली औरंगपूर येथे केली. त्यानंतर जे नवे शिक्षक आले त्यांनी अतिशय पोटतिडकीने काम करुन हा पाच चा पट २५० पर्यंत नेला. आता पुन्हा या शाळेत गटशिक्षण अधिकारी खताळ यांनी पुर्वीच्या शिक्षकाची जेसे थे नियुक्ती केली आहे? तुम्हीच सांगा, येथे पालक विद्यार्थ्यांना ठेवतील का? किंवा जो आज पट आहे. तो कायम राहिल का? दुसरे उदा. म्हणजे उंचखडक बु येथील शाळा बंद झाली होती. तेथील काही तरुणांनी एकत्र येऊन शाळा पुन्हा सुरू केली. शुन्य विद्यार्थी झाले तेव्हा तेथे जे शिक्षक शिकवत होते. त्यांना खताळ यांनी पुन्हा उंचखडक बु शाळेवर नियुक्त केले आहे. त्यामुळे, आज केजी ते चौथी ७० पट झाला आहे. तो कायम राहिल का? आजच पालकांनी मुले शाळेतून काढण्यास सुरूवात केली आहे. जर शिक्षक बदली मिळाला नाही. तर, उद्या हेच विद्यार्थी बीडीओ आणि गटशिक्षण अधिकारी खताळ यांच्या दालनात आंदोलन करणार आहेत. त्यामुळे, या दोन शाळेंच्या बाबतीत तरी पाटील साहेब यांनी विशेष बाब म्हणून विचार केला पाहिजे. अन संबंधित शिक्षकांवर कारवाई केली पाहिजे. एकंदर अशा पद्धतीने जर शिक्षण विभाग हाटीवादपणा करणार असेल. तर, खरंच यांना मराठी शाळा टिकवायच्या आहेत की नाही? असा प्रश्‍न पालकांना पडला आहे.

४४ शिक्षकांच्या बदल्या केल्या कशा?

प्रभारी गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ साहेब यांनी अकोले तालुक्यात त्यांच्याकडे चार्ज असताना तब्बल ४४ शिक्षकांना त्यांच्या आवडीनुसार तात्पुरते बदली ठिकाण दिले आहे. आता याबाबत गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांना विचारणा केली असता त्यांनी अक्षरश: हात वर केले. या बदल्या कशा व का केल्या माहित नाही. त्यामुळे, खुद्द मुख्याधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी देखील इतक्या बदल्या (तात्पुरत्या) केल्या नसतील. तितक्या खताळ यांनी केल्या आहेत. खरंतर, चार-दोन किंवा पाच दहा बदल्या परिस्थितीनुसार सहाजिक आहे. मात्र, ४४... बाप रे.! या बदल्यांमध्ये नेमकी काय दडलं आहे? घोडं तात्पुरतं राखायला दिल म्हणून ते कसही दामटायचं का? त्यामुळे, या बदल्यांना मलिद्याचा वास आहे का? यातून काही "अर्थपुर्ण" तडजोडी झाल्याय का? याची चौकशी आता सुरू झाली आहे.

शिक्षका ऐवजी वकीलकी द्या.!

विस्तार अधिकारी म्हणून असलेले जालिंदर खताळ हे गेली दिड वर्षे गटशिक्षण अधिकारी म्हणून अकोले पंचायत समितीत कार्यरत आहेत. त्यांच्यावर आत्तापर्यंत डझनभर पेक्षा जास्त आरोप करण्यात आले आहेत. मात्र, त्यांची वकीलकी एका शिक्षकाने घेतली असून त्यांना गटशिक्षण अधिकारी पदावर कायम ठेवण्यासाठी हा शिक्षक शाळा आणि शिकवायचे सोडून नेत्यांच्या आणि अकोले संगमनेरच्या आजी-माजी आमदारांच्या घराच्या पायर्‍या झिजवत आहे. त्यामुळे, शासनाची फसवणुक करुन पगार घेणार्‍या शिक्षकांमुळे बाकी शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलु लागला आहे. मात्र, चाळीत एका सडक्या कांद्याची शिक्षा अनेकांना भोंगावी लागते. त्यामुळे, अधिकार्‍यांवर कारवाई तर व्हावीच. मात्र, कामचुकारपणा करणार्‍या शिक्षकावर तथा असल्या वकीलावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खुद्द काही शिक्षकांनीच केली आहे. 

 आजून किती पाठीशी घालणार.!

गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ साहेब यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. ४४ शिक्षकांच्या बदल्या, समायोजन प्रक्रिया, वेगवेगळी बिले मंजुरीतील अर्थपुर्ण तडजोडी, महिलांशी असभ्य वर्तन, जातीयवाद आणि शिक्षकांशी अश्‍लिल व आरेरेवीच्या भाषेत बोलणे असेल. अशा अनेक गोष्टींची चौकशी सुरू आहे. तर, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, बीडीओ अशा सर्वांनी यांच्या तक्रारी केल्याचे पुरावे असून वर्तमानपत्रात पुर्वी बातम्या छापून आल्या आहेत. असे असताना देखील शिक्षण विभाग यांना अजून किती पाठीशी घालणार आहे? जिल्ह्यात ९५ टक्के सगळीकडे गटशिक्षण अधिकारी असून अकोल्यात केव्हर प्रभारी चार्ज ठेवून शिक्षक व विद्यार्थ्यांचे नुकसान करणार आहेत? या अधिकार्‍यावर कोणाचा वरदहस्त असून विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तरी चालेल. पण, अकोल्याला अधिकारी द्यायचा नाही असा प्रण सीईओ आशिष येरेकर साहेब आणि शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब यांनी केला आहे? अशा प्रकारची चर्चा अकोले तालुक्यात सुरू आहे. 

क्रमश:  भाग 6