*संगमनेरात भीषण अपघात.! बालकासह अकोल्याचे चौघे ठार,एक गंभीर जखमी.! अकोल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये अकोले तालुक्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकमहिला गंभीर जखमी असुन खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. ओजस्वी हर्षल धारणकर (अडीच वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42), अकोल्यातील सुप्रसिद्ध भेळवाले अभय सुरेश विसाळ (वय 48), सुनिल दिनकर धारणकर (वय 65) (ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी मयत व्यक्तींची नावे आहे. तर अभय विसाळ यांची पत्नी अस्मिता विसाळ या सुदैवाने आणि चंदनापुरी ग्रामस्तांच्या तत्परतेमुळे बचावल्या आहेत. ही घटना आज रविवार दि.17 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चंदनापुरी गावात नाशिक पुणे महामार्गावर घडली. या घटनेने संपूर्ण अकोले तालुका हळहळ व्यक्त करीत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील धारणकर यांचे कुटुंब पुण्याला कामानिमित्त गेले होते. पुण्यातील काम आटोपल्यानंतर दुपारी माघारी फिरले होते. नाशिक-पुणे महामार्गावर त्यांचा प्रवास सुरु असताना ते संगमनेरहून अकोल्याकडे जाणार होते. दरम्यान ते चंदनापूरी गावाच्या परिसरात असताना एका आयशर (यु.पी.24 टी. 8550) ही गाडी भरधाव वेगाने चालली होती. रस्ता चांगला आणि रात्रीची गर्दी कमी असल्याने गाडीला वेग फार होता. त्यामुळे, आयशर चालक सुसाट सुटला होता. दरम्यान, यावेळी टोयटा कंपनीच्या कार मधुन हे दोन कुटुंबातील पाच व्यक्ती संगमनेरच्या दिशेने चालले होते. मात्र, गाडीला ओव्हरटेक करताना या आयशर गाडीने अचानक पलटी घेतली आणि ती टोयटा कारवर येऊन आदळली. यावेळी एकच आवाज झाला. त्यामुळे आजुबाजू असणाऱ्या व्यक्तींच्या लक्षात आले. की, फार मोठा अपघात झाला आहे. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. आयशर गाडी संपूर्ण कारवर आदळली आणि कारचे संपूर्ण छत गाडी खाली दबुण माणसे देखील दबली. कारण, आयशर मालवाहतूक गाडीत मोठे लाकडी ओंडके असल्याने वजन होते. त्यामुळे, गाडीतील व्यक्तींना कोणतीही हलचाल करता आली नाही. मात्र, यात गाडीतील मानसांना मेंदू आणि ह्रदयास मुक्का मार लागला आणि ते चेपले गेले होते.
दरम्यान, दोन्ही गाड्या भरधाव वेगाने असल्याने चुक कोणाची हे फारसे कोणाला कळले नाही. रस्त्यावर देखील 8 वाजण्याच्या सुमारास फारशी माणसे नव्हती. मात्र, काही सुजाण नागरिक अपघाताचा आवाज ऐकताच घटनास्थळी गेले. मात्र, अपघात एवढा मोठा होता की तेथे काही अन्य यंत्रणेची गरज होती. कारण, अवजड वाहन छोट्याशा कारवर होते. त्यामुळे, कारमधील कुटुंबाला नागरिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत फार वेळ झालेली होती. रक्ताच्या थारोळ्यातुन कारमधील लोकांना काढण्यात आले. यामधील अडीच वर्षांच्या बालकासह तिघा जणांनी फार काळ तग धरला नाही. त्यामुळे,जाग्यावर चार जणांचा मृत्यू झाला होता. चंदनापुरी परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.आणि बघता बघता गाव गोळा झाले. एका जखमी महिलेला तात्काळ दवाखान्यात हलवले. जीवासाठी प्रयत्न तोडके नको म्हणुन उर्वरित चौघांना देखील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत चौघाजणांनीची प्राणज्योत मालवली होती. संबंधीत घटना घडल्यानंतर स्थानिक व्यक्तींने संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी काही काळ ठप्प झालेला महामार्ग सुरळीत केला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अपघात झालेला आयशर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर चालक कोठे पसार झाला हे माहित नाही.
खरंतर, सुप्रसिद्ध भेळवाले अभय विसाळ यांची बातमी एकल्यानंतर अनेकांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले होते. आपल्या पालकांच्या नंतर त्यांनी अगदी पाच बाय पाच च्या जागेत विसाळ भेळ ही परंपर कायम राखली. मोठ्या संघर्षातून प्रवास सुरु असताना अजिंक्य क्रिकेट क्लबच्या माध्यमातून त्यांचा फार मोठा मित्रपरिवार झाला होता. सायंकाळी छोट्याशा गरिब टपरीभोवती श्रीमंत मानसांची मैफिल बसत होती. पोटभर भेळ आणि तोंडभरुन गोड बोलणे यामुळे अभय बंधु सर्वांचे जवळचे आणि जिव्हाळ्याचे मित्र होते. विसाळ भेळ म्हटलं की अगदी आमदार, खासदार आणि नेते मंडळींसह अगदी सामान्य व्यक्ती भेळीवर ताव मारत होते. दुर्दैवाने आता या टपरीवर विसाळ दिसतील ते फक्त फोटोत. पण, अभय भाऊ यांची उणीव या तालुक्याला कायम भासेल. त्यांच्या जाण्याने व्यापारी, अजिंक्य फ्रेंड सर्कल, नातेवाईक आणि त्यांचे असंख्य ग्राहक यांनी फार शोक व्यक्त केला आहे. तर धारणकर कुटुंब हे अगदी सामाजिक बांधिलकी असणारे होते. सुनिल धारणकर हे पुरोगामी विचारांना धरुन चालणारे होते. एक हसतमुख आणि नेहमी सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तीमत्व होते. त्याच्या कुटुंबातील तीन व्यक्ती गेल्याने हे दु:ख आयुष्यभर न विसरणारे आहे.