मच्छी मार्केटला कोयते रक्ताळले.! वकीलासह तिघांवर हल्ला, सात जणांवर हाफ मर्डर.! भावासाठी भाऊ धावले पण...
सार्वभौम (संगमनेर) :-
पोलीस ठाण्यात नोंदविलेला गुन्हा मागे घेण्याच्या कारणाहून एका वकीलासह तिघांना सात जणांनी शस्त्रास्त्रासह मारहाण केली. ही धक्कादायक घटना शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी संगमनेर शहरातील सुकेवाडी रोड मच्छी मार्केट परिसरात घडली. फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी-शेजारी राहण्यास असून चोरी केल्याप्रकरणी यापुर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तो मागे घ्यावा म्हणून यांच्यात कायम वाद होत होता. मात्र, वकीलास कायमचे संपून टाकायचे या हेतूने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात तिघे जखमी झाले आहे. यामध्ये आरोपी सादिक रज्जाक शेख, आयान सादिक शेख, इमरान बशीर शेख, जुनेद सादिक शेख, आय्याज रज्जाक शेख, कदीर नुरमोहम्मद शेख, अशफाक इब्राहिम पटेल आशा सात जनांवर हाफमर्डर गुन्हा दाखल झाला असुन याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे करत आहे.
याबाबत ऍड. शरिफखान रशिदखान पठाण (रा. सुकेवाडी रोड, माताडे मळा, संगमनेर) यांनी फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी. की, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी सादिक रज्जाक शेख याच्यासह अन्य दोघांनी पठाण यांना बोलविले आणि म्हणाले. की, तु आमच्या विरोधात दिलेली केस मागे घे आणि आमच्या घराजवळ लावलेले गेट काढून घे असे म्हणून शिविगाळ दमदाटी करु लागले. त्यानंतर या दोघांना काही एक क्रॉस न करता पठाण यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि त्यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली. त्यानंतर दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास शेख यांचा जावई आशफाक इब्राहिम पटेल (रा. साकूर, ता. संगमनेर) हा घरी आला आणि तो मोठमोठ्याने बोलु लागला. तुम्ही यांना जिवंत का सोडले? त्यांचा संध्याकाळपर्यंत कार्यक्रम करुन टाका.
दरम्यान, त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ऍड. पठाण हे त्यांच्या ऑफिसहून कामकाज करुन घराकडे येत होते. ते मच्छी मार्केटमध्ये आले असता तेथे सादिक शेख आणि त्याच्या शेजारी शेरु इमाम शेख या दोघांचे मच्छीचे दुकान आहे. तेव्हा शेरू याने ऍड. पठाण यांना आवाज दिला आणि त्यांना जवळ बोलावून घेतले. याच ठिकाणी नाजीर इब्राहिम पठाण, एजाज शेख हे देखील होते. त्यावेळी सादीक शेख, आयन शेख, इमरान बशिर शेख, जुनेद सादिक शेख, आयाज रजाक शेख, कादीर नुरमहाम्मद शेख, आशफाक इब्राहीम पटेल पुर्वनियोजित येऊन थांबले होते. आमच्यावर केस दाखल करतो का? असे म्हणून त्यांनी अचाकन हल्ला केला.
दरम्यान, सादिक शेख याने मासे कापण्याचा कोयता ऍड. पठाण यांच्या दिशेने भिरकविला असता त्यांनी तो वार हुकविला मात्र तो वार डोक्याच्या डाव्या बाजुस चाटून गेला. यावेळी हा हल्ला पाहून जवळच एका हॉटेलच्या समोर ऍड. पठाण यांचे दोन्ही भाऊ रिजवान आणि आसिफ उभे होते. त्यांनी तत्काळ वाद सोडविण्यासाठी धाव घेतली. मात्र, सादीक म्हणाला. की, दरवेळी वाद झाले की याचे दोन्ही भाऊ सोडविण्यासाठी येतात यांना देखील सोडू नका. तेव्हा रिजवान यांच्या पोटात कादीर शेख याने काहीतरी टाकदार वस्तू मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिजवान यांनी मध्ये हात घातला आणि हातावर फार मोठी जखम झाली.
यावेळी आयन शेख याने त्याच्या हातातील मासे कापण्याचा कोयता रिजवान यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. पण तो कानाखाली लागला. तर, यावेळी इमरान शेख व जुनेद शेख यांनी ऍड. पठाण यांचे दुसरे बंधू आसिफ यांच्या पाठीवर आणि पोटावर लोखंडी गजाने वार केले. आयाज शेख याने त्याच्या हातातील बेस बॅलच्या दांड्याने रिजवानच्या पोटशवर, पाठीवर, पायावर जबरी मारहाण केली. आशफाक पटेल म्हणाला. की, एकाला देखील सोडू नका असा दम दिला. यात सात जणांनी तिघांना बेदम मारहाण केली. तर, ऍड. बंधुला सोडविण्यासाठी गेेलेल्या भावांनाच जास्त मार लागल्याने त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.