प्रशासकीय व्यवस्थेला काळीमा.! महिलांकडून बस व्यवस्थापकास झाडूने मारहाण, वरुन विनयभंग, साहेब, निलंबित पण देव माफ करणार नाही.!
सार्वभौम (अकोले) :-
भ्रष्टाचार आणि कामकुचराईने बरबटेल्या व्यवस्थेला कोणीतरी आव्हान देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यावर अपहार, बलात्कार, छेडछाड आणि तत्सम आरोप करुन त्यास बदनाम केले जाते. इतकेच काय.! एकोपा करुन मारहाण करणे आणि पुन्हा लाजिरवाणे खटले भरणे ही असली निच पातळीची प्रशासकीय व्यवस्था समाजात रुढ झाली आहे. त्याचेच बळी अकोले बस स्थानकाचे मुख्य व्यवस्थापक युवराज गंभीरे ठरले आहेत. गुन्हा काय? तर, ५८ व्या वर्षी बस व्यवस्थापन सुधरायचे होते, अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात बस पाठवायची होती, बस स्थानक सुंदर करायचे होते, प्रत्येकाकडून ज्याचे-त्याचे काम चोख पार पाडून घ्यायचे होते, स्वच्छ बस आणि परिसर देखील सुंदर ठेवण्याचा संकल्प केला होता. मात्र, ज्यांना काम कमी आणि पगाराची हमी पाहिजे त्यांना हे सर्व नको होते. अशा व्यक्तींनी गंभीरे यांच्या भोवती कुभांड रचले आणि ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत. त्या ठिकाणी त्यांना गाठून अक्षरश: झाडूने मारले. त्यांना आयुष्यातून संपविण्यासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मग काय! अखेर त्यांचे निलंबन देखील झाले. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी हा गुन्हा दाखल केला त्यांच्या विरुद्ध पुर्वीच गंभीरे यांनी तक्रार दाखल केलेली आहे. की, हे खोट्या गुन्ह्यात आणि खोटे आरोप करुन मला अडकवू शकतात. मला यांच्या पासून माझ्या जिवितास धोका आहे. असे असताना देखील वरिष्ठांनी कोणतीही दखल घेतली नाही. मात्र, गंभीरे यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांना निलंबित करण्याची तत्परता दाखविली. त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील "सेवा तत्परता" पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील सुज्ञ व्यक्तींनी केली आहे.
खरंतर गंभीरे यांचे विचार व स्वभाव हा प्रचंड बोलका. जो जाईल त्यांना सहकार्य करायचे आणि जो बेकायदेशील बोलेल त्याला पिटालून द्यायचे. त्यामुळे, अकोले शहरातील काही स्वयंघोषित नेत्यांशी त्यांची हुज्जत झाली होती. मात्र, कोरोना काळानंतर जी काही बस वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. ती अवघ्या ३० ते ३५ गाड्यांमध्ये सुरळीत करण्याचे काम त्यांनी केले होते. खड्ड्यात गेलेल्या बस स्थानकावर मुरुम टाकण्यापासून ते बस स्थानकाचे सुशोभिकरण करण्याचा पाठपुरावा करण्यापर्यंत त्यांचा फार मोठा वाटा आहे. संपुर्ण आयुष्य त्यांनी नोकरीसाठी बाहेर घातले. उतारवयात आपण आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करावे म्हणून त्यांनी स्वत: बदलीसाठी प्रयत्न केले होते. पण, वाट्याला आले का? तर, मारहाण आणि विनयभंग अशी विभुषणे..!!
साहेब तुमचे काय चुकले.!
चांगले असणे हेच मुळात वाईट असते, हे तुमच्या लक्षात आले नाही. या व्यवस्थेत कोणी एक व्यक्ती परिवर्तन घडवू शकत नाही. त्यासाठी स्वत:चे कर्मचारी, त्यातील दुबळे, नाव ठेवणारे, काम करणारे, कुशल, अकुशल, पगारी-निमपगारी, खर्चीक -अखर्चीक या सर्व गोष्टींचा ताळमेळ बांधून सोबत घेऊन चालावे लागते. प्रत्येक वेळी कोणी चुकला की त्याला नोटीसा आणि वरिष्ठांकडे अहवाल या गोष्टींनी कधीच परिवर्तन होऊ शकत नाही. एकदा बोलले तर दुसर्यांदा शब्बासकी देण्याची कसब त्यांना जमली नाही. सगळ्याच गोष्टी एकाच वेळी अजेंड्यावर घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. अर्थात त्यांची वाटचाल निवृत्तीकडे होती. त्यामुळे, त्यांना परिवर्तन व्हावे, नवे काहीतरी करावे असे वाटत होते. मात्र, सख्यांची सोबत लाभली नाही. त्यामुळे, वारंवार चिडणे, कारवाई करणे, कामांच्या अपेक्षा करणे ह्याच गोष्टी त्यांना निलंबनाकडे घेऊन गेल्या.
त्या दिवशी नेमकी काय घडलं.!
गंभीरे हे त्यांच्या कार्यालयात काम करीत होते. तेव्हा तेथे प्रणव प्रल्हाद भापकर हा आला आणि त्याने टेबलावर मस्टर आपटण्यास सुरुवात केली. असे करु नको म्हटले तर तो उर्मटपणे बोलु लागला. त्यानंतर गंभीरे हे वरिष्ठांना पत्रव्यवहार करत होते. तेव्हा त्यांना लघुशंका आली म्हणून ते शौचालयाकडे गेले. याचाच फायदा घेऊन तेथील तीन महिला त्यांच्या मागे पळत गेल्या. तिकडे सीसीटीव्ही नसल्याचा फायदा घेऊन महिलांनी मागे जाऊन गंभीरे यांच्या तोंडात मारली, तर दोघींनी लाथाबुक्क्या व झाडूने मारहाण केली. एका निवृत्तीला टेकलेल्या वयोवृद्ध अधिकार्यास यांनी गड्यासारखी मारहाण केली. आता कारवाई होईल, गुन्हा दाखल होईल म्हणून यांनी विनयभंगाचे हत्यार बाहेर काढले. गुन्हा दाखल केला नाही तर मी आत्महत्या करेल असे पोलिसांना सुनावले. विशेष म्हणजे एखाद्या प्राथमिक शाळेतील मुलांनी भाषणे पाठ करावीत अशी पाठांतर केलेेली फिर्याद पोलीस ठाण्यात सांगण्यात आली. ही फिर्याद एका पुढार्याने तिच्याकडून वदुन दिल्याचे बोलले जात आहे.
तर, अधिकारी काम करतील का?
आपण ही व्यवस्था बदलविली पाहिजे, निर्भिड व निष्पक्ष काम केले पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या खात्यात सक्षम चांगले अधिकारी येतात आणि काम देखील करतात. उदा. पोलीस खात्यात अनेक सिंघम अधिकारी येतात वेश्या व्यवसायावर छापा टाकला की ती म्हणते माझ्याकडे याने शरिर सुखाची मागणी केली. जुगारावर छापा टाकला की ते म्हणतात आमच्या ताब्यातील मुद्देमाल यांनी स्वत:च्या खिशात टाकला. एखाद्याची घरझडती घेतली. की, माझ्या घरातील पैसे चोरी गेले. तपास केला की त्यात पैसे मागितले. साधे आरोप झाले तरी त्यांची चौकशी आणि बदली एव्हाना निलंबन आणि बडतर्फी देखील होते. मग सांगा ना.! कशी कामे करायची? पण, दैव आणि नैतिकता नावाचा एक प्रकार असतो. त्यामुळे, जो कोणी खोटे आरोप करेल त्याचे भोग त्यांना भोगावे लागणार. असे म्हणतात पुर्वी इथे केलं ते वर फेडावे लागत होते. आता इथे करायचे आणि इथेच भरायचे आहे. त्यामुळे, खोट्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही.