एक गाव, एक शाळा, एकच बिल्डिंग अन २९ पटाला चार शिक्षक.! वा रे गटशिक्षण अधिकारी.! शिक्षक पुढार्यासाठी काहीपण..!
सार्वभौम (अकोले) :-
नगरहुन अधिकारी आले. की, त्यांना मुजरा करण्यासाठी काही शिक्षक नेत्यांची रांग लागते. हुजूर-हुजूर....आमचे गट शिक्षण अधिकारी किती चांगले आहे. केवळ हे म्हणण्यासाठी अवघ्या २९ पटाच्या शाळेवर गटशिक्षण महोदयांनी चार शिक्षकांची नेमणूक केली होती. गाव एक, शाळा एक, बिल्डींग देखील एक, तरी देखील शिक्षक मात्र चार. का? तर मर्जितील नेत्याला तालुक्यातील पुढारपण करता यावे, त्याला मोकळीक मिळावी म्हणून हा खटाटोप करण्याचा पराक्रम साहेबांनी केला. म्हणजे, तालुक्यात काही शाळेंवर शिक्षक नाही अशा बोंबा मारायच्या, ज्यांचा काटा काढायचा आहे अशा महिलांच्या बदल्या डोंगर दर्यांमध्ये करायच्या, वाडी वस्तीवर कोणी नेता जायला तयार होत नाही म्हणून गरिब शिक्षकाला तेथे पाठवायचे अन पायात घुटमळणार्यांना.......जवळ ठेवायचे.! याला न्यायी अधिकारी म्हणतात का? खरंतर या शिक्षकांचे पगार बीडिओ, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या पगारातून वसूल केले पाहिजे. अशा प्रकारची मागणी पत्राद्वारे मुख्य कार्यकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
अकोले शहरापासून अगदी चारदोन किलोमिटर असणार्या परखतपूर गावात एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. तर, याच ठिकाणी झापवाडी परिसरात देखील झेडपीची शाळा होती. गेल्या दिड-दोन वर्षापुर्वी या शाळेत अवघे ३ मुले शिल्लक राहिले होते. तरी देखील तेथे दोन शिक्षक शिकत होते. तेव्हा अचानक १५ ते २० वर्षापुर्वी बांधलेली वर्गखोली निकृष्ट झाली आणि हे ३ मुले दिड ते दोन किलोमिटर पायपीट करीत परखतपूर येथे येऊ लागले. त्यावेळी तेथील सरपंच महोदय यांनी तत्काळ ग्रामसभा बोलविली आणि या शाळेचा निरलेखन झाले पाहिजे म्हणून ठराव घेतला. शिक्षकांनी ३ मुलांना परखतपूर शाळेत नेण्यास ठराव मांडून तो मंजूर करुन घेतला. अर्थात तीन का होईना पण लेकारांचा प्रश्न होता. त्यामुळे, रिक्स न घेणे सहाजिक होते. त्यामुळे, ही मुले इकडे आली. (खरंतर, ती आणण्यामागे काही मोकाट पुढारपण करणाऱ्या व्यक्तींचा काही डाव आहे का? याची देखील चौकशी झाली पाहिजे.)
दरम्यान, गेल्या वर्षी परखतपुरचे २६ (हा आजचा पट आहे, तेव्हा यापेक्षा कमी असू शकतो) आणि झापवाडीचे ३ अशा २९ मुलांसाठी चार शिक्षक एकाच गावात, एकाच शाळेत, एकाच बिल्डिंगमध्ये शिकवत होते. विशेष म्हणजे या ठिकाणी वर्गखोल्या देखील फक्त तीन आहेत. त्यात चार शिक्षक शिकवितात म्हणजे हे जगावेगळे शिक्षण झाले. याबाबत जेव्हा येथील विभाग प्रमुख यांना विचारले. तर त्यांनी सांगितले. की, वर्ग वेगळे भरतात. हे धादांत खोटे होते. मुळात झापवाडीतील पहिलीच्या मुलांना वेगळा अभ्यासक्रम आणि दिड किलोमिटरवर असणार्या परखतपूर शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांना वेगळा अभ्यासक्रम असे आहे का? तर मुळीच नाही. केवळ एका पुढारी शिक्षकाला पुढारपण करण्यासाठी तो मोकळा राहावा, त्याने अधिकार्यांची हुजरेगिरी करुन त्याच्या संघटनेला वेळ द्यावा म्हणून हा खटाटोप गटशिक्षण अधिकार्यांनी केला. असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
खरंतर, एखादी शाळा १५ ते २० वर्षात पडायला झाली. ती कशामुळे? त्याचे ऑडिट शाळेने केले का? त्याच्या निरलेखनाचा प्रस्ताव कधी पाठविला? त्याला मंजुरी मिळण्यासाठी काय पाठपुरवा केला? 30 वर्षाच्या आत अशा बिल्डिंगचे निरलेखन होते का? म्हणजे जागरुक असलेल्या गावाने दिड वर्षापुर्वी कागदपत्र तयार करुन यांना दिले होते. मात्र, यांनी त्याचा पाठपुरावाच केला नाही. दिड दोन वर्षे गेल्यानंतर तीन महिन्यापुर्वी त्या शाळेचे ऑडिट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ते ही गावाने. म्हणजे, तोवर शिक्षक विभाग झोपला होता का? त्यांना मुलांच्या शाळेची चिंता नाही का? कि सुप्रिम कोर्टाने आदेश दिला होता. १ किलोमिटर पेक्षा जास्त अंतरावर मुलांना पायपीट करायला लावू नये. या आदेशाचा विसर पडला होता? कि नेत्याला मोकळीक मिळण्यासाठी मुलांच्या आयुष्याचे वाटोळे झाले तरी चालेले. त्यांना वाघाची भिती नाही, कुत्र्यांची भिती नाही, त्यांच्यावर कोणतीही आपत्ती आली तरी चालेल. पण, आमच्या नेत्याला भटकायला वेळ मिळाला पाहिजे.!! खरच किती भोंगळा कारभार चालु आहे. या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. शिक्षकांच्या तुलनेत या मुलांच्या गुणवत्तेचे देखील ऑडिट झाले पाहिजे.
आज झापवाडी आणि परखतपूर या दोन्ही शाळा एकत्र आहेत. तेथे पट वाढला असून २६ + ११ = ३७ वर गेला आहे. येथील शिक्षक पुढारी बदलुन गेल्यामुळे येणार्या काळात गुणवत्ता चांगली वाढू शकते. शिक्षण विभागाने मुलांच्या पायपीटीचा विचार करुन झापवाडीची शाळा तत्काळ मंजूर करुन आणली पाहिजे. एका शेतकर्याने एक रुपयाचे बक्षिसपत्र करुन गावाला मदत केली आहे. तर, दुसरीकडे लाखो रुपये घेऊन काही व्यक्तींनी प्रशासनाची आणि सरकारची फसवणूक केली आहे. त्यामुळे, याची चौकशी झाली पाहिजे. विशेष म्हणजे काल शिक्षण अधिकारी भास्कर पाटील येऊन गेले. त्यांनी अनेक गोष्टींच्या चौकशा केल्या आहेत. तर, यापुर्वी त्यांनीच गटशिक्षण अधिकार्यांना चौकशांमधून क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे, जे पथक आले होते. त्याच्यापुढे काही चाटू व्यक्तींनी चुकीच्या मानसाची वकिली केली. त्यामुळे, जिल्ह्यात सगळीकडे गटशिक्षण अधिकारी आहेत. अकोल्याच्या बाबतीत भरती आणि बढतीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे, हे अधिकारी म्हणजे कागदी घोडे नाचविणे आणि तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो. यापेक्षा वेगळे काहीच नाही. पण, यात योग्य न्याय मिळाला नाही. तर, कोर्टात देखील दाद मागण्याची तयारी काही समाजसेवकांनी दर्शविली आहे.
चावटाळ अधिकारी, (तक्रार अर्जानुसार) भाग ४ क्रमश: